मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – ( श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अर्जुन उवाचः

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ৷৷२१৷৷

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।

कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ৷৷२२৷৷

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ৷৷२३৷৷

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ৷৷२४৷৷

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।

उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरूनिति ||२५||

तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितृनथ पितामहान्‌ ।

आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ||२६||

श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि |

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ||२७||

दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ৷৷२८৷৷

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।

वेपथुश्च शरीरे में रोमहर्षश्च जायते ৷৷२९৷৷

गाण्डीवं स्रंसते हस्तात्वक्चैव परिदह्यते ।

न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ৷৷३०৷৷

मराठी भावानुवाद :: 

कथिले अर्जुनाने..

श्रोकृष्णासी तेव्हा कथिता झाला पार्थ

दो सैन्यांच्या मध्ये घेउनी जाई माझा रथ ॥२१॥

कोण उपस्थित झाले येथे करावयासी युद्ध 

अवलोकन मी करीन त्यांचे होण्यापूर्वी  सिद्ध

दुर्योधनासी त्या अधमासी साथ कोण करतो 

कोणासी लढणे मज प्राप्त निरखुनिया पाहतो ॥२२, २३॥

कथिले संजयाने 

धनंजयाने असे बोलता श्रीकृष्णाला धृतराष्ट्रा

मधुसूदनाने नेले दोन्ही सैन्यांमध्ये उत्तम शकटा ||२४||

अवलोकी हे पार्था तुझ्या शत्रूंच्या  श्रेष्ठ योद्ध्यांना 

भीष्म द्रोणासवे ठाकल्या महावीर बलवानांना ||२५||

अपुल्या आणिक शत्रूच्या सैन्यावरती नजर फेकली पार्थाने 

विद्ध जाहला मनोमनी तो अपुल्याच सग्यांच्या दर्शनाने ||२६||

शस्त्रे अपुली सोयऱ्यांवरी विचार येउनी मनी 

विषण्ण झाला कणव जागुनी अतोनात मनी

अयोग्य अपुले कर्म जाणुनी  पाहुनी स्वजनांना 

खिन्न होऊनी वदला अर्जुन मग त्या श्रीकृष्णा ||

युद्धाकरिता सगेसोयरे शस्त्रसज्ज पाहुनिया ॥ २७, २८॥

गलितगात्र मी झालो जिव्हेला ये शुष्कता

देह जाहला कंपायमान कायेवरती काटा ॥२९॥

गळून पडले गाण्डीव दाह देहाचा  होई

त्राण सरले पायांमधले भ्रमीत माझे मन होई ॥३०॥

– क्रमशः… 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुलाच जमते… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

 

? कवितेचा उत्सव ? 

☆ तुलाच जमते… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

(वृत्त.  अनलज्वाला)

कारण नसता उगाच हसणे तुलाच जमते

हसता हसता गोड डीवचणे तुलाच जमते

 

मला वाटते वरचेवर मी तुला फसवतो

खोटे खोटे उगाच फसणे तुलाच जमते

 

तू असताना राज्य मनावर तुझ्या रुपाचे

नसतानाही समोर असणे तुलाच जमते

 

दूर उभा मी पहात बसतो तुझेच नखरे

खुसपट काढुन झकास रुसणे तुलाच जमते

 

वेळ ठरवणे भेटीची पण उशिरा येणे

हिरमुसलो तर मला हसवणे तुलाच जमते

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #176 ☆ संत सेना महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 176 ☆ संत सेना महाराज…☆ श्री सुजित कदम ☆

 उच्च विचारसरणी

संत सेना महाराज

वैशाखात द्वितीयेला

जन्मा आले संतराज…! १

 

न्हावी समाजाचे संत

भक्ती रस अभंगात

व्यवसाय करताना

दंग सदा पुजनात…! २

 

बुद्धी चौकस चंचल

समतेचा पुरस्कार

हिंदी मराठी भाषेत

केल्या रचना साकार….! ३

 

महाराष्ट्र पंजाबात

दोहे अभंग रचले

विठ्ठलाच्या चिंतनात

सारे आयुष्य वेचले…! ४

 

हजामत करताना

मुखी विठ्ठलाचे नाम

वारकरी चळवळ

भक्तीभाव निजधाम…! ५

 

हिंदी मराठी काव्याचा

केला मुक्त अंगीकार

संकीर्तन प्रवचनी

केला अध्यात्म प्रसार…! ६

 

नाम पर उपदेश

पाखंड्यांचे निर्दालन

गुरू ग्रंथ साहेबात

दोहा अभंग लेखन…! ७

 

सुख वाटतसे जीवा

जाता पंढरीसी कोणी

साध्या सोप्या रचनेत

शब्द धन वाही गोणी…! ८

 

दाढी करताना दिसेल

राजालाही भगवंत

संत सेना महाराज

प्रादेशिक कलावंत…! ९

 

दीर्घ काळ पंढरीत

सेना न्हावी करी सेवा

हरिभक्ती पारायण

दिला अभंगांचा ठेवा…! १०

 

श्रावणाची द्वादशी ही

पुण्यतिथी महोत्सव

संत सेना महाराज

करी  अभंग उत्सव…! ११

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुझे येणे, तुझे जाणे ?… कवी : दिलीमा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

तुझे येणे, तुझे जाणे ?… कवी : दिलीमा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

तुझे येणे, तुझे जाणे ?

आणि आमचे उगा मिरवणे….

 

आम्ही तो आणला….

आम्ही तो बसवला….

आम्ही नैवेद्य दाखवला….

आम्ही तो विसर्जित केला…

अनादी,अनंत तो एक !

त्याला काय कोण बनवेल 

अन् बुडवेल ?

 

अनंत पिढ्या आल्या…

अनंत पिढ्या गेल्या….

तो तरीही उरला…

 

काळ कधी का थांबेल ?

तो कधी न संपेल…

आपल्या आधी तोच एक….

आपल्या नंतरही तोच एक….

त्यास काय कोणाची गरज ?

 

मग काय हा उत्सव 

दहाच दिसांचा ?

का न करावा तो रोजचा ?

 

आपुले येणे, आपुले जाणे,

त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….

जगण्याचाच या उत्सव करावा….

अन् रोजच तो मनी बसवावा….

 

सजावट करावी विचारांची…

रोषणाई मनातल्या प्रेमाची…

नैवेद्य दाखवावा सत्याचा….

फुले दया, क्षमा, शांतीची….

अन् आरती सुंदर शब्दांची….

 

रोजच क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….

हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा…

असा तो रोजच का न पुजावा ?….

 

रोज नव्याने मनी तो

असा जागवावा….

अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा…. 

कवी : दिलीमा

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळ ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बकुळ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंग पांढरा पिवळसर

तारकाकृती पाकळी, 

जन्मजात हृदयी छिद्र 

सडा पडे सांजवेळी !

वृक्ष माझा घुमटाकार

घनदाट त्याची छाया,

कारागीर वापरती खोड

वर नक्षीकाम कराया !

रस माझा येई कामा 

सुगंध देण्या अत्तरास, 

जखम बरी करण्या 

साल येते उपयोगास !  

ओवून केळीच्या सोपात 

गजरा माळती ललना,

कोणी रसिक ठेवीतसे,

मज पुस्तकांच्या पाना !

आयुष्य थोड्या दिसांचे

सुकले तरी देते सुवास, 

थोडावेळ ठेवता जलात 

परत ताजी होते खास !

परत ताजी होते खास !

ब कु ळ !

© प्रमोद वामन वर्तक

सिंगापूर,  मो +६५८१७७५६१९ 

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ध्यास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(व्योमगंगा)

जोडलेले प्रेमधागे तोडता येणार का हो ?

वेदना मग काळजाला बांधता येणार का हो?

 

काळ वेडा धावणारा घेवुनी गेला सुखाला

सुखवणा-या परत वेळा मागता येणार का हो?

 

आतताई या मनाला वेगळी चिंता सतावे

संकटांच्या डोंगराना झेलता येणार का हो?

 

वचन होते जे दिले ते आजही आहेच ओझे

फार मोठा भार आहे पेलता येणार का हो?

 

कैदखाने तोडुनीया जाहल्या आहेत भेटी

वास्तवाच्या या कथांना सांगता येणार का हो?

 

श्वास झाला मोकळा पण ध्यास आहे कैद झाला

हा दुरावा तोडलेला जोडता येणार का हो?

 

चिखलकेला वेदनांचा अंतरंगी काळजाने

भावना जर उसळल्या तर मारता येणार का हो?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 202 ☆ दुधावरची साय ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 202 ?

☆ दुधावरची साय ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

भाद्रपदातली एक प्रसन्न सकाळ…

गर्भार सुनेला

इस्पितळात घेऊन जाताना

मनाची उलघाल…..

मनोमन ईश्वराची आराधना,

ईशस्तवन!

प्रसुतीगृहाच्या दारातला प्राजक्त,

मन मोहविणारा!

येणा-या सुगंधी क्षणांचा

साक्षीदारच जणू!

प्रतिक्षा….वेणा….वेदना….

सारं शब्दातीत….

पदरात पडलेलं निसर्गाचं दान अमूल्य  !

टॅ हॅ ऽऽऽटॅ हॅ ऽऽऽ चा प्रथम स्वर

जिवाचा कान करून ऐकलेला !

आजीपणाची कृतार्थ जाणीव…..

सा-या भूमिका पार पाडून,

येऊन पोहचलोच आपण,

या ठिकाणी!

कसं अन काय…

दुधावरची साय…

इवलासा जीव कवेतलं आकाश…

हृदयातला अथांग अर्णव…

आयुष्याची सार्थकता….जगण्याचा अर्थ नवा !

© प्रभा सोनवणे

१४ सप्टेंबर २००८

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मागे वळून पाहताना… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ मागे वळून पाहताना… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मागे वळून पाहताना,

 भुरळ घालती वाटा ..

अन् पुढे पहायचे मनाला,

 धाडस नाहीयेत करता!….१

 

मागे वळून पाहताना,

वाट दिसे वळणावळणाची..

 कशी सरली माहित नाही,

 ती वाट होती चढणीची !….२

 

वाटते आता मनाला,

 ही वाट परतीची नाही …

पण शेवट त्याचा कोठे,

 हे ज्ञात कुणाला नाही !…३

 

मागे वळून पाहताना.‌,

 खाचखळगे वाटेवरचे!

कधी जाणवले का नाही,

 काटेरी त्या झुडुपांतळचे!..४

 

गूढ वलय अज्ञाताचे,

 वाटे कुतुहल कधी भय!

एकाच ठायी विश्वासाचे ..

 समजू ते ईश्वरी आलय!..५

 

 मागे वळून पाहताना,

 लाभे कधी सुखद गारवा!

त्या अनमोल अशा क्षणांचा ,

 मनी जपला अजून ठेवा..६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #208 ☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 208 ?

हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भात्यामधला बाणच त्याच्या सुटला नाही

जखमी झाले कशी जरी तो भिडला नाही

मला न कळले कधी निशाणा धरला त्याने

नेम बरोबर बर्मी बसला चुकला नाही

माहिर होता अशा सोंगट्या टाकायाचा

डाव कुणाला कधीच त्याचा कळला नाही

बऱ्याच वेळा चुका जाहल्या होत्या माझ्या

तरी कधीही माझ्यावरती  चिडला नाही

गुन्हास नसते माफी आहे सत्य अबाधित

कधीच थारा अपराधाला दिधला नाही

जुनाट वाटा किती चकाचक झाल्या आता

कधी चुकीच्या वाटेवरती वळला नाही

गुलाम होता राजा झाला तो कष्टाने 

काळासोबत युद्ध छेडले हरला नाही

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भूलोकीचा स्वर्ग… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ भूलोकीचा स्वर्ग… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण 

नक्कीच कराल आमचा हेवा ll

 

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा ll

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात ll

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या ।।

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून ।

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून ll

 

लाख सांगा देवा हा 

तुमच्या मायेचा खेळ l

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून l

मायापती  देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून ll

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते 

सगळे आघात झेलत ll

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट l

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट ।।

 

माहेरपण हा केवळ 

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ ll

 

डोळ्यात प्राण आणून 

वाट बघणारी आई l

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही ll

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares