मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 168 – विज्ञानाची जादूगिरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 168 – विज्ञानाची जादूगिरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

विज्ञानाच्या गंमतीची

नवी जादू झाली सुरू।

कापराने प्लास्टिकचे

मासे लागतील फिरू।

 

पाण्यामध्ये लेझर रेss

उगा बसला रुसून।

दोन थेंब दूध देता

पुन्हा दिसला हसून ।

 

कार्बनडायआक्साईड

असे फार करामती।

पाण्यामध्ये  युनो टाका

अन् विझे  मेनबत्ती।

 

प्लेटवर सात रंग

आले ऐटीत सजून।

गरगरा प्लेट फिरे

पांढऱ्यात विरून।

 

चिमटीत कुंकवाचा

असा झाला कसा बुक्का।

लिंबातून रक्त येता

मज बसे मोठा धक्का ।

समजली विज्ञानाची

आता सारी जादुगिरी।

जादूटोणा भूलथापा

भूत दिवटी ना खरी।

 

विज्ञानाची कास धरू।

आता आम्ही सारी मुले।

ज्ञान विज्ञान जोडीला

सारे आवकाश खुले।

रंजना लसणे

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रावणमास… कवी : संदीप मणेरीकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 श्रावणमास… कवी : संदीप मणेरीकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  

जरा जरासा अवखळ अवखळ 

हवाहवासा मंगल सोज्वळ 

लाजरा बुजरा हिरवा साजण 

दारी आला श्रावण श्रावण //१//

 

जरा जरासा हिरवा हिरवा 

अंगावरती शालू  कोवळा 

ठुमकत मुरकत मंगल पावन 

दारी आला श्रावण श्रावण //2//

 

फुलाफुलांनी नटुनी सजुनी 

रेशीम धारा भिजुनी किरणी

इंद्रधनूचे बांधून तोरण 

दारी आला श्रावण श्रावण //3//

 

सणवारांचे  अवीट भोजन 

पावित्र्याचे  सुंदर योजन 

मांगल्याचे करी आवाहन 

दारी आला श्रावण श्रावण //४//

 

अवखळ नटखट हवाहवासा

चंचल तजेला नवानवासा 

अल्लड निरागस पांघरून 

दारी आला श्रावण श्रावण //५//

कवी : संदीप मणेरीकर 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

आले आकाश भरून..

सौम्य ऊन परतता

गेले पुन्हा निवळून..

 

धडपडता ओलेता…

वारा थकला पळून

गंध वाटता वाटता…

 

ऊन पावसाचे सडे…

लेऊनीया दंव मोती

वाट हिर्वाळीत दडे…

 

वारा.. पक्षी..झाडे..पाणी…

धुंद सृष्टीची मैफल

श्रृंगारली वनराणी…

 

खेळ..सई.. झोक्यातून…

तिच्या आकाशा भेटून

येई माहेरवाशीण…

 

फुले पिसारा.. फुलोरा…

रंग..गंधाने..स्वराने

सजे मनांचा गाभारा…

 

मिळे चैतन्य प्राणास…

थांबलेला जीवनांचा

सुरु जाहला प्रवास…

 

हर्ष.. समृद्धी..तृप्तीचे..

आता ओसंडती घडे

आले दिस श्रावणाचे..

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  कवितेचा उत्सव  ☆ यान उतरले चंद्रावरती… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? कवितेचा उत्सव ?

☆ यान उतरले चंद्रावरती ☆ श्री सतीश मोघे

यान उतरले चंद्रावरती

आनंदाच्या सरी बरसती

  शरदऋतूच्या प्रारंभाला

  चंद्रभेटीची चांदणभरती

पहिला विक्रम केला आम्ही

उतरून दक्षिण ध्रुवावरती

  आले अपयश खचलो नाही

  पुन्हा नव्याने गेलो वरती

यश सारे हे शास्त्रज्ञांचे

जगी पसरली त्यांची ख्याती

  कवितेमधल्या चांदोबाची

  गाठ पडूनी होई भेटी

आनंदाची लहर देशभर

अभिमानाने फुगली छाती

  दूरदृष्टीचा अमुचा नेता

  लक्ष तयाचे सूर्यावरती

चंद्र आनंदे म्हणे धन्य मी

आज तिरंगा आला भेटी  🇮🇳

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #188 ☆ रक्षा सूत्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 187 – विजय साहित्य ?

☆ रक्षा सूत्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

श्रावणाच्या पौर्णिमेला

रक्षा बंधनाचा‌ सण

रक्षा सूत्र अनमोल

घेई वेचूनीया मन…!

 

ताई तुझ्या भेटीसाठी

होते सालंकृत राखी

राग लोभ भांडणात

नाते गुंफतसे राखी…!

 

राखी कौटुंबीक बंध

करी राखण नात्याची

भावा बहिणीचा सण

पाठ राखण मायेची..!

 

एका‌ रेशीम धाग्यात

आठवणी विसावल्या

गोड घास मुखी तुझ्या

औक्षणाने सामावल्या..!

 

दीपज्योती स्नेहवाती

भावा बहिणीची जोडी

आठवांच्या चांदण्यात

आहे अमृताची गोडी…!

 

अमरत्व निर्भयता

राखी देते संजीवन

येता श्रवण नक्षत्र

करू नात्यांचे रक्षण..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संपर्क तुटला, संकल्प नाही… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

? कवितेचा उत्सव ?

संपर्क तुटला, संकल्प नाही… ☆ श्री राहूल लाळे

संपर्क तुटला, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही नक्कीच नाही

 

विक्रमाने हुलकावणी दिली

तरी प्रज्ञाना ची साथ सोडणार नाही

 

चंद्राचे आहे जुनेच आकर्षण..

श्रीरामाला ही त्याने घातली भुरळ

प्रेमाचे आमच्या तो प्रतीक आहे

शास्त्रज्ञांसाठी कुतूहल आहे

 

हनुमंताचे भक्त आम्ही

चंद्रच काय सुर्यालाही गवसणी घालू

वेडे प्रेमवीर आम्ही

पुन्हा पुन्हा फिरुन येऊ

 

तो तिथेच कायम असेल

 निर्धार आमचा दशपट होईल

 

संपर्क तुटेल, संकल्प नाही

खचून जाणारे आम्ही निश्चितच नाही

© श्री राहुल लाळे

०७-०९-२०१९

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांद्रयानाचे मनोगत… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

चांद्रयानाचे मनोगत ☆ सौ कुंदा कुलकर्णी

चांद्रयानाने चंद्रावर

तिरंगा फडकला तेव्हाचे मनोगत

 

आनंदी आनंद गडे

हर्षाचा उन्माद चढे

देश/ विदेश नाही वावडे

लक्ष साऱ्यांचे माझ्याकडे(१)

 

चंदा मामा खूष झाला

तिरंगा त्याने डोई मिरवला

इस्रोचा त्याने सन्मान केला

दक्षिण ध्रुवावर उतर म्हणाला(२)

 

प्रवासाचा शीण कुठला

भरपूर कामे आहेत मजला

खूप सांगायचंय या मामाला

अपडेट पाठवीत राहीन तुम्हाला (३)

 

आशिष तुमचे हवेत मजला

कामगिरी फत्ते संशय कसला

ही तर नांदी सुवर्ण क्षणांची

 शान वाढवू भारतमाॅंची

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #171 ☆ पगार…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 171 ☆ पगार…! ☆ श्री सुजित कदम ☆

पगाराच पाकीट हातात पडताच

संसाराची सारीच गणित

डोळ्यासमोर भुकेलेल्या

कुत्र्यासारखी

आ.. वासुन उभी राहतात

आणि एक एक खर्च वजा

होताना…

हातात उरतात

नेहमी सारखीच

काही न सुटलेली. गणित

रिकामं पाकीट आणि

काही स्वप्न….

पुन्हा पुठच्या

पगाराच्या “आशेवर…!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सावधान ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? सावधान ! X श्री प्रमोद वामन वर्तक ☆

तीन टप्प्याचा धबधबा 

शोभा वाढवी निसर्गाची,

हौस घेती पुरवून हौशी 

त्याखाली जलक्रिडेची !

मौज मस्ती करी मानवा

याच्यासंगे तू सांभाळून,

फुका जीव जाईल तुझा 

जीवावरचे खेळ खेळून !

रौद्ररूप पाहून त्याचे 

धडकी भरतसे उरात,

ठरतो मानव निसर्गापुढे   

क्षुद्र किडा क्षणात !

……. क्षुद्र किडा क्षणात !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 197 ☆ रक्षाबंधन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 197 ?

☆ रक्षाबंधन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आभाळातला चंद्र एकदा ,

स्वप्नात माझ्या आला,

“माग सखे काय हवं ते,

देतो मी”

म्हणाला !

म्हटलं मित्रा,

“जमीनीवर जगण्याचं

नवं भान दे,

आंदण मला तुझं थोडं

चांदणरान दे”

मग त्यानं मूठभर

चांदण्याचं दान दिलं,

मनभर आभाळ

माझ्या मालकीचं केलं !

आभाळात माझ्या ,

मी पेरलं ते चांदणं!

आयुष्याचं बनलं ,

एक सुरेल गाणं!

 (“अनिकेत” मधून)

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares