मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मनामनात तिरंगा…🇮🇳– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मनामनात तिरंगा…🇮🇳– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हृदयात देशप्रेम मोठे,

छोटा भासे गगनचा गाभारा !

मनामनात तिरंगा,

घरा-घरात राष्ट्रध्वज उभारा !

घर नाही तिरंगा लावू कुठे?

हा खुजा प्रश्न बाजूला  सारा !

एक देश एक राष्ट्रध्वज,

हीच आमची  आहे विचारधारा !

© श्री आशिष  बिवलकर

15 ऑगस्ट 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गर्जा जयजयकार…🇮🇳” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “गर्जा जयजयकार…🇮🇳” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

स्वातंत्र्याच्या यशस्वितेचा गर्जा जयजयकार 🇮🇳

लोक हो … गर्जा जयजयकार …

                 आम्हीच आता राजे म्हणुनी

                 स्वातंत्र्याला उधाण येऊनी

                 जन्मे स्वैराचार …

                 गर्जा जयजयकार ….

बासनात ते नियम, कायदे

रोजरोजचे नवे वायदे

जनतेवर उपकार …

गर्जा जयजयकार ….

                  चोर स्वतःला साव म्हणविती

                  उघड्या माथी जनी मिरविती

                  सत्ता दे हुंकार …

                  गर्जा जयजयकार ….

जनसेवेचे बेगडी सोंग

सत्कार्याचे नुसते ढोंग

मनी पुरता कुविचार …

गर्जा जयजयकार ….

                    भ्रष्टाचारा पूरच येता

                    मातेला अन गिळू पहाता

                    कुठे न हाहा:कार …

                    गर्जा जयजयकार ….

पुंडशाहीचा जोर वाढता

देशाला या विकू पहाता

आत्म्याचा जोहार …

गर्जा जयजयकार ….

                     जनतेनेही बरे म्हणावे

                     आपल्यापुरते आपण पहावे

                     इतरांचा न विचार …

                       गर्जा जयजयकार ….

दिसतो झगमग थाटमाट वरी

भारतभूच्या मनी दाटे परी

निराश अंध:कार …

गर्जा जयजयकार ….

                        जुलमाची ही राष्ट्रवंदना

                        राष्ट्राची परि तमा कुणा ना

                        हाच नवा संस्कार …

                        गर्जा जयजयकार ….

असले भीषण जरी हे चित्र

स्वप्न मनोमनी तरळे मात्र

होईल कृष्णावतार …

फिरुनी होईल कृष्णावतार

                            गर्जा जयजयकार …

                                  लोक हो गर्जा जयजयकार ……

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ 🇮🇳 तिरंगा 🇮🇳 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ 🇮🇳 तिरंगा 🇮🇳 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तीन रंगात फडकत राहील,

 माझ्या देशाचा सन्मान !

आकाशातून विहरत जगभर जाई,

 भारताचा अभिमान !

 

केशरी, पांढरा, अन् हिरवा  

रंगध्वजाचे येत क्रमाने.!

वैराग्याला प्रथम स्थान ते…  

दिलेअसे देशाने!

 

पावित्र्य जयाचे दावून सर्वा,

शुभ्र पांढरा मध्ये असे!

हिरव्या रंगाने ती अपुली,

सस्यशामल भूमी दिसे. !

 

विजयचक्र हे मधोमध दावी

‘विजयी भव’ चे रूप सर्वा!

चक्रा वरच्या आऱ्या दाखवती,

देशभक्तांच्या शौर्या!

 

उंच लहरता तिरंगा अपुला,

स्वातंत्र्याची ग्वाही देतसे!

दरवर्षी नव जोशाने हा,

स्वातंत्र्यनभी फडकतसे!

 

गर्वाने आम्ही पुजितो,

जो देशाचा मानबिंदू खरा!

त्याच्या छत्राखाली  भोगतो,

स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा!

 

स्वातंत्र्य दिन असो

वा प्रजासत्ताक दिन असो!

आमचा तिरंगा ,

फडकत राहील!

 

या तिरंग्याच्या,

रक्षणासाठी!

प्रत्येक बांधव,

सज्ज राहील!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वीर जवान 🇮🇳 ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ वीर जवान 🇮🇳 ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

सळसळते वर्दीच्या आत

ते रक्त वीरतेचे

देशसेवा प्रण घेतलेल्या

त्या वीर जवानाचे

 

वर्दीत झाकलेली ती

छाती अभिमानी असते

या मायभूचे रक्षण करता

भय मृत्यूचेही नसते

 

ऊंच फडफडत्या तिरंग्या

आहे बलिदान जवानांचे

प्राणास घालुनी आण

घेतले प्रण विरतेचे

 

वीर ऐसे जन्मा आले

थोर भाग्य मायभूचे

विरांच्या या भूमी वरती

थरथरती पाय शत्रूचे

 

जय जवान जय किसान

नुसतेच देतो नारे

निद्रिस्त झालो आम्ही

वीरास कुणी जाणिले

 

सीमेवर भारतभुच्या

शत्रूचे तुफान येते

रूप मर्द मावळ्यांचेच

ये वीर जवानाते

 

‘जय जवान जय किसान’ चे

नुसतेच नकोत नारे

 होऊनी जागृत आता

वीरांस यां जाणा रे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #201 ☆ ‘सोनचाफा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 201 ?

☆ सोनचाफा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भाळण्याचे हे तुझेही वय कुठे

शीळ मीही घालतो पण लय कुठे

 

सोनचाफा यायची तू माळुनी

विसर म्हणता विसरते ती सय कुठे

 

सोडुनी आलीस सारी बंधने

सांग तू केली कुणाची गय कुठे

 

अमृताचा लाव ओठी तू घडा

गार करते पाजुनी मज पय कुठे

 

तीच आहे आत अजुनी भावना

भावनेला सांग होतो क्षय कुठे

 

तोडल्या केव्हाच आपण शृंखला

राहिले आता जगाचे भय कुठे

 

वागलो तेव्हा जरी हटके जरा

सोडला आजून आपण नय कुठे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

🌳 विविधा 🌳

☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!💐 

स्वातंत्र्याच्या ‌निर्मात्यांना आमुचे लाख प्रणाम💐

 

७६‌ वर्षे झालीत

पण  स्वातंत्र्य मिळाले कुणाला?🌸

या देशातील सामान्य नागरिक

 स्वातंत्र्यापासून वंचितच राहिला ☘️

 

स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचा पायावर

ज्यांनी आपल्या इमारती‌ बांधल्या

त्यांना स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळाले

बाकीचे मात्र कोरडेच राहिले.🌸

 

स्वातंत्र्य सूर्याची किरणे शिरली

मोठमोठ्या बंगल्यात, महालात

पण झोपड्या अन् घरे मात्र

राहिलीत नेहमीच अंधारात 🌸

 

आपण सारे हिंदुस्तान निवासी

म्हणतात सारे तोंडाने

स्वार्थापोटी ‌हेच निवासी

हेच निवासी एकमेकांचे शत्रू होतात

कृतीने

या देशात आहे निस्वार्थी

म्हणून च‌ इतरांचा स्वार्थ साधतो

देशभक्त आहेत

म्हणूनच देशद्रोही सुखी आहेत.☘️

 

स्वातंत्र्य, समता, बंधुता

सारे काही सोंग आहे

स्वतंत्रतेच्या मात्र पायात

विषमतेची श्रुंखलाआहे☘️

 

खरी लोकशाही आहे अर्थहीन

सुरु आहे बेबंदशाही चे थैमान

चंगळ वादाला आला बहर

पतन होते लोकशाहीचे, नागरिकांचे

सर्व राजकीय पक्षांचे🌸

 

करण्या यशस्वी लोकशाही

घ्या हो शपथ राष्ट्रीय एकात्मतेची

होळी करा हो सत्तांध भावनेची

स्वातंत्र्याचा अखंड दीप गवसेल तेव्हा 🌸

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छापा की काटा…? ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दोघांचीही निवृत्ती झाली होती,

साठी कधीच ओलांडली होती,

अजूनही परिस्थिती ठीक होती, 

हातात हात घालून ती चालत होती —

 

तो राजा ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती —-

 

अचानक त्याची तब्बेत बिघडते,

मग मात्र पंचायत होते,

तिची खूपच धावपळ होते,

पण कशीबशी ती पार पडते,—-

 

आता तो सावध होतो,

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,

वारसाची पुन्हा खात्री करतो,

मृत्यूपत्राची तयारी करतो —- 

           

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,

पासबुक तिच्या हातात ठेवतो,

डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,

तिलाच पैसे काढायला लावतो, —-           

 

पुन्हा तिला सोबत घेतो,

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, 

तिलाच रांगेत उभं करतो,

बिल भरायचं समजाऊन सांगतो,—- 

 

अचानक तिला सरप्राईज देतो,

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो,

वाय-फाय नेटची गंमत सांगतो,

ऑन लाईन बॅकींग समजाऊन देतो,—-

 

तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,

नवा सोबती जोडून देतो

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,

प्रत्येक व्यवहार पाहू लागते,—- 

 

कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो,

निश्चिंत होत तो हळूच हसतो,     

बदल त्याच्यातला ती पहात असते,

मनातलं त्याच्या ओळखतं असते,—-

 

थोडं थोडं समजतं असते,

काळजी त्याचीच करत राहते,

एक दिवस वेगळेचं घडते,

ती थोडी गंमत करते,—-

 

आजारपणाचा बहाणा करते,

अंथरूणाला खिळून राहते,

भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते,—-

 

चहात साखर कमी पडते,

तरीही त्याचे ती कौतुक करते,

नाष्ट्यासाठी उपमा होतो,

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,—-

 

दिवसा मागून दिवस जातो,

अन् किचनमधला तो मास्टर होतो,

कोणीतरी आधी जाणार असतं,

कोणीतरी मागं रहाणार असतं,—-

 

पण …… 

पण मागच्याचं आता अडणार नसतं,

अन् काळजीच कारण उरणार नसतं,

सह-जीवनाचं नाणं उडत असतं,

जमीनीवर ते पडणार असतं,

 

आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो……. 

                             प्रश्न एकच छळत असतो……. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निरागस सप्तपदी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– निरागस सप्तपदी…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

[विवाहबद्ध होणारे भारतातील पहिले गतिमंद जोडपे अनन्या आणि विघ्नेश यांना सादर प्रणाम !!!]

शहाण्यांच्या जगात,

वेडा हा आपला संसार !

कसेही असोत आपण,

एकमेकांचा होऊ आधार !

आपल्या नशीबात

बाकी सारं उणं आहे !

निरागसपणा पत्रिकेत

जमलेला  गुण आहे !

जगाच्या चष्म्यातून आपली,

गती-मती  थोडी मंद आहे !

आपल्याच विश्वात रमण्याचा

आपल्याला निखळ आनंद आहे !

भातुकलीच्या भाबड्या खेळातील

तीच निरागसता आपल्यात आहे !

तूच  माझा राजा- मीच तुझी राणी,

जीवनाची जोडी जमल्यात आहे !

सकारात्मक आयुष्य काय असते,

वेड्या जगाला कळू दे !

तुझा माझा हा मांडलेला संसार,

सुखाच्या प्रकाशात उजळू दे !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणसंच माणसं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माणसंच माणसं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसं सगळी हुशार असतात

संधी मिळताच डोक्यावर बसतात

भलाबुरा अनुभव घेऊन

नको तिथं फिदीफिदी हसतात

 

माणसं सगळीच संत नसताना

काही उपद्रवी काही परोपकारी असतात

माणसं माणसांना जीव लावतात

मन लाऊन वाचली की सगळीच कळतात

 

कोणी कोणाला जोखत असतात

स्वतःच मोठेपण मिरवून घेतात

हरवत किंवा जिंकत बसतात

वसवत जातात उसवत जातात

 

नखरे करतात हवं तिथं फिरतात

कधी बावरतात कधी सावरतात

काळाला मात्र सारीच घाबरतात

आलाकी सोडून पसार होतात

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 139 ☆ अभंग – मोरपंख धारी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 139 ? 

☆ अभंग – मोरपंख धारी… ☆

मोरपंख धारी, श्रीकृष्ण मुरारी

भक्तांचा कैवारी, घन:शाम.!!

 

अष्टविध युक्त, ब्रह्मचर्य शुद्ध

विशेष विशुद्ध, मनोहर.!!

 

अर्जुन सारथी, कृष्ण दामोदर

झालयां विभोर, मन माझे.!!

 

कवी राज म्हणे, पितांबर धारी

वाजवी बासरी, वनमाळी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares