☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)
देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या ऋचा उषा देवातेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
आ व॒ इंद्रं॒ क्रिविं॑ यथा वाज॒यन्तः॑ श॒तक्र॑तुम् । मंहि॑ष्ठं सिञ्च॒ इन्दु॑भिः ॥ १ ॥
देवेंद्राचे सामर्थ्य असे शतधेने चंड
सकलांना अति प्रीय जीवाला शचीवल्लभ इंद्र
ऋत्विजांनो हरवून जाता इंद्रस्तुती करिता
बावेसम त्या तुडुंब भरुनी सोमरसा पाजू त्या ||१||
☆
श॒तं वा॒ यः शुची॑नां स॒हस्रं॑ वा॒ समा॑शिराम् । एदु॑ नि॒म्नं न री॑यते ॥ २ ॥
क्षीरासह ते सहस्र वा शत शुद्ध सोम चमस
स्वीकारून घेई प्रेमाने प्रियबहु इंद्रास
सरितेच्या पाण्याला जैशी ओढ उताराची
शचीपतीला मनापासुनी आवड सोमरसाची ||२||
☆
सं यन्मदा॑य शु॒ष्मिण॑ ए॒ना ह्यस्यो॒दरे॑ । स॒मु॒द्रो न व्यचो॑ द॒धे ॥ ३ ॥
स्तो॒त्रं रा॑धानां पते॒ गिर्वा॑हो वीर॒ यस्य॑ ते । विभू॑तिरस्तु सू॒नृता॑ ॥ ५ ॥
अभिष्टस्वामी हे देवेंद्रा स्तुतीप्रीय असशी
आळविता स्तोत्रांना झणी तू धावूनिया येशी
पराक्रमी वीरा तव स्तोत्रांना आम्ही गातो
अखंड वैभव प्रसन्न होवुनी आम्हाला तू देतो ||५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)