मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

ठाम रहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही,

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरूवात कुठूनही करता येते.

 

कोणतेही नाते निभावताना,

समोरच्याच्या मनातील,

आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते.

विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो.

नाही तर आपण नाते फुलवत राहतो,

आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो.

 

दरवळ महत्त्वाची…

कारण दरवळ अविस्मरणीय असते,

मग ती फुलांची असो,

वा माणसांची…

 

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलंसं वाटत असतं,

केव्हा कोण जाणे,

मनात घर करुन राहत असतं.

 

ते जोपर्यंत जवळ आहे.

त्याला फुलासारखं जपायचं

असतं,

दूर गेल्यावरही आठवण

म्हणून,

मनात साठवायचं असतं,

याचंच तर नांव,

“मैत्री”असं असतं..!!

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #189 ☆ काचेचे घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 189 ?

☆ काचेचे घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तुझ्या स्मृतीचा मेघ मनातून जातच नाही

मेघामधुनी बरसत आता प्रेमच नाही

समृद्धीच्या प्रदूषणाचा खूप धुराळा

श्वास मोकळा घेता येथे येतच नाही

जुनी तोडली नवीन झाडे लावत आहे

नवीन झाडे तशी सावली देतच नाही

लाज झाकण्या जावे कोठे काचेचे घर

अशा घराला कुठे लाकडी दारच नाही

ध्यानधारणा करावयाला शिकलो आता

मनात साचत अहमपणाचा केरच नाही

वादळ झाले फांदीवरचे पान गळाले

दूर उडाले पुन्हा जन्मभर भेटच नाही

तू अश्रुंची फुले उधळली आहे ज्यावर

खरे सांगतो ते तर माझे प्रेतच नाही

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “किल्ला” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “किल्ला” ☆ श्री आशिष मुळे ☆

जमवून पोरांचा तो गलका

जणू अभेद्य किल्ला बांधावा

उभा करून माहोल दोस्तीचा

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

खांद्यांवर त्या हात टाकून

मनावरचा भार हलका करावा

तिची अधुरी कहाणी सांगून

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

बिल्डिंगच्या गच्चीत उमललेली

ती कौतुकाने पाहणारी सूर्यफूले

सुगंध त्यांचा अनुभवायला

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

गॅलरीत उभ्या गरिबाच्या श्रीमंतीशी

संवाद भरल्या डोळ्यांनी करावा

करत निश्चय मोठं होण्याचा

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

करून त्याग या सुन्या महालाचा

रात्रीचा तो कट्टा जागवावा

तुटलेल्या त्या पहारी घेऊन

पुन्हा एकदा किल्ला बांधावा ।

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाही चिरा… नाही पणती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री प्रमोद जोशी आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  नाही चिरा… नाही पणती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री प्रमोद जोशी आणि श्री आशिष बिवलकर  ☆

श्री प्रमोद जोशी

( १ )

दगड झिजे जो मंदिराप्रति,

लावू कसा मी त्याला पाय?

गरीब आहे म्हणून का हो,

श्रद्धा माझी गरीब काय?

घाव छिन्नीचा होई मनावर,

दगडावर पण होई नक्षी !

जे-जे करतो ते-ते केवळ,

श्रीरामांना ठेवून साक्षी !

श्वास रोखूनी येतो थकवा,

जरा न व्हावी कुठली चूक !

गुंते इतके मन या कामी,

देह विसरूनी जातो भूक !

इथे कुणा ना प्रवेश सहजी,

तिथे मला सगळे राखीव !

बहुधा मी प्रिय राघवासही,

हातुन काम घडे रेखीव !

हातोडीसह माझी छिन्नी,

जणू पुजेची गंध,फुले !

बापही मंदिर बांधायाचा,

तेच करो माझीही मुले !

मंदीर जेव्हा होईल पूर्ण,

दर्शनाची ना मिळेल संधी !

सेवा ही माझ्या प्रतिभेची,

म्हणून माझा घाम सुगंधी !

दगडाचेही सोने होईल,

दिसेल सोने दगडावाणी!

प्रतिष्ठापना होईल तेव्हा,

असेन तेथे भिजो पापणी !

“नाही चिरा नाही पणती” ही,

माझ्यासाठीही असेल ओळ !

शुचिर्भूतता कुठे एवढी,

रोजच घामाने आंघोळ !

कवी : प्रमोद जोशी. देवगड.

मो.  9423513604

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्री आशिष बिवलकर   

(२) 

प्राण फुंकतो या दगडात,

करतोय कोरीव नक्षीकाम !

शतकांच्या वेदना कोरल्या मनी,

आयोध्येत विराजती श्रीराम !

रामकार्याची एक एक शिळा,

करतो तिला मनोभावे वंदन !

बसलो जरी तिच्यावर कोरत,

पायाखाली ठेऊन श्रद्धेने किंतन !

रामकार्यात योगदान माझे,

खारीचा वाटा मी उचलतोय !

सार्थक  या  जन्माचे  झाले,

मंदिराची शिळा कोरतोय !

उन-पाऊसाची नाही तमा,

नाही लागत भूक  तहान !

घरदार संसार दूर राहिला,

ध्येयपूर्तीसाठी विसरुन भान !

एकीकडे शरयू वाहते आहे,

दुसरीकडे अंगातून घामाच्या धारा !

शरयूलाही हेवा वाटतो आमचा,

हृदयातल्या रामनामात उगमाचा झरा !

देतो मज हत्तीचे बळ,

परम रामभक्त हनुमान !

राम भक्तीत तल्लीन झालो,

एक एक घाव गाई गुणगान !

एक एक शिळा झेलतेय,

हसत छिनी हातोडीचे घाव !

कृतार्थ होई निर्जीव शिळाही,

दुमदुमते तिच्यातून रामाचे नाव !

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे,

मंदिर आकारतेय येथे भव्य !

हिंदू धर्माची भगवी पताका,

झळकेल तेज तिचे दिव्य !

स्वर्गात सुखावले पितर ,

हातून घडतेय रामाची सेवा !

सातजन्माचे पुण्य पणाला,

हातून घडो अजरामर कलेचा ठेवा !

साकरेल भव्यदिव्य मंदिर,

रामरल्ला गाभाऱ्यात विराजमान !

सोनियाचा  दिवस उजडेल,

हिंदुस्थानची शोभेल आन बान शान !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नदी दुथडी भरून आता निघाली माहेरी

काठावरी निरखती झाडं कावरी बावरी

 

गच्च भरतेस तेव्हा तुला ओढ भर्ताराची

ससे होलपट होते तेव्हा किती माहेराची

नको तोडू ताल बाई नको होऊस नवरी ॥ १ ॥ 

 

रानपालटत जाते दिस उगवून येतो

ओलसर पुनवेच्या मनी चांदवा रुजतो

नव्या जगण्यासाठीची होते मनाची तयारी ॥ २ ॥ 

 

आम्ही शेतकरी साधे तुझ्यावरी जडे जीव

तुझ्या कुशीत नांदते देते हुंकार वैभव

बाई तुझ्या ग पाण्याने आम्हा लाभते उभारी ॥ ३ ॥ 

 

तुझी गाताना थोरवी तुला म्हणती माऊली

भाव ठेऊन अंतरी तुझी पूजाही मांडली

तुझे पिऊन अमृत आम्ही जगतो शिवारी ॥ ४ ॥ 

 

तुझ्या काठी वसणारे तुला देवता मानती

तुला माहेरवाशीण म्हणूनीया पूजताती

 तुझ्या वटी भरणाला साडी चोळी जरतारी ॥ ५ ॥ 

 

अशी नको रोडाउस उन्हातानात तापून

हरघडी टाकी बाई तुझे पाऊल जपून

माझ्या मनाचे पाखरू झुरे पाणवठ्यावरी ॥ ६ ॥ 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 132 ☆ वेदनेच्या कविता …! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 132 ? 

☆ वेदनेच्या कविता…! ☆

वेदनेच्या ह्या कविता सांगू कशा 

मूक झाली भावना ही महादशा..धृ

 

अश्रू डोळ्यांतील संपून गेले पहा 

स्पंदने हृदयाची थांबून गेली पहा 

आक्रोश मी कसा करावा, कळेना हा.. १

नाते-गोते आप्त सारे विखुरले 

रक्ताचे ते पाणी झाले आटले 

मंद मंद मृत शांत भावना.. २

 

ऐसे कैसे दिस आले, सांगा इथे 

कीव ना इतुकी कुणाला काहो इथे 

आंधळे हे विश्व अवघे भासे इथे.. ३

 

सांगणे इतुकेच माझे आता गडे 

अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे 

राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-8… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-8…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

परमात्मवस्तु स्वानंदरूप

स्वयंस्फूर्त अन् प्रकाशरूप॥३६॥

 

पुत्र तू वटेश्वराचा असशी

परमात्म्याचा अंश असशी

कर्पुराच्या कणी कर्पुरगुण

आत्म्याठायी परमात्मगुण

साधर्म्य तुझ्या माझ्यातले

ऐक सांगतो तुज पहिले॥३७॥

 

दोघे आहो परमात्म्याचे अंश

माझ्या उपदेशी तुझा सारांश

जणु आपुल्या एका हातासि

मिठी पडे दुसर्‍या हाताची॥३८॥

 

शब्दे ऐकावा शब्द जसा

स्वादे चाखावा स्वाद जसा

उजेडे पहावा आपुला उजेड जसा

मी उपदेश तुवा करावा तसा॥३९॥

 

सोन्याचा मुलामा सोन्यावर देण्या

मुखाचाच आरसा मुख पाहण्या

तैसा आपुला संवाद शब्दहीन

आत्मा आत्म्यात विलीन॥४०॥

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

श्री लिहायला घरात आता

हिशोबाची वहीच नाही

ऑनलाइन पेमेंटच्या नव्या युगात

तांदूळ साखरेच्या डब्यात

लपवायलाच काही नाही

 

फाटलेले कपडे शिवून

पुन्हा वापरायची पद्धत नाही

सुई दोरा घेऊन शिवायला

मुळात कोणाकडे वेळच नाही

 

युज अँड थ्रो चा जमाना आहे

माळे उगीच भरायचे नाही

जुन्या गोष्टींमध्ये उगीच

मन असे गुंतवायचे नाही

 

मॉलच्या राशी तर आहेतच

आमिषाना भुलायचं नाही

असं म्हटलं तरीही

प्रत्यक्षात तसं होतच नाही

 

आता तर रेलचेल ऑनलाइन ची

ॲमेझॉन ची गळ मोडवत नाही

परस्पर होतो हिशोब सारा

पुन्हा, मी तर कुठे जातच नाही

 

जुनी हिशोबाची वही वाचताना

डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही

तेव्हा बावळट का आता शहाणे

या वादात मला पडायचं नाही

 

जुन्या आठवणी घेऊनच

पुढे पुढे जायचं असतं

काळाबरोबर आनंदाने

आपणही बदलायचं असतं

 

कवयित्री :सौ. सुजाता साठे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भिजलेले रक्ताश्रूंनी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ भिजलेले रक्ताश्रूंनी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(अष्टाक्षरी)

              भिजलेले रक्ताश्रूंनी

              जन्म मातीत गाडले

              काय होते पेरलेले

              काय हे रे उगवले !

 

              दुभंगलो ज्यांच्यासाठी

              जन्म ठेवला तारण

              समशेरींनी त्यांच्याच

              कसे काळीज विंधले !

 

              ऐन वादळाच्या वेळी

              झाले पारखे किनारे

              अनायासे तूफानांशी

              थोडे मैत्रही जूळले  !

 

              घर बांधून पाठीशी

              दिशा धुंडाळल्या दाही

              वाट शून्याचीच होती

              किती पाय रक्ताळले !

 

              झाला बेसूर झंकार

              वेदनेच्या वीणेचाही

              बंधातून हौतात्म्याच्या

              केले दुःखास मोकळे !

 

              मुशाफिर सर्वत्राचा

              जिथे तिथे आगंतुक 

              नाही भूमीस भावलो

              नाही आकाश लाभले!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

पहाटें पहाटें मला जाग आली,

तुझी याद ओल्या, सुगंधात न्हाली   ।।ध्रु।।

 

वरी लाल आरक्त प्राची नवेली,

कुणी मुग्ध ललना, जणू लाज ल्याली,

समिरातूनी रंग शिंपीत गेली    ।।१।।

 

जरी मध्यरात्री, तुझी साद आली,

परी मंचकी, मुक्त एकांत भाळी,

असें भास ह्रदयांस, या नित्य जाळी      ।।२।।

 

झुलावे फुलारुन, वाटें कळ्यांना,

परी मर्म याचे, तुला आकळेनां,

म्हणूनच रात्र ही, निःशब्द झाली   ।।३।।

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares