मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 148 – पंढरीची वारी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 148 – पंढरीची वारी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

आषाढी कार्तिकी

पंढरीची वारी।

नामाचा जल्लोष

करी वारकरी।।

 

विरालासे दंभ।

नसे भेदभाव ।

भजनात रंगे

रकं आणि राव ।।

 

श्रद्धेची पताका

खेळती पावली।

टाळ मृदुंगाच्या

तालात चालली ।।

 

सजले कळस

डोई ही तुळस ।

गाऊया अभंग

सोडूनी आळस ।।

 

वैष्णवांचा धर्म

नाम संकीर्तन

धरोनी रिंगन

सद्भावे नर्तन ।।

 

वरी भीमा तीरी

धन्यती नगरी ।।

भक्तांच्या संगती

भुलला पंढरी।। 

 

अनाथाची आई

माझी ग विठाई।

रूसली कौतुके

राई रूख्माबाई।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंदन विश्वभीमाच्या चरणी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ वंदन विश्वभीमाच्या चरणी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆ 

१ . …

भीम माझा महामेरू प्रबोधनाचा,

त्राता पददलितांचा,

विसावा अवघ्या मानवजातीचा ;

सर्वहारा माणसाचा श्वास

मानवतेचा विश्वास

नवनिर्मितीचा  ध्यास;

वंदन विश्वभीमाच्या चरणी

२. …

दिले तुम्ही महासंविधान –

स्वातंत्र्याला आकार दिला,

गाडले अमानुष जातीयतेला ,

मतपेटीतून फुलली रक्तहीन क्रांती ,

बसली भारत भूवर शांती ,

दिले तुम्ही महासंविधान

समतेच्या शिंपल्यात

नवयानाचा मोती !

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #170 ☆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – संघर्ष जीवनाचा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 170 – विजय साहित्य ?

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – संघर्ष जीवनाचा…!✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर

कार्यप्रवण तो संघर्ष जीवनाचा

राज्य घटना शिल्पकार हे

नाव नसे ध्यास असे जगण्याचा. . . !

 

रामजीचा ज्ञानसूर्य शोभला

भिमाईचा मातृभक्त लेक लाडका

राज्य घटनेचा रचयिता

दीन दलितांचा प्राण बोलका. . . !

 

सदैव लढले, लढत राहिले

विचार आणि कतृत्वाने

समाज बांधव उद्धाराला

सदैव तत्पर निर्धाराने.. . !

 

राज्य करीते मनामनावर

संघर्षांचे सचेत पाऊल

डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर

उत्कर्षाची मनास चाहूल. . . . !

 

देशोदेशी तुमचा डंका

निळ्या नभाचा मंत्र महान

शिका ,लढा नी संघटीत व्हा

उद्धारक हे बोल नव्हे वरदान.. . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पळसफुले… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पळसफुले… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

उन्हाळ्याच्या चाहूलवेळी

वनज्योती अंगी चेतवूनी

त्रिदलपर्णी पळस हा तर

 फुलूनी बहरला रानीवनी

 

लालचुटुक शुकचंचूपरी

शोभती पलाश कलिका

 लालकेशरी पळसफुले

उधळती हास्य मौक्तिका

 

तीव्र उन्हाचा दाह सोसूनी

पळस झळकतो अंगांगी

अग्नीत तापून सुवर्ण जसे

बावनकशी लखलखे सर्वांगी

 

वर्दळ येथे शत भुंग्यांची

मधु चाखण्या खगही आतुर

फुलाफुलातील रंगासवे

 सृष्टीत या रंगोत्सवा बहर

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १ ते ६  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ – ऋचा १ ते ६  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्‌सूक्त)– सूक्त २२ ऋचा १ ते ६

ऋषी – मेधातिथि कण्व  

देवता – १ वायु; २-३ इंद्रवायु; ४-६ मित्रावरुण

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी हे मुख्यतः जलदेवतेला उद्देशून असल्याने हे अप्सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा वायूचे, दोन आणि तीन या ऋचा इंद्र-वायूचे, चार आणि सहा या  ऋचा मित्रावरुणचे आवाहन करतात. 

मराठी भावानुवाद :: 

ती॒व्राः सोमा॑स॒ आ ग॑ह्या॒शीर्व॑न्तः सु॒ता इ॒मे । वायो तान्प्रस्थि॑तान्पिब ॥ १ ॥

वायूदेवा मधुर मधुरशा सोमा सिद्ध केले  

त्याच्यामध्ये दधि मिसळुनी त्यासी तीव्र केले  

तुम्हासाठी पिळूनी दर्भा हवी भक्तिभावे 

पवना घ्यावे प्राशन करुनी तृप्त होवोनी जावे ||१||

उ॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशे॑न्द्रवा॒यू ह॑वामहे । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ २ ॥

इंद्र-वायू दोघे सहजी द्युलोकाप्रत जाती

अपुल्या सामर्थ्याला साऱ्या विश्वाला दाविती

आवाहन त्या उभय देवता या यज्ञासाठी

सज्ज ठेविल्या सोमरसाला प्राशन करण्यासाठी ||२||

इ॒न्द्र॒वा॒यू म॑नो॒जुवा॒ विप्रा॑ हवन्त ऊ॒तये॑ । स॒ह॒स्रा॒क्षा धि॒यस्पती॑ ॥ ३ ॥

मनाहुनीही शीघ्र वेग वायूचा इंद्राचा

सहस्राक्ष देवेंद्र अधिपती अगाध बुद्धीचा 

वायू-इंद्र चंडप्रतापी समर्थ बलवान 

रक्षण करण्या विद्वानांनी केले पाचारण ||३||

मि॒त्रं व॒यं ह॑वामहे॒ वरु॑णं॒ सोम॑पीतये । ज॒ज्ञा॒ना पू॒तद॑क्षसा ॥ ४ ॥

मित्रवरुणा करितो सोमपाना आवाहन

बल  उदंड आहे तयांसी सवे  सर्वज्ञान

पवित्र कार्यास्तव दाविती अचाट सामर्थ्य

त्यांच्या योगे याग अमुचा सहजी होई सार्थ ||४||

ऋ॒तेन॒ यावृ॑ता॒वृधा॑वृ॒तस्य॒ ज्योति॑ष॒स्पती॑ । ता मि॒त्रावरु॑णा हुवे ॥ ५ ॥

नीतीमार्गा अवसरुनीया अपुल्या आचरणे 

सन्मानाने नीतीनियमा उच्च नेती स्थाने

मित्रवरुण दोघे तेजाचे दिव्य अधिष्ठाते

स्वीकारावे अर्पण करितो हवीस तुम्हाते  ||५||

वरु॑णः प्रावि॒ता भु॑वन्मि॒त्रो विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । कर॑तां नः सु॒राध॑सः ॥ ६ ॥

रक्षण करि सर्वांगिण मित्रा संकटात अमुचे 

तुम्हीच आम्हा जीवनात या सावरुनी घ्यायचे

वरूण देवताही करोत आमुचे संरक्षण 

परमसुखाचे उभय देवतांनो द्यावे दान ||६|| 

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/khU_eGlo-GY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 1 – 6

Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 1 – 6

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धुकं… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ धुकं… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

अशी कशी तू धुक्यात

क्षणी जातेस विरुन

थोडं बघ वाटेकडे

सूर्य जाईल घेऊन

 

धुक्यांच्या वलयात

तू जातेस लपून

पहाटेच्या थंड दवा

चिंब अंग भिजून

 

धुक  दाट पडलेलं

त्यांन सूर्या धरलेलं

आसुशी  भेट धरा

तरी थोडं थांबलेलं

 

पडू दे विरहाच धुकं

पण तू विरू नकोस

मनवेड्या धुक्यात

आंधळी होऊ नकोस

 

वनी धुकं मनी धुकं

कसं  दिसे डोळ्यांना

आत शिरू दे सूर्याला

फूल येऊ दे कळ्यांना

 

वृक्ष वल्लरींना कसं

गेलं धुकं लपेटून

घरंगळती कांही मोती

ओल्या  पानांपानांतून

 

हळुहळू उजाडेल

चरी धुक्याचा वावर

थबकली सारी किरणं

पांघरली सूर्यानं चादर

 

© मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #156 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 156 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम 

सत्य कर्म सिद्धांताचे

संत कबीर द्योतक

पुरोगामी संत कवी

दोहा अभंग जनक…! १

 

ज्येष्ठ पौर्णिमेचा दिन

कबिरांचा जन्म दिन

देव आहे बंधु सखा

जपू नाते रात्रंदिन….! २

 

कर्म सिद्धांताचे बीज

संत कबीरांची वाणी

धर्म भाषा प्रांतापार

निर्मियली बोलगाणी….! ३

 

सांगे कबिराचे दोहे

सोडा साथ अज्ञानाची

भाषा संस्कृती अभ्यास

शिकवण विज्ञानाची…! ४

 

बोली भाषा शिकोनीया

साधलासे सुसंवाद

अनुभवी विचारांना

व्यक्त केले निर्विवाद…! ५

 

एकमत एकजूट

दूर केला भेदभाव

सामाजिक भेदभाव

शोषणाचे नाही नाव…! ६

 

समाजाचे अवगुण

परखड सांगितले

जसा प्रांत तशी भाषा

तत्त्वज्ञान वर्णियले…! ७

 

राजस्थानी नी पंजाबी

खडी बोली ब्रजभाषा

कधी अवधी परबी

प्रेममयी ज्ञान दिशा…! ८

 

ग्रंथ बीजक प्रसिद्ध

कबीरांची शब्दावली

जीवनाचे तत्त्वज्ञान

प्रेममय ग्रंथावली…! ९

 

नाथ संप्रदाय आणि

सुफी गीत परंपरा

सत्य अहिंसा पुजा

प्रेम देई नयवरा…! १०

 

संत कबीर प्रवास

चारीधाम भारतात

काशीमधे कार्यरत

दोहा समाज मनात…! ११

 

आहे प्रयत्नात मश

मनोमनी रूजविले

कर्ममेळ रामभक्ती

जगा निर्भय ठेविले…! १२

 

हिंदू मुस्लिम ऐक्याचा

केला नित्य पुरस्कार

साखी सबद रमैनी

सधुक्कडी आविष्कार…! १३

 

बाबा साहेबांनी केले

संत कबीरांना गुरू

कबीरांचे उपदेश

वाट कल्याणाची सुरू…! १४

 

काशीतले विणकर

वस्त्र विणले रेशमी

संत कबीर महात्मा

ज्ञान संचय बेगमी…! १५

 

सुख दुःख केला शेला

हाती चरखा घेऊन

जरतारी रामनाम

दिलें काळीज विणून…! १६

 

संत्यमार्ग चालण्याची

दिली जनास प्रेरणा

प्रेम वाटा जनलोकी

दिली नवी संकल्पना…! १७

 

मगहर तीर्थक्षेत्री

झाला जीवनाचा अंत

साधा भोळा विणकर

अलौकिक कवी संत…! १८

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कविता स्मरण… – शांता शेल्के ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कविता स्मरण… – शांता शेल्के  ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले

जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले

जखम जिवाची हलके हलके भरून यावी

तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया

दुःखाचीही अशी लागते अनवट माया

आक्रसताना जग भवतीचे इवले झाले

इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे

एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे

सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा

गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही

तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही

आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली

श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय

आता नसते भय कसले वा कसला संशय

सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा

मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय……

रचना : शांता शेळके

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस होत नसतं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ असं होतं नसतं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

(हिन्दी भावानुवाद ⇒  इसका मतलब ये तो नही…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆)

रस्ता बंद झाला

म्हणजे रस्ता संपला

              ….असं होत नसतं

 

दिव्यातलं तेल संपलं

म्हणजे प्रकाश संपला

              ….असं होत नसतं

 

पानं झडून गेली

म्हणजे झाडही वठलं

              ….असं होत नसतं.

 

असतो एखादा क्षण काळाकुट्ट

पण तोच करतो मन घट्ट.

 

पुन्हा उठावं,लढावं आणि जिंकावं

असं वाटणं म्हणजे जगणं

 

मन खेळतच जाणार नवा खेळ,

क्षणाक्षणाला ;

पण बुद्धीच्या शृंखलांनी आवरावं त्याला,

झेप घ्यावी नव्या उमेदीनं अन्

व्हावं आपणही एक फिनिक्स !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 177 ☆ बाई… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 177 ?

💥 बाई… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

काहीतरी या मनात

सदा  आहेच सलते

दु:ख कोणते सदैव

 बाई  आहेच दळते

 

बाईपण सोसू कसे

चिंता अखंड करते

शैशवात फुलताना

काट्यावर ती  वसते

 

आई म्हणाली हळूच

कानी तेराव्याच वर्षी

“मोठी झालीस तू आता”

नको जाऊस दाराशी

 

 आत कोंडले स्वतःस

  नाही दारापाशी गेली

  रूप ऐन्यात पाहून

  स्वतः वरती भाळली

 

बाई आहे म्हणताना

जीणे अन्यायाचे आले

अशा त-हेने जगता

ओझे आयुष्याचे झाले

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares