मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अजून सारे तसेच आहे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “अजून सारे तसेच आहे” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पादाकुलक वृत्त)

जरी ना कधी भेटलीस तू

स्पर्श तुझा तो अवीट आहे 

सुगंध देही तो जाणवतो

कोंब प्रीतिचा अमिटच आहे॥१॥

*

आभाळ निळे तसेच आहे

रात्र चांदणी मला खुणवते

जरी दुरावा आपल्यातला 

तरी मनी तू कशी बिलगते ॥२॥

*

हळूच हसते ती शेवंती

पानामागे लज्जित होते 

आठवणीचा झोका येतो 

हास्य तुझे मग खळीत येते॥३॥

*

काळा संगे सरले नाही 

प्रणयस्मृतींची साथ राहिली

प्रेमांगणात केवळ दोघे 

स्वप्ने आता पुन्हा पाहिली ॥४॥

*
सारे अजून तसेच आहे

प्रेम मनीचे ना ओसरले 

वाटा असोत वेगवेगळ्या 

भास मिठीचे नाही विरले॥५॥ 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयती वाट सोपी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ आयती वाट सोपी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(भुजंगप्रयात)

हवी जीवनाची लढाई कुणाला

मिळाले असे आयते जर तुम्हाला

*

कधी बाप देतो शिदोरी फुकाची

बरे फावले दान घेणे अम्हाला

*

असे मोप देणार शास्ता जयाचा

रिकामी तिजोरी न चिंता मनाला

*

खरेदी मतांची करा खर्च नोटा

मतांना विका लाज वाटे कशाला

*

मिळे आयती राजगादी मुलाला

तिथे पाटही ना मिळावा भल्याला

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भगवंत हृदयस्थ आहे ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भगवंत हृदयस्थ आहे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ?

तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा 

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात 

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*

अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात 

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…

*

महाजन, साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*

“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*

निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता 

आतच होता, आहे, असशी 

जाणीव याची तू देता…

*

कृतार्थ मी अन् कृतार्थ तू ही 

जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू 

(मम)हृदयाचा आराम खरा…

*

कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या 

अयोनिसंभव बीज अंकुरे 

सात्विक, शुद्ध हृदयी सख्या..

*

प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे

केशव देतो (जसा) प्रिय पार्था…

*

आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्ती ने जाणीव होते भगवंत असे जेथे…

*

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साहित्य दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  साहित्य दीपावली…🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तेजोमय दीपज्योती

तिमीरहारक सरस्वती…

*

अनादी अनन्त तू निर्मोहक

त्रिगुणात्मक सत्व प्रकाशक

सकळ कला विद्येची कारक

 ज्ञान वैराग्य वाचस्पती…

*

तमोगुण तू नाशकारक

धी धृति स्मृति कारक

विद्यावन्त कला दायक

देवादीक पूजे बृहस्पति…

*

तू सृजनाची माय दाता

सकलांची साहित्य सरिता

माय मराठी तू अमृता

लक्ष्य लक्ष्य दीप ज्योती…

*

अक्षरांची शब्दकळा

 शब्दांचा हिरवा मळा

 नक्षत्रांच्या झुरमाळ्या

 सृजन अंगण फुलती…

*

 रूप किती तुझे थोर

 सप्तरंगी भाव विभोर

 शब्द स्पर्श चित्तचोर

 अलगद मज बिलगती…

*

तेजोमय दीप ज्योती

 तिमिरहारक सरस्वती…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्नेह दीप… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्नेह दीप🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आली दिवाळी दिवाळी 

चैतन्याच्या लावू ओळी 

मांगल्याचा टिळा लावू 

जिद्द कष्टाच्या कपाळी ||

*

सारी संकटे विपदा 

होवो या तमाचा नाश 

एकमेका जपताना 

विणू स्नेह मधुकोश ||

*

दुःख अन्याय अलक्ष्मी 

साऱ्या तमा संपवूया 

नाती हेच मोठे धन 

त्यास नित्य सांभाळूया ||

*

लावू नात्यांच्या दिव्यात 

स्नेह ममतेची ज्योत 

सारे भेद विसरून 

जोडू पुन्हा नवी प्रीत ||

*

दिवाळीचा सण मोठा

करू मनाला आरास

मनामनाला जोडणे

आहे निमित्त हे खास ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शु भ    दी पा व ली !  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🪔 शु भ    दी पा व ली ! 🪔  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंग सारे रांगोळीतले  

उधळा आपल्या जीवनी,

जमतील तसे ज्ञानदीप 

लावा लोकांच्या मनी !

*
उजळून टाका दीपावली 

असेल कोणाची अंधारी,

मदत करा त्या मुक्तहस्ते

मारु दे त्या गरुड भरारी !

*
आकाश कंदील स्वप्नांचे 

खुशाल उडवा बेलगाम,

सत्यात आणण्या त्यांना  

गाळा मेहनतीचा घाम !

फराळ गोड आठवणींचा 

*

ठेवा कायम तुम्ही मनात,

येता अनुभव कटू कधी 

विसरून जा तो क्षणात !

*
सदा ठेवा आठवण तुम्ही 

त्या शूर वीर जवानांची,

त्यांच्यामुळे होई आपली

दिवाळी खरी सुखाची !

… दिवाळी खरी सुखाची !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टी दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  सृष्टी दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

नभी असंख्य तारा चमकती

उजळू ज्ञान दीप  पणती   ।। ध्रु ।।

*

सरकीचे तेल  बीजात

वर बोन्ड शुभ्र कापसात

दोन्ही अद्वैत एक नांदती

लावू ज्ञान दीप पणती ।। 1 ।।

*

कापसाची घालूया वात

तेल सरकीचे  पणतीत

पणतीची  माता हो माती

*

लावू ज्ञान दीप पणती ।। 2 ।।

अनेक तारका नभी असती

त्यांचा जन्म हीच धरती

उजळे तमात ज्ञान ज्योती

लावू दिवाळीची पणती  ।।  3 ।। 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झोपडी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

झोपडी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

देह झोपडी

अती प्रिय मज

जपतो तीज

आवश्यक साधनेस…

 

ध्यान जपाने

तिज सारवतो 

सदगुरुसी हृदयाच्या

सिंहासनी बसवितो…

 

सदाचाराचे तोरण

दारी मी बांधतो

सु-मनाने सदगुरुसी 

नित पुजितो, आळवितो…

 

नैवेद्याचे ताट

विवेकाचे जिन्नस 

नीर-क्षीरचे कालवण

सत्कर्माचा धूप खास…

 

गुरुकृपेचा कवडसा

पडता अंतरीच्या डोई

तम, भय मनातले जाई

स्वच्छ प्रकाशाने उजळे झोपडी…

 

झोपडीत माझ्या

चैतन्याचा निवास

प्रेमाचा ही वास

शाश्वत आनंद हमखास…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #259 ☆ भूमीवरील तारे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 259 ?

भूमीवरील तारे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

*

पाणी जमीन सारे झाले कसे विकाऊ

माती तुझे ढिगारे झाले कसे विकाऊ

*

विस्तारले शहर हे दर्या तुझ्याच भवती

सारेच हे किनारे झाले कसे विकाऊ

*

झाले शिकून मोठे अन मागतात हुंडा

भूमीवरील तारे झाले कसे विकाऊ

*

पैसा किती अघोरी झाला जगात आहे

अक्रोश आणि नारे झाले कसे विकाऊ

*

राष्ट्रीय मान्यतेचा पक्षात एक पक्षी

त्याचेच हे पिसारे झाले कसे विकाऊ

*

पाणी नळातले हे आकाश फिरुन आले

बागेतले फवारे झाले कसे विकाऊ

*

लावून आज एसी होतो जरा पहुडलो

आले मनात वारे झाले कसे विकाऊ

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तू…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “तू…” ☆ प्रा. भरत खैरकर 

वेदनेची कळ अन्

लढण्यातलं बळ तू

 

मुलांच रडणं अन्

मोठ्यांच भिडणं तू

 

आगीचा जाळ अन्

पाण्याची धार तू

 

मायेचा पाझर अन्

दृष्टातला माजोर तू

 

कुराणातला अल्ला अन्

गीतेतला सल्ला तू 

 

अनेकातला एक अन्

एकातला अनेक तू

 

अनादी तू अनंत तू

तूच तू  तोच तू

 

हाही तू तोही तू

तूही तू तूही तू

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print