कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 101 – विजय साहित्य
☆ वचन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
प्रेम प्रितीचे बंध रेशमी नवे
नाते अक्षय फुलवायाला हवे.
विश्वासाचे वचन मागतो आता
हात मदतीचा देतो येता जाता .
संसाराच्या पानांवरती वचने
सहजीवनाची गाथा प्रवचने.
शब्द वचनी करार होतो जेव्हा
जातो होऊन परस्परांचे तेव्हा .
रामायण घडले वचनांसाठी
वनवास ते भोगले आप्तांपोटी
माया ममता ही विश्वासाची लेणी
हळवेली ही अंतरातली देणी.
जगण्याचा आधार ठरे कविता
वचनात प्रीतीच्या माझी वनिता.
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈