मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याचे मानकरी ☆ सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

?‍♂️ स्वातंत्र्याचे मानकरी?‍♂️

☆ सौ. विद्या पराडकर ☆

क्रांती ज्योत पेटविली तू क्रांतीच्या    आद्य प्रणेत्या

नाव अमर केले इतिहासात वासुदेव बळवंता

 

भारत मातेच्या अत्याचारा मदनलाला दिलेस तू उत्तर

इंग्रज अधिकाऱ्याचा करुनी खून

 

तारुण्याचा जोमातच ते स्वातंत्र्य लक्ष्मीचे भक्त बनले

पारतंत्राच्या शृंखला तोडण्या राजगुरू भगतसिंग फावसावर लटकले

 

केसरीतून सिंह गर्जना करून स्वराज्य मंत्राचा उद्घोष केला

स्वातंत्र्याच्या प्राणवायु तू लोकमान्य लोकप्रिय झाला

 

स्वातंत्र लक्ष्मीचे घालुनी कंकण देशसेवेचे बांधूनी तोरण  

सागरातून उडी घेऊन संकटि घातले पंचप्राण

 

सावरकरा नरकासम तू शिक्षा भोगून

कलीकाळाला जिंकून घेऊन घेतले सतीचे वाण

 

गाजविला तू 9 ऑगस्टचा क्रांती दिन चले जाओ जीऊ करूनी घोषणा

धन्य धन्य महात्माजी इंग्रजांविरुद्ध लढा देण्याची केलीस खरी योजना

 

सुभाषचंद्र उगवला हिंद भू्मीच्या आकाशी

“मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” घोषणेने अमर झाला जनमानसी

 

“लोहपुरूष तू वल्लभ भाई पटेल  मातृभूमीच्या”

“मानबिंदू तू हैदराबाद चा”

 

उषा उगवली स्वातंत्रविरांच्या बलिदानाने

प्रभा फाकली स्वातंत्र्याची चहू दिशेला

 

भारतभूच्या लाख वीरांनी पावन केली भारत भूमी

गेली निशा आली उषा पवित्र झाली मातृभूमी

 

© सौ. विद्या पराडकर

पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जय भारत ☆ सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ जय भारत ☆ सौ.मंजुषा आफळे ☆

देश माझा, मी देशाचा

भारतवासी बोलतो

घुमतो असा निनाद

ध्वज उंच फडकतो.

 

प्रथम ती देशभक्ती

अंतरात ठसवतो

निनादता राष्ट्रगीत

देशप्रेमात भिजतो.

 

सीमेवरी सैनिकांचे

आत्मबल वाढवितो

निनादो विश्वशांती

पराक्रमाला वंदीतो.

 

सुजाण तो नागरिक

संस्कृती अंगिकारतो

निनादती नवे मंत्र

देश विश्वात शोभतो.

 

© सौ.मंजुषा आफळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वतंत्र भारत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वतंत्र भारत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

भारतभूला स्वतंत्र करण्या

वीरपुत्र जन्मले

पारतंत्र्य शृंखला तोडण्या

अगणित रक्त सांडले

 

स्वातंत्र्यवीर सावरकर

राष्ट्रभक्तीने झपाटलेले

न पर्वा त्यांना प्राणांची

फिरंगी पळता भुई थोडे झाले

 

चिखलात उगवले कमळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

एकच जपला महामंत्र

“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क”

 

बापू अमुचे राष्ट्रपिता

आयुष्य वेचिले भूमातेकरिता

करात काठी कटीस पंचा

अहिंसा धर्माचे पुरस्कर्ता

 

पुकारिले आंदोलन

“भारत छोडो” केली चळवळ

नाही जगणे पारतंत्र्यी

एकच ध्यास एकच तळमळ

 

बलिदान भूमिपुत्रांचे

नको व्यर्थ जाया

एकजुटीने सारे आपण

स्वराज्याचे सुराज्य करूया

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रांती ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांती ☆ श्रीशैल चौगुले ☆

(छंदवृत्तमात्राः अक्रुर)

मनात ज्वाळा पेटून ऊठल्या ज्या

स्वातंत्र्याची क्रांती पर

भारतीय वीरांच्या त्या हाती ध्वज

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

कुणी विचार नारा,कुणी भय कावा

जो तो शत्रुवरतीच वार

वंदे मातरम् !गर्जे स्वर.

 

हां,हां म्हणता युध्द पेटले,देशभर

गांधी धारदार बळ शुर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

देशभक्त सारे जहाळ,मवाळ तारे

गेणू,बोस,वि.दा.बहादुर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

भगत,सुखदेव,राजगुरु श्रेष्ठ अमर

जयहिंद! घोषित एक गजर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

 

भारतमाता सिध्द स्वातंत्र्य तिरंगा

स्वागता पहाट सज्ज तत्पर

वंदे मातरम् ! गर्जे स्वर.

                 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

शुष्क धरेवर शुभ्र घनासह पाय रोवले ज्येष्ठाने

कपाशीपरी मेघ भासती,की पंख पसरले हंसाने

 

वसंत सरला,ग्रीष्म भडकला,आग पेटली चोहिकडे

गुलमोहर हा उतू चालला,केशर मिश्रित पडती सडे

 

दिवस लांबले,पवन थांबले,पानोपानी रंग बदलले

सर हलकिशी यावी म्हणूनी आसुसलेले हे डोळे

 

कुटुंबवत्सल कुठे पक्षिणी घरट्यातून विसावे

मातीमधुनी क्वचित कोठे मृगकीटक खुणावे

 

ज्येष्ठ तपस्वी ॠषीमुनीसम या धवल मेघमाला

श्यामवर्ण मेघांचा होईल,सुखवी जो बळीराजाला.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 97 ☆ स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 97 ☆

☆ स्फुट ☆

मी डोळे उघडले सकाळी

सात वाजता,

तेव्हा नवरा स्वतःचा चहा करून घेऊन, टेरेस वरच्या फुलझाडांना पाणी द्यायला गेलेला!

मी फेसबुक, व्हाटस् अॅप वर नजर टाकली…..

काल रात्री एक कवयित्री मैत्रीण म्हणाली,

“अगं तू “सुंदर” का म्हणालीस त्या पोस्टला? किती खोटं आहे ते सगळं…..”

खरंतर न वाचताच सांगीवांगी

मी त्या पोस्टला “सुंदर” म्हटलेलं,

मग फेसबुक वर जाऊन वाचलं ते

आणि

काढून टाकलं लाईक आणि कमेन्ट

खरंतरं न वाचताच मत देत नाही मी कधीच पण अगदी जवळच्या व्यक्तीनं भरभरून कौतुक केलेलं पाहून,  मी ही ठोकून दिलं….”सुंदर”!

आता ते ही डाचत रहाणार दिवसभर….!

 

तिनं सांगितलं….एका कवीनं स्वतःचीच तारीफ करण्यासाठी फेसबुक वर

खोटी अकाऊंटस उघडल्याची आणि ते उघडकीस आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी!

खोट्या पोस्ट टाकणा-यांनाही होईल अशीच काही शिक्षा!

 

बापरे…आत्मस्तुतीसाठी काहीही…..

 

काल रात्रीचा भात कावळ्याला ठेवण्यासाठी टेरेसवर गेले तर…

नवरा मोबाईल वर कुणाचा तरी “समझौता” घडवून आणत असलेला….

मी खुडली मोग-याची फुलं,

वीस मिनिटं कोवळी  उन्हं अंगावर घेत,

नाष्टा बनवायला खाली उतरले,

पण मोबाईल वाजला…

दोन मिनिटं बोलली सखी छानसं…

 

तर मोबाईल वर दिलीप सायरा ची छबी!

आजकाल मला सायरा सती सावित्री वाटायला लागली आहे,

पुन्हा पुन्हा  नव-याचे प्राण वाचवणारी…..

 

हे स्फुट टाईपत बसले,

आणि नव-यानं झापलं..”हे काय नाष्टा नाही बनवला?”

 मोबाईल ठेवून किचनकडे वळले,

साडेनऊ ची वेळ पाळली चहा नाष्ट्याची!

तरीही नव-याच्या बोलण्यातली धार जाणवली ……

 

टोचत राहते नेहमीच,

“आपण खुपच निकम्मे आहोत की काय?” ही टोचणी,

आजूबाजूचे बरेच जण स्वतःला

खुपच ग्रेट समजत असताना!

 

खरंच हे किती बरं आहे, न्यूनगंडच असल्याचे, मला आठवते…. मी नेहमीच, ”  ” शुक्रिया, आपने मुझ नाचिज को इस काबिल समझा। 

म्हटल्याचे!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 97 ☆ जिद्द पेरली ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 97 ☆

☆ जिद्द पेरली ☆

जीवनाच्या मातीमध्ये

जिद्द पेरली मी होती

केले अश्रुंचे सिंचन

कुठे होती सोपी शेती

 

माझ्या सागराच्या तळी

गाळ साठलेला किती

पापण्यांच्या शिंपल्यात

काही पिचलेले मोती

 

घरामध्ये नाही तेल

आणू कुठून मी वाती

तुला ओवळण्यासाठी

फक्त माझ्या दोन ज्योती

 

आला मेघ भेटायला

तहानलेल्या घागरी

सोडा कोरडा विचार

ठोवा पाणी हे भरुनी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लस घ्या .. ☆ श्री हेमंत मुसरीफ

श्री हेमंत मुसरीफ

20376201_1896198587315242_46584151346661

? कवितेचा उत्सव ?

☆ लस घ्या ..☆ श्री हेमंत मुसरीफ ☆

आजीआजोबा रांगेत

किती वेळ  ते  तिष्ठत

मिळणारं  कधी  लस

उभे  राहिलेले  कष्टत

 

किती केवढा रे साठा

का उत्तर  ना  मिळत

लसघेणारे अन् साठा

समीकरणे ना  जुळत

 

घाई सकला लस देऊ

राहता  कायम  पळत

लस  पुरता  पुरेना बा

दळण राहतायं  दळत

 

लस संपली बोर्ड लाव

बसावे कारणे  टाळत

आम्ही मात्र सहन करे

मुळीचं नाही कंटाळत

 

तीचं ती धुणी  धुवावी

लक्तरे घालावी वाळत

लाईनमध्ये उभे आम्ही

रे आशेने लाळ गाळत

 

गुळमुळीत  तीचं उत्तरे

बसा  निवांत उगाळीत

हात हलवी परत  जाई

काहीचं नसते झोळीत

 

© श्री हेमंत मुसरीफ

पुणे

मो  9730306996

  www.kavyakusum.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 43 ☆ अभंग … ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 43 ☆ 

☆ !! अभंग.. !! ☆

जन्माचे सार्थक, आपुल्याच हाती !!

आठवावी स्मृती, पूर्वजांची…०१

 

स्मरण चिंतन, सतत करावे !!

बंधन पाळावे, सर्वपरी…०२

 

व्यर्थ बडबड, थांबवून द्यावी !!

तयारी करावी, भजनाची…०५

 

अन्यवार्ता जीवा, नकोच करणे !!

ओठासी घालणे, कुलूप हो…०६

 

मोजके बोलावे, सत्यच वदावे !!

मना आवरावे, पुन्हा-पुन्हा…०७

 

जीवन अमोल, खर्च होय पहा !!

नर्क आहे महा, मृत्यू पाठी…०८

 

म्हणोनी सांगणे, इतुके बोलणे !!

सत्कार्या कारणे, कार्य करा… ०९

 

कवी राज म्हणे, योग्य ज्ञान घ्यावे !!

बाकीचे सांडावे, कायमचे…१०

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाण मानवा… ☆ श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ जाण मानवा… ☆ श्री आनंदहरी ☆

जाण मानवा, जाण अजूनही, तुझे ना काही येथे

येणे, रमणे आणिक जाणे, विश्वस्ताचे नाते    

 

तुझ्या ना हाती इथले जगणे, आज उद्याचे काही

निसर्ग येथे  लिहीत असतो, किर्द खतावणी वही

जमा तुझी ना, खर्च तुझा रे, सारे इथेच राहते

 

माझे ssमाझे गिरवत राहसी, आयुष्यात तू ओळी

तुला न कळते देईल नियती क्षणी कोणत्या झोळी

जीवनाची या जाण गंगा, सुकते,भरुनी वाहते

 

प्राण तुझिया देही असता, जगत सोयरे सारे

नश्वर काया, लोभ उगा का, वृथा वाहसी भारे

काळाच्या या जात्यामध्ये अवघे भरडुनी जाते

 

डोक्यावरचे छप्पर तुझे हे, नसते तुझ्या रे हाती,

पैसा अडका, नाती-गोती क्षण काळाचे सोबती

 नको अहं रे फुका कशाचा, होत्याचे नव्हते होते

 

स्वार्थाची अन भेदाची का जपशी भावना उरी

उधार घेतल्या श्वासांची तुज, वाटे का मनसबदारी ?

मातीतून येते दुनिया सारी,मातीतच मिळुनी जाते

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print