मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[9]

डोळे मिचकावत

काजवा

अगदी शिष्ट  आवाजात

तार्‍यांना म्हणाला

विद्वानांच्या मते

उध्वस्त  होणार आहात

तुम्ही सारेच्या सारे

आज ना उद्या’

तारे?

काहीच बोलले नाहीत.

 

[10]

तुझ्या प्रार्थांनागीतांमध्ये

पुन:पुन्हा व्यत्यय आणत

शंख करणार्‍या

या माझ्या मूर्ख इच्छा

आसक्त…. अनावर

मला फक्त ऐकू दे

हे प्रभो…

 

[11]

पाखराला व्हायचं होतं

ढग

आणि ढगाला

पाखरू

 

[12]

पार सुकून गेलं

हे नदीचं पात्र…

भूतकाळासाठी आभाराचे शब्द

सापडत नाहीत त्याला

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वि. दा. च्या स्मरणी……! ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वि. दा. च्या स्मरणी……! ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

चिरुन भिंती    भेदून कारा

वचन सागरा     धन्य मायभू.

 

अजून गर्जना   वायूत लहरे

दिशात बहरे    स्वातंत्र्यानांदे.

 

पूर्वेचा अलोक   प्रभाती सांगतो

नितचा रंगतो   पराक्रमी त्या.

 

इतिहास थोर    कर्तव्या शौर्य

हिंदवीत धैर्य     मृदाभक्तीत.

 

प्रसन्न रत्नाकर  थरथरे जळ

विनायका बळ   हिंद तीराशी.

 

शब्दांतून ऊमटे  हृदयाची भाषा

घुमवीत दिशा    सावरकर.

 

प्रार्थना सचित्ती  भूमीत अखंड

पुरुषार्थी बंड    भारतदेशा.

 

गौरवा अनंत   क्षितीजा प्रणाम

लोचनात धाम    अथांगप्राण.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी कविता ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी कविता ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

माझी कविता

पोपडतो कोंभ पर्णद्वयातून

आणि उमलते फूल कळीतून

तशीच फुलते शब्द कळ्यातून

कविता  माझी !

घुसमट होता शब्द छळांची

सैरभैर अस्वस्थ तळमळ

मुक्त होते प्रसववेदनेतून

कविता माझी !

विचार दगडावर शब्दांचे घण

घडते मूर्ती नामी त्यातून

शिल्पच साकारते सुंदर

कविता माझी !

आकाशी खेळते चंचल चपला

भेदून जाते घन ओथंबला

उतरते अलगद भूवर

कविता माझी !

स्वप्नामधली नुमजे पडझड

आठवत ती मनीची धडधड

शब्दा शब्दामध्ये मीच शोधते

कविता माझी !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विराणी ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ विराणी ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

काळा संगे सोबत करते

मुदीत मनाने आभाळ सारे

कधी बांधते पदरामध्ये

कधी मिरवते हातात तारे

 

जपण्यासाठी करायचीती

सर्व साधना करून झाली

चंद्रा सोबत एक चांदणी

ऐश्वर्याचे जगणे जगली

 

नव्हती तेव्हा कसली चिंता

परस्परांचा आधार होता

संसाराच्या पदरा मधला

गर्भ रेशमी नव्हता गुंता

 

तृप्त मनाने जगता जगता

निरोप घेणे जमेल नक्की

आठवताना भूतकाळ पण

मध्येच येते मनात हुक्की

 

आठवले की सारे आता

तनामनाची होते फसगत

दूर नभातील चंद्र अनावर

मिठीत येतो परतून अलगद

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्यवीर सावरकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्यवीर सावरकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

बॅरिस्टर होताच घेतले मातृभूचे वकीलपत्र

प्राणाहूनही प्रिय होते जन्मभूमीचे स्वातंत्र्य ||

 

मनी नित्य खूपत होती पारतंत्र्याची बेडी

क्रांतीस्तव सागरात बेधडक घेतली उडी ||

 

अंधारकोठडी एकांतात काव्यप्रतिभा फुलली

जनमानस जागृतीस्तव लेखणी दिव्य चालली ||

 

कोलू पिसला, कष्ट झेलले देश मुक्त झाला

समतेसाठी विज्ञानाचा पुरोगामी लढा दिला ||

 

तरुणपणातच केली मातृभूमीवर पतंगप्रीती

स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनुपम देशभक्ती ||

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.?? २८मे २०२१

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्वारंटीनचा अखेरचा दिवस .. ☆ डाॕ संगीता गोडबोले

 डाॕ संगीता गोडबोले 

? कवितेचा उत्सव ?

☆ क्वारंटीनचा अखेरचा दिवस .. ☆  डाॕ संगीता गोडबोले  ☆ 

 

बाहेर पाऊस पडतोय ..

आचके दिल्यासारखा ..

उगीचच कावायला झालं ..

अरे पड की जरा रपारपा ..

घे जरा मोठा श्वास ..

आणि सोड जोराने ..

आॕक्सिजन लेव्हल वाढायला नको का?

पाऊस भांबावलेला ..

म्हणजे ..

मी नक्की काय करायचं ?

या प्रश्नासरशी ..

दचकून बाहेर पाहिलं

खिडकीतून ..

खरंच ..

मला नेमकं काय सांगायचं होतं ?

आणि नेमकं कुणाला ?

मजेनं रमतगमत येणाऱ्या पावसाला ?

की सगळे प्रयत्न करुनही आॕक्सिजन लेव्हल कमीच रहाणाऱ्या ..

त्या कुणाला ?

 

पाऊस भेदरुन बिचारा..

पुरताच थांबला ..

वर आभाळ गच्च गच्च भरलेलं ..

डोळ्यांच्या कडांचा उंबरठा ओलांडायचं धाडस न करता ..

अडलेला पाऊस ..

तो ही तसाच ..

सारंच अंधुक ..अंधारलेलं ..

 

आतून भरून आलंय ..

 

पुन्हा कधी दिसणार  माझं घर ?

 

हे असं ..

 

‘सगळे’ असूनही ..

 

वाट्याला आलेलं एकाकीपण ..

 

सगळीच उलथापालथ..

आयुष्याची ..

नात्यांची ..

सावरायला वेळ द्यायला हवा ..

होईल स्थिरस्थावर कदाचित  ..

 

ढगांनी ओथंबून तरी किती काळ रहावं ?

 

पुन्हा एकवार रिमझिमता पाऊस ..

आनंदाचा वर्षाव करणारा ..

आॕक्सिजन लेव्हलही ..

नाॕर्मल झालीय

 

डोळ्यांच्या कडांचं ..

पाण्याच्या थेंबांचं ओझंही ..

नाहीसं झालंय .

 

कोव्हिडला हरवण्यात यश आलय ..

बस्स ..आत्ता ..इतकंच पुरेसं आहे .

 

शब्दसखी

© डाॕ संगीता गोडबोले

कल्याण .

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆  श्रध्दांजली – वीर सावरकरांना.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रध्दांजली – वीर सावरकरांना.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

देश स्वातंत्र्यास्तव झगडला खरा हा योगी!

ते वीर सावरकर होतेच निस्वार्थी अन् त्यागी!

तो दुस्तर कारावास भोगला आनंदे त्यांनी!

देशास्तव वर्षे अकरा व्यतीत केली अंदमानी!

 

संसार सोडूनी मांडला देशभक्ती चा संसार!

आहुती दिली सुखाची या देशासाठी अपार!

समज दिली यमुनेला देऊनी उच्च विचार!

चिमण्या- कावळ्या सम नसे आपुला जगी संसार!

 

मन कठिण करी वज्रासम त्या भोगीता यातना!

परी कुसुमादपि कोमल व्यक्त करी भावना!

काव्यसंपदा ही जणू ठेवच   दिली सर्वांना!

दाऊन दिले जगी अमर उदाहरण देशभक्तांना!

 

स्वातंत्र्योत्तर आली उपेक्षाच जरी पदरी!

ना खंत तयाची दाखवली जन दरबारी!

घेतला वसा समाजसेवेचा जो मनी!

उध्दारास्तव  अखंड झटला तो मुकूटमणी!

 

प्रणाम माझे करिते मी,

  त्या स्वातंत्र्य वीरा मन्मनी!

उंचावली ज्याने मान आपल्या,

 भारत मातेची या जनी!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदरांजली ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदरांजली ☆ सौ. नीला देवल ☆ 

वि विनायक नाम ज्यांच्या विद्वत्तेचे

ना नावासम शारदेच्या वरद हस्ताचे

 यज्ञ कुंडी स्वातंत्र्याच्या समिधा आयुष्याच्या

करी यत्न्य अखंड जाती नष्ट तेचा

दा दाता समृद्ध मराठी शब्द भांडाराचा

मो मोह त्यागिला उच्च बॅरिस्टर पदवीचा

 दशांगुळे रथ प्रतिभेचा दौडत काव्य निर्मिले कमला

रवी तेजा सम प्रखर विचारी समाज सुधारक गमला

सा सावरले पतीता पावन केले जाती नश्टूनी ऐसा साधक

 वक्ता, द्रष्टा, जन प्रबोधक, भाषा शुद्धी कार

रत अविरत स्वातंत्र्य ध्यास करण्या स्वप्न साकार

करुनी त्या ग संसाराचा ब्रिटिशांना चारी ले खडे

रवि शाशिही लज्जित झाले या दिव्य प्रखर तेजा पुढे

 

नरशार्दुल, कवी, लेखक, नाटक कार, भारत भूचा रत्नमनी

नेता, झुंजार स्वातंत्र्यवीर एकमेव ते नाव ओठावर

विनायक दामोदर सावरकर.

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तगमग… ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार 

? कवितेचा उत्सव ?

☆ तगमग… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

वेदनांचे सल आता कोंभ झाले देवा

खुड ना वेळीच त्यांना,घालू नको हवा …

नको करू मोठे त्यांना,जेरीस आले जग

विश्वभर सारी देवा, तग मग तग मग …

 

तुझ्या घरातला प्राण,प्राणवायुच संपला

कुबेराचा धनसाठा असाकसा हरपला ?

वटवाघळेच जणू, घरोघरी विसावली

अशी कशी बनली रे, विष झाली ही साऊली ?

 

लाटांवरी येती लाटा, भुई सपाट करती

अशी कशी कर्मगती, अशी कोणती रे नीती ?

जीव घालून जन्माला, का रे असा भिववतो

तुझे तांडव पाहता, जीव मेटाकुटी येतो….

 

जीवापासून तू जीव, प्रेमपाश गुंफियले

एका बीजापासूनी तू, विश्व सारे निर्मियले

एवढी का वक्रदृष्टी,तुझा एवढा का कोप?

साऱ्या दुनियेची पहा,कशी उडविली झोप

 

कसे समजावू तुला?जाता आपुले माणूस

आरपार जातो बाण,दु:ख्ख बनते रे विष

वाताहत घरोघरी,इतका तू अमानुष

गाव गाव पछाडले,जणू पोखरते घूस …

 

थयथयाट हा तुझा, देवा पचतच नाही

लेकरांना मारते ती, कशी असेल रे आई?

सारा संसारच तुझा,कर बाबा मनमानी

आम्ही सांगणारे कोण?….

                  साऱ्या विश्वाचा तू धनी ….

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 74 – आई…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #74 ☆ 

☆ आई…! ☆ 

माझ्यासाठी किती राबते माझी आई

जगण्याचे मज धडे शिकवते माझी आई

तिची कविता मला कधी ही जमली नाही

अक्षरांची ही ओळख बनते माझी आई…!

 

अंधाराचा उजेड बनते माझी आई

दु:खाला ही सुखात ठेवे माझी आई

कित्तेक आले वादळ वारे हरली नाही

सूर्या चा ही प्रकाश बनते माझी आई…!

 

देवा समान मला भासते माझी आई

स्वप्नांना ही पंख लावते माझी आई

किती लिहते किती पुसते आयुष्याला

परिस्थिती ला सहज हरवते माझी आई…!

 

ठेच लागता धावत येते माझी आई

जखमेवरची हळवी फुंकर माझी आई

तिच्या मनाचे दुःख कुणाला दिसले नाही

सहजच हसते कधी न रडते माझी आई…!

 

अथांग सागर अथांग ममता माझी आई

मंदिरातली आहे समई माझी आई

माझी आई मज अजूनही कळली नाही

रोज नव्याने मला भेटते माझी आई…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

 

 

Please share your Post !

Shares
image_print