मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू……..तोच ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ तू……..तोच ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

आयज सांजे

दर्या मेळ्ळो,

ल्हारां मेळ्ळी,

अस्ताचो सूर्य मेळ्ळो,

उदेतीचो चंद्र मेळ्ळो,

थंडगार वारो आशिल्लो,

एकुच नखेत्र लुकलुकताले.

तशे पळेल्यार

सासाय दिसपाचे सगळे आशिल्ले.

 

पुण मन इल्लेशे जालें

याद तुजी आयली

आनी मातशे उदास जालें

 

तितल्यान दर्यान पैस

रातचे वाट दाखोवपी

दिव्याचो टाॅवर दिसलो,

हांवे म्हळे……….तू तोच

काळखान उजवाड दिवपी

सदाच म्हज्या काळजान आसा.

 

 

काही शब्दार्थ:

आयज – आज, ल्हारां- लाटा

पळेल्यार – तसं बघितलं तर…

सासाय – मनःशांती,

पुण- पण, मातशे- थोडेसे,

पैस – दूर, हांवे म्हळे – मी म्हटलं,  उजवाड- प्रकाश.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 90 ☆ कधी व्हायची सकाळ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 90 ☆

☆ कधी व्हायची सकाळ 

काळ्या ढगात झाली किरणे गहाळ सूर्या

तेजोवलये घेउन मिरवी टवाळ सूर्या

 

मराठीतुनी गीता सांगे ज्ञानेश्वर हा

जीवन ओवी व्हावी येथे मधाळ सूर्या

 

समजविण्याचे दिवसच नाही आता उरले

मध्यस्थाचे फुटले येथे कपाळ सूर्या

 

किती बेसुरे जीवन झाले कसे गाउ मी

सूरच झाले सारे आता रटाळ सूर्या

 

व्यवहाराचा किती वाढला टक्का आहे

वृद्ध पोसता होणारच ना अबाळ सूर्या

 

चिपाड होता काया माझी अशी फेकली

कधीतरी मी ऊसच होतो रसाळ सूर्या

 

रथ घोड्यांचा घेउन गेला सांग कुठे तू

कधी व्हायची सांग मला रे सकाळ सूर्या

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दुली… ☆ सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दुली… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆

हृदयातला सागर

उधाणू देऊ नकोस

वरून कसा शांत रहा

मनातून विझू नकोस

*

सारे क्षण प्रसादासारखे

येता जाता वाटू नये

काही क्षण आपल्यासाठी

इथे तिथे ठेवून द्यावे.

*

शपथ म्हणजे काय रे

दोन मनांचे बंधन

श्वास जरी दोघांचे

एकच असते स्पंदन.

*

काही संदर्भ असे तसे

निरर्थक भासणारे

साध्या साध्या गोष्टीतून

उगीच हुरहूर लावणारे.

*

सूर मनात गाईले

स्वर तुझ्या ओठी आले

झंकारल्या सुरांमध्ये

मन गाणे गाणे झाले.

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 38 ☆ महिमा भक्तीचा… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 38 ☆ 

☆ महिमा भक्तीचा… ☆

(अष्ट-अक्षरी… काव्य)

(सदर रचनेमध्ये दोन दुवे आहेत… एक अष्ट-अक्षरी.. आणि दुसरे… अंत्य-ओळ…)

कसे सांगू सांगा तुम्ही

गोड महिमा भक्तीचा

भक्ती-विना होत नाही

मार्ग मोकळा मुक्तीचा…०१

 

मार्ग मोकळा मुक्तीचा

करा धावा श्रीप्रभुचा

तोच आहे वाली आता

अन्य कोणी न कामाचा…०२

 

अन्य कोणी न कामाचा

सर्व लोभी आहेत हो

अर्थ असेल तरच

मैत्री, ती  करतात हो…०३

 

मैत्री, ती करतात हो

धर्म हा लोप पावला

अंध-वृत्ती वर आली

सुज्ञ इथेच  वेडावला…०४

 

सुज्ञ इथेच  वेडावला

पाश-मोह आवळला

जाण इतुकीही न आता

ज्ञान-दीप मावळला…०५

 

ज्ञान-दीप मावळला

राज सहज बोलला

कृष्ण-भक्ती, ही सोज्वळ

स्मरा त्या श्रीगोविंदाला …०७

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साफल्य वैफल्य ☆ श्री शरद कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ साफल्य वैफल्य ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

साफल्य वैफल्य,

दोन्हींही सापेक्ष.

निरपेक्ष मन,

असो द्यावे.

 

असो द्यावे मन,

सावचित्त थोडे

अबलख घोडे,

एरव्ही हे.

 

एरव्हीचे जिणे,

जुनेच पुराणे.

ओठावर गाणे,

यावे पुन्हा.

 

यावे पुन्हा सारे,

परतून वारे

शैशवाचे तारे,

आकाशी या.

 

©  श्री शरद कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतू सोहळे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ कवितेचा उत्सव ☆ ऋतू सोहळे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सनईच्या सुरावटीने

वाटचाल सुरू झाली

ऋतुऋतुंचे सोहळे

आनंद वाटत गेली ||

 

नव्या कळ्या उमलल्या

वसंत फुलूनी आला

बाललीलांच्या संगती

धूंवाधार बरसला ||

 

कित्येक नाती जुळत गेली

फुलली जणू तारांगणे

अखंड त्यातूनी बरसते

शरदाचे सुखद चांदणे ||

 

ज्येष्ठांचे हात सूटत गेले

पानगळ धीराने साहिली

नातवंडांच्या रूपाने

सुरेख पालवी फुलली  ||

 

तुझ्या-माझ्या सोबतीने

ऋतुसोहळे सजले

संसाराचे भावविश्व

मनाजोगते फुलले ||

 

सनईचे सूर आजही

करिती साथसंगत

तुझी माझी अशीच राहो

अखंड जन्मसोबत ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 63 – सुट्टीला या तोड नाही ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 63 – सुट्टीला या तोड नाही ☆

परसात फुललेली फुलबाग ही आगळी।

सुगंधात धुंद कशी चंद्रमोळी झोपडी ।।२।।

 

भेटायला येते मला चिऊ काऊ मनी माऊ

सारेच तृप्त  कसे खावूनीया गोड खाऊ।

आजीच्या या हाताला अमृताची  असे गोडी ।।३।।

 

चिंचा बोरे फळे सारी रानमेवा अंत नाही ।

ऊस केळी डाळिंबाला खावे किती गणती नाही।

सोबतीला फौज अशी जमती सारे खेळगडी ।। ४।।

 

नाचू खेळू गोष्टी गाणी चिंता मुळीच नसे काही ।

अभ्यासाची कुरघोडी इथे मुळी चालत नाही।

स्वर्ग सुखा परि सारी सुट्टीला या तोड नाही।।५।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांचे सामर्थ्य ☆ संत ज्ञानेश्वर

 ☆   कवितेचा उत्सव ☆ शब्दांचे सामर्थ्य ☆ संत ज्ञानेश्वर ☆ 

जैसे बिंब बचकेएवढे

परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे

शब्दाची व्याप्ती तेणे पाडे

अनुभवावी.

                  – संत ज्ञानेश्वर.

सूर्यबिंब आकाराने बचकेएवढे दिसते.पण त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यही अपुरे पडते. शब्द आकाराने लहान असतो पण त्याची व्याप्ती मोठी असते.त्याच्या अर्थाच्या विस्ताराला मर्यादा नसतात.

आज  जागतिक कविता दिन

आपण सर्वांनी शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून,समजून घेऊन काव्यलेखन करण्याचा प्रयत्न करूया.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अवचित मेघ ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

 ☆ कवितेचा उत्सव ☆ अवचित मेघ ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

रेघावर रेघ

दाटूनीया मेघ

मनाचा ऊद्वेग

पाऊस रंगीत.

 

टपोरते थेंब

मोतीयाचे बिंब

अवकाळी चिंब

काळीज भिजरे.

 

आठवणी धनू

सप्तरंग वेणू

वार्यातच जणू

भावनांचे गाणे.

 

पाने-फुले धुंद

झुले शब्दगंध

धरेशी संबंध

अवेळी प्रणय.

 

वसंत फुलवा

पाऊस भुलवा

निसर्ग जलवा

अतोनात प्रीत.

 

कोकीळेचा गळा

ऋतूसंगे मेळा

पाऊसच खुळा

बरसून काव्य.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चिमण्या ☆ श्री प्रदीप कासुर्डे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ चिमण्या ☆ श्री प्रदीप कासुर्डे ☆ 

(20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने कविता)

आजी सांगायची गोष्ट

चिमणीचं घर मेणाचं

कावळ्याचं घर शेणाचं

चिऊताई चिउताई दार उघड

आज माझी आईं

माझ्या मुलीला  कोणती गोष्ट सांगेल ?

 

आई म्हणायची गाणं

एक घास चिउचा

एक घास काऊचा

आज माझी बायको

मुलीसाठी कोणतं गाणं म्हणेल ?

 

बहिणाबाईंच्या कवितेत

आम्ही वाचायचो

अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिल्लासाठी तिने

झोका झाडाले टांगला

आज आमची मुलं

कोणत्या कविता वाचतील ?

 

आज कुठे आहेत चिमण्या

लेकींप्रमाणे माहेरी तर गेल्या नाहीत ना?

 

© कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print