मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आगमन! निसर्गाचे-गणेशाचे! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ आगमन! निसर्गाचे-गणेशाचे! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सरत्या श्रावणाने,पावसाला सोडलं!

रंगीबेरंगी इंद्रधनुष्य आभाळात

अवतरलं!

 

झिमझिमणार्या पावसाने,

 विश्रांती घेतली,

अन् पाखरांची पहाटगाणी,

  झाडावर  फुलली!

 

निरागस प्राजक्ता ने,

  सडा अंथरला,

प्राजक्ती देठांचा,

  रंग उधळला!

 

चिमुकली जुई,

   दवबिंदू नी थरथरली,

तर धीट मोगरा,

  सुगंध पसरत हसला !

 

कर्दळीच्या रोपांवर,

  शालीन ,शेंदरी सौंदर्य दाटले,

अन् जास्वंदीने आपले

   नवरंग दाखविले!

 

गौरी च्या पूजेसाठी,

  रानोमाळ पसरला तेरडा,

शंकराच्या पिंडीवर,

  डुलला सुगंधी केवडा!

 

निशी गंधाची हजेरी,

  कुठे ना चुकली,

गणेशाच्या स्वागतासाठी,

  सारी फुले सजली!

 

फुलांच्या दरवळाने,

   गौरी गणेश प्रसन्न झाले,

सुगंध,तेज घेऊन,

    महिरपीत रंगले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता ! ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

साम्य वाटले मजला

PC आणि गणेशात,

सांगतो समजावून कसे

धरा तुम्ही ते ध्यानात !

 

               साऱ्या विश्वाची खबर

               लंबकर्ण कानी आकळे

               साठवी माहिती जगातून

               PCचे ते इंटरनेट जाळे !

 

सोंड मोठी वक्रतुंडाची

करी दुष्टांचे निर्दालन,

PC अँटीव्हायरस करतो

स्व जंतूचे बघा हनन !

 

               ठेवतो लंबोदर उदरात

               भक्तांच्या पाप पुण्याला,

               PCची हार्डडिस्क सुद्धा

               येते ना त्याच कामाला ?

 

स्वारी येई गजाननाची

ती मूषक वाहना वरुनी,

PCचा माऊस पण चाले

एका चौकोनी पॅडवरुनी !

 

पण

 

भले भले भरकटती

PCच्या मोह जालात,

एकच गणेश बुद्धीदाता

ठेवा कोरून हृदयात !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०९-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 88 – समर्पण ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 88 – विजय साहित्य  ✒ समर्पण !✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

तेजोवलये क्षीण जाहली

निरोप घेता घेता.

त्वरे परतुनी येईन पुन्हा

गाज सागरी सांगे जाता.

 

अनुभवाचा परीघ हवासा

रवी जातसे अस्ताला

वा-यावरती सांज सावल्या

आठवणींच्या मस्तीला.. . . !

 

बघ सोनेरी झाले पाणी

वेचून घे ते शाब्दिक मोती .

आठवणींना आले बाळसे

कण वाळूचे सरकत जाती.. !

 

असा दुरावा  आणि मिलन

रवी बिंबाचे अस्त विलेपन

अन लाटेची अवखळ मात्रा

हसते जीवन करी समर्पण. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आगमन ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आगमन ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

तयारी आगमनाची

सज्ज जाहली भारतनगरी

गणरायाच्या आगमनाची

    सुरु जाहली तयारी।।ध्रु.।।

 

दुकाने सजली मुर्ती

      अन् आभुषणांनी

लहान मोठ्या वेगवेगळ्या

   आकाराच्या रंगीत मुर्तींनी।।१।।

 

लगबग लगबग हलती सारी

    गल्लोगल्ली शेड मारती

माळा दिव्यांच्या लावुनी

     रस्ते शुभोभित करती।।२।।

 

घराघरात सुरु जाहली

    रंगरंगोटी, साफसफाई

भिंती सजल्या नक्षीदार

   त्या वेगवेगळ्या कलाकृतींनी।।३।।

 

रजा मिळवण्या सुरू

जाहली विनवणी साहेबांची

बायकांचीही गडबड गडबड

 तयारी पुजा प्रसादाची।।४।।

 

बघा गड्यांनो धरणीमाता

तिही सजली

हिरवा शालू नक्षीदार

  तो जरीच्या वेलबुट्टीचा ल्याली।।५।।

 

रुप आगळे सुंदर

 असे ह्या मुर्तींचे

आशिष देण्या धरेवरी

 या तो मुर्तीरुप अवतरे।।६।।

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बैलपोळा ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ बैलपोळा ☆ श्रीशैल चौगुले ☆

राजा मातीतला

पूजा बैलपोळा

 

कष्ट  जुंपणीत

थोर साधाभोळा.

 

ओझे नांगराचे

वा ‘जु’ गाडीगोळा

 

नसे  जन्मशीण

सेवा  रानमाळा.

 

काय आठवणी

सांगू  देवशाळा.

 

नाही बैलावीन

मृत्यू  जन्मकळा.

 

नत्  चरणांशी

माया कुरवाळा.

 

नाते सोबतीचे

संसारा  ऊबाळा.

 

डोले पिकपाणी

श्रेय   बैलदळा

 

सण  आनंदाचा

धन्य बैलपोळा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 77 – कोरा कागद…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #77 ☆ 

☆ कोरा कागद…! ☆ 

मी को-या कागदावर

नुसता शुन्य जरी काढला ना

तरी..,

बापाला त्यात विहरीच चित्र दिसत…

 

चार ओळींचा जन्म माझा

चार ओळींत जगतो

चार ओळींची ओळख माझी

चार ओळींत मांडतो…

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात्रीच्या चांदण्यात..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

 

 

? कवितेचा उत्सव ?

☆ रात्रीच्या चांदण्यात.. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

रात्रीच्या चांदण्यात प्रीत रंग रंगू दे

धुंद या वेळी हात हाती असू दे !

 

सडा प्राजक्ताचा पडेल सभोवताली

चांदण्याचे आभाळ झुकेल खाली

चार चांदण्या तुझ्यासवे वेचू दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

धुंद धुंद  ही हवा

सुगंध वाहतो  मरवा

सुगंध तुझ्या मरव्याचा आज

श्वासात जरा दरवळू दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

नको ना  दूर जाऊ असा

थाम्ब, ये जवळी राजसा

प्रीतीत चिंब होऊ दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

नकोच सजना आता दुरावा

तुझ्यासवे तो चांदवा भेटावा

मंद मंद चांदण्यात या

श्वास धुंद होऊ दे

रात्रीच्या चांदण्यात…

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 101 ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 101 ?

☆ गझल ☆

 

मिळती मला तुझीही ती पोफळी कदाचित

बसती घडी इथेही मग वेगळी कदाचित

 

काजू रसाळ असती, बागा फळाफुलाच्या

माझ्याच मालकीच्या त्या नारळी कदाचित

 

गोव्यात राहते तर होती धमाल मोठी

दिसली मलाच असती ती मासळी कदाचित

 

जन्मास घातले तू त्या कोकणात देवा

आजोळच्या घराची सय कोवळी कदाचित

 

घाटावरीच होते प्रारब्ध नांदण्याचे

बोरी ब-याच होत्या सल बाभळी कदाचित

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरता श्रावण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरता श्रावण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

आला सरता श्रावण ,

   मन माझे हुरहुरे !

वर्षेची ती रिमझिम,

   अंगणात झुर झुरे !

 

 जाई पावसाची सर ,

   भिजवी सृष्टीचा शेला!

दिसे  नभी अंगावर ,

   इंद्रधनुष्याची  माला !

 

हिरवीगार ही सृष्टी ,

   लोभवते क्षणोक्षणी!

किमया ही निसर्गाची,

    भूल घाली मनोमनी !

 

अरे, श्रावणा,श्रावणा,

  तुझे अप्रूपच मोठे !

कृष्णजन्माची ती वेळा,

   नेते आनंदाच्या वाटे!

 

सृष्टी गीत गाता गाता,

   जाई श्रावण पाऊल !

स्वागताला आतुरलो ,

   लागता गणेश चाहूल !

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरती मंगळागौरीची ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

अल्प परीचय

आयुष्याच्या मध्य वळणावर विसाव्याच्या क्षणी माझी कविता फुलली. १५० कविता केल्या आहेत. पुस्तक अजून काढले नाही. काव्यसंमेलनात वाचन केले आहे. सांगली आकाशवाणी साठी सुध्दा वाचन केले आहे…???

? कवितेचा उत्सव ?

☆ आरती मंगळागौरीची ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆ 

जय देवी जय देवी

जय मंगळागौरी

श्रावण मासी तुझे

व्रत धरीते मनी…||धृ||

 

भक्तिभावे ओवाळीन

तुज सोनिया ताटी

पूजनासी आणिली

सोळा परींची पत्री

नाना अलंकारे

शोभते शिवरमणी ||१||

 

अभ्यंग स्नानादिक

सुमनांचा भार

धूप, दीप, नैवेद्य

 

रांधीती नार

हर्षे अर्पण करिते

तू सौभाग्यदायनी ||२||

 

अर्पिते सप्रेमे

तन मन धनासी

शरणागत मी,

सेवा मानून घे माझी

कृपाळू शिवकांते

मज रक्षावे संकटी.||३||

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१/९/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares