श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
उमलावया कळ्यांची असतेच आस बाकी
मौनात आज त्यांच्या लपलाय ध्यास बाकी
योजून ठेवलेले घडले जरूर नाही
करण्यास साध्य सारे फुलतोय श्वास बाकी
खपलो जरी तरीही शेती दगाच देते
कर्जात अडकल्याचा बसतोय फास बाकी
संमृद्ध ज्ञानसाठा सरला कधीच नाही
उधळा कुणी कितीही दिसतेच रास बाकी
प्रेमात प्रेमिकांचा असतो रुबाब मोठा
संसार मांडताना होतोच दास बाकी
दडवून ठेवलेला गंधाळतोच चाफा
हळव्या मनास त्याचा कळतोच वास बाकी
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈