श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ निवृत्त ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
निवृत्त झालो कालच.……..
अन वेळ झाली तरी राहिलो घरीच .
ती लगबग..
काही राहिले का…आठवणे
उगाच पॅन्टचे खिसे चाचपडणे
पाकीट,चाव्या,रुमाल आत असूनही
उगाच त्यावरून हात फिरवणे.
पुन्हा पुन्हा भिंतीवरील घड्याळात पाहणे.
“अहो……. मोबाईल घेतला ना”.
ऐकताना चार्जिंग तपासायचे
पुसलेल्या गाडीकडे उगीचच पहायचे.
कालचे महत्वाचे कागद मीच ठेवले,दिसत नाहीत म्हणून
पोरांवर ओरडायचे
अन कुणाचाही फोन कां नाही…..
मन बेचैन व्हायचे
वाढलेले अन्न,पेपर वाचत आत ढकलायचे.
आज काहीच नाही………
निवांत…..रिक्ततेची जाणीव.
एक आवाज अंतर्मनाचा
जग………स्वतःच्या आनंदासाठी
निर्भयांच्या ,असह।य्यांच्या मदतीसाठी
जग ……लढण्यासाठी,दमनाच्या विरोधाशी,
जग…….वसुधेच्या अन मानवतेच्या रक्षणासाठी
अन् वेळ झाली….
उठलो मी नव्या उमेदीने
जीवन पूर्ततेसाठी.
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈