मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 80 ☆ माणसा तू महान आहेस ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 80 ☆ माणसा तू महान आहेस ☆

माणसा तू महान आहेस

तू भुंकू शकतोस कुत्र्यासारखा

तू कावळ्यांसारखी कावकावही करतोस

कधीकधी डोमकावळ्या सारखाही वागतोस

खरंच माणसा तू महान आहेस…

 

मोरासारखा पदरपिसारा फुलवून नाचू शकतोस

डूख धरून बसू शकतोस नागासारखा

चित्त्याच्या वेगाने धावतोय तुझा मेंदू

खरंच माणसा तू महान आहेस…

 

शाखाहारी प्राण्यांसारखा पालाही खातोस आणि

सिंहासारखं मांस भक्षणही करतोस

हिंस्त्र प्राणी शिकार करतात पोटासाठी

तू मात्र स्वतःच्या स्वार्थी अहंकारापोटी

चालतोस गोळ्या, असहाय्य प्राण्यांवर,

कधीकधी आपल्या आप्तांवर सुद्धा

खरंच माणसा तू महान आहेस…

 

खरंच माणसा तू माणूस आहेस का जनावर ?

हेच कळत नाही, अजून आम्हा प्राण्यांना

पण तरीही

खरंच माणसा तू महान आहेस…

कारण संशोधनाची किमया

देवानं फक्त तुलाच बहाल केली आहे

म्हणूनच तू महान आहेस

म्हणूनच तू महान आहेस…!

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद धन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ आनंद धन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आनंदाचा मळा बहरला

विश्वाच्या या खुल्या अंगणी

लखलख तारे तेज फाकती

चंद्र विकसित नभांगणी  !!

 

रवी तेजाने प्रकाशिला हा

जगताचा भव्य गाभारा

साऱ्या चराचरा उल्हासितो

झुळझुळणारा मंदवारा !!

 

झाडाझाडातूनी विहरती

मंजुळ गाणारे किती पक्षी

हिरव्या मखमालीवरती

फुले रेखिती सुंदर नक्षी !!

 

कड्यावरुनी झेप घेतसे

प्रपात शुभ्र जलधारांचा

जीवन फुलते जळातूनी

घडा भरतो सुखस्वप्नांचा !!

 

निसर्ग किमया पाहुनीया

पारणे फिटतसे नेत्रांचे

झोळी भरुनी मुक्तपणे

ओघळते धन आनंदाचे !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्व सारे सुखी व्हावे ☆ प्रा. अशोक दास

प्रा. अशोक दास

 ☆ कवितेचा उत्सव ☆ विश्व सारे सुखी व्हावे ☆ प्रा. अशोक दास ☆ 

काळ अनंत आहे,अजर अमर आहे!

त्याच्या उदरात दिवस, महिने, वर्षे

वर्षे येतील तशी जातील चिंता कशाला?

उगीचच भूत, भविष्याचा विचार कशाला?

 

प्रत्येक नवे वर्ष वर्तमान घेऊन येते

काळ त्याला आशिर्वाद देतच असतो ना ?

कालच्या वर्षातील सारे वाईटपण संपावे

उत्तमोत्तम होते ते सगळे मनात साठवावे.

 

मागचे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेले

चांगल्याचे,वाईटाचे धडे सर्वांना देऊन गेले

अहो, पानगळ होणार म्हणून झाड कधी रडते का?

नवी पालवी नक्की येणार, मनास विश्वास नसतो का ?

 

कडकडीत उन्हाळे येतात, सर्वांना भाजून जातात

पण वर्षाऋतू येतोच येतो, सर्वांना थंड करतोच ना ?

कालचे वाईट विसरूया, चांगले ते ध्यानी धरूया

नव्याने स्वागत करताना मने उदार ठेवूया.

 

कल्याण व्हावे सर्वांचे, हीच अपेक्षा ठेवूया

विश्व अवघे सुखी व्हावे, एक आकांक्षा बाळगुया.

 

© प्रा. अशोक दास

..इचलकरंजी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता ही नच, कुणाही ठावे

 

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंगी मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

 

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र, कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

 

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 32 ☆ गंध मातीचा… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 32 ☆ 

☆ गंध मातीचा… ☆

गंध मातीचा, हृदयस्पर्शी

गंध मातीचा, मातृस्पर्शी

 

गंध मातीचा, सप्तरंगी

गंध मातीचा, चिरा चौरंगी

 

गंध मातीचा, मनास भुलवी

गंध मातीचा, तेज वाढवी

 

गंध मातीचा, मातृस्पर्श जैसा

गंध मातीचा, मोगरा फुलला तैसा…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दुली….. ☆ सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दुली….. ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

आकाशात    अचानक

ढग भरूनीया आले

आणि डोळ्यातून माझ्या

असे कसे कोसळले?

*

चार शब्द तुझे आणले

चार  शब्द माझे आणले

बांधला त्याचा झुला

अन् आभाळपर्यंत पोचले

*

प्रत्येक नव्या ओळखीतून

नवे नाते अंकुरले

आणि मग नकळत

जीवन उमलून आले.

*

असे कसे मन माझे

रानावनात रमते

माणसांच्या गर्दीतही

मुके मुकेच राहते.

*

नको माणसांचा संग

नको घराचा निवारा

गच्च हिरव्या रानात

फुटे सुखाला धुमारा.

*

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 62 – सांजवारा ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #62 ☆ 

☆ सांजवारा ☆ 

अताशा अताशा जगू वाटते

तुझा हात हाती धरू वाटते.

 

नदीकाठ सारा खुणा बोलक्या

तुझ्या सोबतीने फिरू वाटते.

 

किती प्रेम आहे,  नको सांगणे

तुझी भावबोली,  झरू लागते.

 

कितीदा नव्याने तुला जाणले

तरी स्वप्न तुझे बघू वाटते.

 

छळे सांजवारा,  उगा बोचरा

नव्याने कविता,  लिहू वाटते. . !

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ हुर्डा पार्टी ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

?? हुर्डा पार्टी  ??

लोकमान्य हास्य योग संघाच्या !

साऱ्या सख्या निघालो पार्टीला!

अहो ! कसल्या पार्टीला  ?

हुर्डा पार्टीला  ऽ.ऽ..!!

 

अहो बसा बसा लौकर गाडीत !

जाऊ मस्त गप्पा त्या ठोकीत !

चिमणचारा चाखीत !

हास्य विनोदाला येई ऊत!!

 

सोडून घरादाराची काळजी !

आज आम्ही आमच्या मनमौजी!

 

गाण्यांच्या रंगल्या की हो भेंड्या !

एकमेकींवर करतोय कुरघोड्या !!

 

गुळभेंडी ज्वारीच्या शेतातली !

खुडून कणसं आम्हीआणली !!

 

शेणकुटांची आगटी पेटवुनी !

घेतली कणसं आम्ही भाजूनी !!!

 

खाया बसलो मांडा ठोकुनी !

हुर्ड्याला दही लसनीची चटनी !

ताव मारतोय मस्त साऱ्याजनी !!

 

भन्नाटच हुर्डा पार्टी रंगली !

गाडीवाल्याची हाक कानी आली !

चला चला निघायची वेळ झाली !

अहो..चला चला निघायची वेळ झाली!!

 

लागलो एकमेकींना उठवायला !

हुर्डा खाऊन जडपणा आला !!

 

पण. ! मस्त झाली आपली हुर्डा पार्टी !

सख्यांनो..सांगा बरं.ऽऽऽ..

पुढली कुठं रंगणार आपली पार्टी !!

अहो पुढली कुठं रंगणार आपली पार्टी……हा..हा..हा..हा..

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

दिनांक:-९-१-२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कसे जगावे…. ? ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कसे जगावे…. ? ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

कसे जगावे, कसे जगावे ?

कसे जगावे, कसे जगावे ?

असे जगावे, असे जगावे.

 

जन्मदात्यांचा अभिमान असावे,

जोडीदाराची खंबीर साथ व्हावे,

मुलांसाठी कर्तव्यदक्ष सावली असावे,

नातवंडांसाठी प्रेमळ हाक व्हावे,

इष्टमित्रांसाठी मदतीचा हात असावे,

कुणाच्या पाठीवरची प्रेरक थाप व्हावे..

 

ईश्वराचे लाडके होऊन रहावे,

पडणार्‍यास आधार असावे ,

चुकलेल्यास वाट व्हावे..

 

चंदनाचा वृक्ष व्हावे,

आसमंतास सुगंधित करावे,

पोळलेल्यास सुखवावे..

 

मंडळी,

असे जगावे, असे जगावे,

सत्श्रद्धा जपत,

श्रद्धास्थानच होऊन जावे,

जगण्याचा आदर्श व्हावे.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – आद्य पत्रकार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

स्व बाळशास्त्री जांभेकर जयन्ती निमित्त 

(जन्म  – 6 जानेवारी 1812 – मृत्यु – 18 मे 1846)

☆ विजय साहित्य ☆ आद्य पत्रकार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बाळशास्त्री जांभेकर

आद्य पत्रकार थोर

वृत्तपत्र दर्पणाने

जगी धरलासे जोर……!

 

सहा जानेवारी रोजी

वृत्तपत्र प्रकाशीत

शोभे पत्रकार दिन

ख्याती राहे अबाधीत…..!

 

शास्त्र आणि गणितात

प्राप्त केले उच्च ज्ञान

भाषा अकरा शिकोनी

केले बहू ज्ञानदान…..!

 

छंद शास्त्र , नीतीशास्त्र

व्याकरण, इतिहास

पाठ्य पुस्तके लिहोनी

ज्ञानमयी दिला ध्यास….!

 

पुरोगामी विचारांनी

केले देश संघटन

विज्ञानाचे अलंकार

अंधश्रद्धा उच्चाटन….!

 

स्थापियले ग्रंथालय

ज्ञानेश्वरी मुद्रांकीत

शोध निबंध जनक

नितीकथा शब्दांकित …!

 

दिले ज्ञान वैज्ञानिक

केले कार्य सामाजिक

पुनर्विवाहाचे ध्येय

ज्ञानदान अलौकिक….!

 

भाषा आणि विज्ञानाचा

केला प्रचार प्रसार

दिली समाजाला दिशा

तत्वनिष्ठ अंगीकार…..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares