कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 28 ☆
☆ दशपदी काव्य… ☆
तूच सामावलेला, कृष्णा माझ्या अंतर्मनात
व्यापून राहिला बघ, पूर्ण तनामनात… ०१
तुझ्या-विना नाहीच कुणी, प्राचीवर मजला
सतत मारतो हाका, हे मनोहर तुजला… ०२
भवसागर भारी, अन्याय सर्वत्र फोफावला
सत्य लोप पावताना, नात्याला मार बसला… ०३
क्षणभंगुर जीवनात, आधार ना कधी सापडला
आस केली जेव्हा, हात सर्वांनी आखडला… ०४
म्हणौनि सांगणे हेच देवा, केशवा माधवा श्रीधरा
अंतिम समयाला माझ्या, यावे तूच दामोदरा… ०५
© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈