मराठी साहित्य – कविता ☆ विजयादशमी पर्व विशेष ☆ दस-याच्या दिनी .. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं।आज विजयादशमी पर्व पर प्रस्तुत है एक कविता  “दस-याच्या दिनी .. . ! )

☆ विजयादशमी पर्व विशेष ☆ दस-याच्या दिनी .. . !  

दस-याच्या दिनी

पाहू नको मागे

पंख प्रयत्नांचे

जाणिवांचे धागे. …!

 

दस-याच्या दिनी

दुष्कर्माचा नाश

सीमोलंघनाचे

निरभ्र आकाश….!

 

दस-याच्या दिनी

आपट्याचे पान

ऐकुयात सारे

ह्रदयाचे गान…..!

 

दस-याच्या दिनी

बीज विचारांचे

प्रतिभेचे विश्व

रोप जीवनाचे. ….!

 

दस-याच्या दिनी

हाक अंतराची

झेपावली भाषा

ओढ काळजाची. …!

 

दस-याच्या दिनी

ग्रंथ पुजा करू

माता शारदेचे

रूप ध्यानीं धरू…!

 

दस-याच्या दिनी

संस्कारांचा पाया

यश कर्तृत्वाने

उजळावी काया. ….!

 

दस-याच्या दिनी

काव्या रूप यावे

लेकीसवे बापा

जगी ओळखावे. …!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवीचे नवरंगी नवरात्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव ☆ देवीचे नवरंगी नवरात्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

पहिल्या माळेला रंग करडा,

देवीला देऊ या मानाचा विडा!

दुसरी माळ सजे केशरी रंगाने,

सजवी देवीला झेंडूच्या हाराने!

पांढऱ्या रंगाची माळ तिसरी,

पावित्र्य घेऊन आली साजरी!

लाल रंग घेऊन चौथी माळ आली

जास्वंदीची लाली देवीच्या गाली!

पाचव्या माळेला निळे आभाळ,

कुंकुमार्चनाने खुले देवीचे भाळ!

शेवंतीची फुले वाहू सहाव्या माळेला,

पिवळ्या रंगाचा शालू शोभे देवीला!

सातव्या माळेला हिरव्या ची किमया,

देवीला भरू या बांगड्या हिरव्या!

आठवी माळ करी जांभळ्याची उधळण!

देवीला खेळाया मंदिराचे प्रांगण!

नववी माळ सजे गुलाबी रंगाने,

देवी सौख्य देई गुलबक्षी साजाने!

नवरंगाची पखरण होई नऊ दिवस,

दसर्यास सज्ज होई देवी सीमोल्लंघनास !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ न्यूज पाहून सुचले सारे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ न्यूज पाहून सुचले सारे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(हरघडी ‘ब्रेकींग न्यूज’ पाहून तत्काल ‘टुकार’ विडंबनाच्या जिलबया पाडणार्‍या सर्व ‘सुमार’ कवींना समर्पित. मूल गाणे – शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले)

 

न्यूज पाहून सुचले सारे, ‘टुकार’च्या पलिकडले

प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले.

अर्थ नवा काव्यास मिळाला’

बूट जुना पण गाल सुजला

त्या दिवशी का प्रथमच माझे ‘विडंबन’ अडखळले.

जुळवितो यमकांना रात्री

लक्ष विचार सुचतील खात्री

‘विसंगती’त या विश्वाच्या, रहस्य मज उलगडले।

न्यूज पाहून सुचले सारे, ‘टुकार’च्या पलिकडले

प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले.

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ८ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -८ ?

!!श्रीराम समर्थ!!

देवी महिषासुरमर्दिनी

श्रीक्षेत्र तुळजापूर येथे

नवरात्रातील महाष्टमीला -श्रीतुळजा भवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा बांधली जाते.

देवी भगवतीने महिषासुराचा वध कसा केला याचे वर्णन आज मुक्तछंद काव्यात गुंफून आई भवानी मातेच्या चरणी सविनय अर्पण! इदं न मम !!

?? ?☘️???

 

त्रिभुवन सुंदरी आदिमाया पार्वती!

रविकिरणांसम तेजोमय कांती !

गळा मुण्डमाळा जपमाळा एका हाती !

कमलासनस्थिता जगदंबा भगवती!

महिषासुरा वधण्या देवांनी दिली शक्ती!!

 

आला धावून महिषासुर सेनापती चिक्षूर!

करी वर्षाव बाणांचा देवी भगवती वर !

भगवतीने केले बाणांनी चिक्षूरास जर्जर !

चिक्षूराने फेकला त्रिशूल भद्रकालीवर !

चिक्षूरदैत्याचा केला तिने चक्काचूर !!

 

होताच चिक्षूराचा वध आला धावून चामर

त्रिनेत्री देवीने गदाप्रहारे केला त्याचा चक्काचूर !!

 

ताम आणि अंधक दैत्याना बाणांनी मारिले!

उग्रवीर्य महाहनू यांची मस्तके उडविली आकाशी त्रिशूले !

उग्रदैत्यास वृक्षपाषाणाने करालास मुष्टिप्रहारे!

उग्रास्य उग्रवीर्य महाहनू दैत्यांच्या मुंड्या उडविल्या तलवारे !

मुंडके बिडालाचे धडावेगळे केले तलवारे !

दुर्धर-दुर्मुख यांची वाट यमलोकी बाणप्रहारे !!

 

ऐकून हाहा:कार महिषासुर झाला चिंताक्रांत !

रुप घेऊनी रेड्याचे थैमान घातले रणांत!

हल्ला केला सिंहासनी देवी झाली क्रोधित !

हाती घेऊन त्रिशूल धावली महिषासुरावर !

पकडून पायी चेपिले केला शूलप्रहार मानेवर !

अखेर मोहित करून खड्गे मारिला महिषासुर!!

 

आनंदी झाले सर्व त्रिभुवन सुरवर !

देवतांना संजीवन देणाऱ्या मातेचा केला जयजयकार !!

 

आई महिषासुरमर्दिनीचा उदोउदो

आई भवानीचा उदोउदो

आई जगदंबेचा उदोउदो

आई अंबाबाईचा उदोउदो

आई रेणुकेचा उदोउदो

 

उदो उदो उदो उदो उदो उदो उदो ऽऽऽ

!!श्रीजगदंबार्पणमस्तु!!

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 58 – रंग…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #58 ☆ 

☆ रंग…! ☆ 

आई . . . .

मी चित्र काढत असताना

तू..

माझ्या आयुष्यात भरलेले

सारेच रंग..

मी चित्रात भरण्याचा

प्रयत्न करतो… .

पण..

कितीही प्रयत्न केला..,

तरी

तू माझ्या आयुष्यात

भरलेले सारेच रंग

मला चित्रात भरणं

कधी जमलंच नाही

कारण…

तू माझ्या आयुष्यात

भरलेल्या रंगापुढे

हे रंग नेहमीच

अपुरे पडतात…!

अपुर्ण वाटतात. . . !

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ईमान ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ ईमान ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

येवो मरण कधीही,

निघो कधीही फर्मान,

शब्दांशी ईमान,

असो देवा./

 

देण्या हयात दाखले,

ठरो लिखाण पुरेसे,

एरव्हीचे जिणे,

परिशिष्ट/

 

काही संकल्प-विकल्प,

बाकी उमर अत्यल्प,

कवी म्हणून ओळख,

राहो नित्य/

 

करा झणी अवलंब,

नको उगाच विलंब,

भरा अनुशेष,

दयाघना/

 

©  श्री शरद कुलकर्णी

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 11 – कविता ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 11 ☆

☆ कविता ☆

आपण समजतो तेवढी सोपी नसते कविता

भावनांचा उद्रेक होतो तेव्हा जन्म घेते कविता

तुम्ही नाहीयेत तिचे जन्मदाते बाबांनो

उलट तिच्यामुळे तुमचा होतो जन्म  कवी म्हणून मित्रांनो

कविता म्हणजे असतं एखाद्याचं जिवंतपणे जळणं

कविता म्हणजे काळजातला खंजीर स्वतः ओढून मरणं

कविता असते बाणासारखी रुतणारी

छातीत घुसून पाठीतून आरपार निघणारी

कविता म्हणजे पायातला न दिसणारा काटा

कविता म्हणजे भावनांना हजार लाख वाटा

कविता म्हणजे असतो काळजावरला घाव

कविता म्हणजे असतो एक मोडलेला डाव

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

17/05/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ७ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -७ ?

!!श्रीराम समर्थ!!

नवरात्री शुक्रवारी

सण आला मांगल्याचा

ओटी भरा सवाष्णींची

थाट माट सौभाग्याचा !!

 

घालू सवाष्ण भोजन

अहो शिजवू पुरण

पुरणाच्या दिव्यातुनी

करु देवीस औक्षण !!

 

मागू जोगवा अंबेचा

मांडू अष्टमी जागर

माता रेणुका भवानी

फुंकू भक्तीची घागर

 

अंबा प्रगट हो झाली

घटामध्ये विसावली

नवधान्ये समृद्धीची

आनंदाने उगवली !!

 

अंबा माय तू भवानी

कृपादृष्टी तुझी मोठी

षडरिपू केले चूर

भक्तांच्या कल्याणासाठी !!

 

बोध संबळ घेऊन

ज्ञानज्योती पाजळल्या

हाती ज्ञानाच्या दिवट्या

गोंधळाने जागवल्या

 

कामक्रोध हे राक्षस

सत्वगुण तलवार

केले अंबेने मर्दून

असुरांचे हो संहार !!

 

छत्रपती शिवरायांना

तलवार भेट दिली

धर्म रक्षणाच्या साठी

माय भवानी धावली !!

 

छत्रपती शिवरायांना

आशीर्वाद द्यावयाला

आली तुळजाभवानी

किल्ले प्रतापगडाला !

 

उदे गं अंबे उदे…

उदे गं अंबे उदे….

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्पंदन ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ कवितेचा उत्सव ☆ स्पंदन ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

असं एक अवकाश असावं जिच्यात उंच भरारी मारता यावी ।

असे एक ध्येयाचे शिखर असावे

जे गाठताना देहभान हरपून जावे ।

असा एक सूर मिळावा

ज्यामुळे जीवनाचे गाणच बनून जावं ।

असे सोबती भेटावेत

ज्यांच्या साथीनं सारी मैफिलच रंगून जावी ।

अशी एक मैत्री असाव जिचा हात हातात येताच,

काट्याकुट्यांची आणि भयानक वाटणारी वाट हिरव्यागार वनराईच्या गालीच्या प्रमाणे वाटावी ।

आयुष्य म्हणजे असा एक सामना असावा

की शेवटच्या बॉलमध्ये पण मॅच जिंकता यावी ।

एक विचार मनात यावा की ज्यामुळे जादुगाराने फिरवलेल्या काठी प्रमाणे सारे आयुष्यच बदलून जावे ।

असे एक संवेदनशील मन हवे , ज्याने मुंगीचेही मनोगत जाणता यावे । असा एक भूतकाळ असावा,

त्याच्या रम्य आठवणीत रमताना, रोमांचित होताना भविष्यातलया सगळ्या चिंता विसरून जाव्या ।

असा एक वर्तमानकाळ हवा, की ज्याच्यात भूतकाळ आणि भविष्य काळाचा सुंदर संगम साधता यावा ।

असे एक जिंकण्याचे स्वप्न हवे, की जे साकारताना

पराभवाचे आणि अपयशाचे बळ संपून जावे ।

असं एक कर्तृत्व हवं, की ज्याच्याकडे बघताना

आई वडिलांना अभिमान वाटावा ।

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ६ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतेचे मंदिर स्थापनेपासून व त्यानंतरचे पेशवेकालीन वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये गुंफलं आहे.

रुणुझुणुत्या पाखरा

या चालीवर म्हणून पहाव्यात खूप छान वाटतात.

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -६ ?

!!श्रीराम समर्थ!!

 

जोगेश्वरी तांबडी ती

ग्रामदेवता पुण्याची

ग्राम संरक्षक देवी

वर्षे तीनशें पूर्वीची !!

 

आहे उल्लेख पुराणीं

नाम तिचे योगेश्वरी

रुप प्राकृत तियेचे

शोभे नाम जोगेश्वरी !!

 

वध ताम्रासुराचा तो

पराक्रम करणारी

चतुर्भुजा स्वयंभू ती

नवसाला पावणारी !!

 

हाती डमरु त्रिशूळ

पानपात्र नि मुंडके

ताम्रासुरास वधून

रुप आगळे झळके !!

 

मूर्ती रहस्य आख्यान

जीव शिव एकरुप

पुण्यामध्ये स्थिरावले

जोगेश्वरी निजरुप !!

 

दिले खाजगीवाल्यांनी

बांधुनिया देवालय

जिवाजीने दिली जागा

उभे राहिले आलंय !!

 

झाले प्रसिद्ध मंदिर

येता पेशवे पुण्याला

भट श्रीवर्धनकर

आले पुण्य उदयाला !!

 

होते दुर्मिळ दर्शन

दूर होती योगेश्वरी

पुण्यामध्ये विसावली

जगन्माता जोगेश्वरी !!

 

लग्न मुंजीच्या अक्षता

येती वाजत गाजत

जोगेश्वरी आशीर्वाद

करी लक्षुमी स्वागत !!

 

रमा सगुणा पार्वती

पेशव्यांचा राणीवसा

राधा आनंदी जानकी

जोगेश्वरी वाणवसा !!

 

दिली अक्षत देवीस

लग्न द्विबाजीरावांचे

अमृत नी विनायक

व्रतबंध पेशव्यांचे !!

 

माधवराव पेशवे ते

जातायेता मोहीमेस

जोगेश्वरी देवालयी

येत होते दर्शनास !!

 

जोगेश्वरी पालखीत

सणावारी मिरविते

पेठेपेठेतुनी माता

मुख दर्शन दाविते !!

 

नवरात्री जोगेश्वरी

जाई तुळजापुरास

पेशव्यांचा लवाजमा

भवानीच्या दर्शनास !!

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares