मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विरह… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

विरह… सौ. वृंदा गंभीर

तूझ्या प्रेमास मी भुलाले

तुझ्या शब्दात मी अडकले

केला नाही विचार कुणाचा

तुझ्यावर विश्वास ठेवत गेले

 *

तुझ्याकडे मी ओढत गेले

तुझ्याविना जगणे विसरून गेले

जात नाही दिवस एक ही असा

तुझ्या आठवणीत रडत राहिले

 *

प्रेम करायला का शिकवले

स्वप्न मनास का दाखवले

द्यायचा होता हा विरह मला

साथ देण्याचे का वचन दिले

 *

तुझ्या प्रेमात वाहून गेले

तुझ्या सहवासात रमुन गेले

नको करू विचार तू वेगळा

प्राण माझे कंठात आले

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 198 ☆ बंधनातून मुक्त ही होतात !! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 198 ? 

☆ बंधनातून मुक्त ही होतात !! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अंत्यओळ काव्य)

तुझ्यानंतर तुझे इथे काही नाही

तुझ्यानंतर, तुझे नावं उरतं नाही

कशाला गर्व करतो वेड्या मनुजा

तुझेच तुला शिवत ही नाही.!!

*

तुझेच तुला शिवत ही नाही

तुझ्यापाठी राखही उरत नाही

छी थू करतात सर्व तुझ्यावर

अंघोळीला पाणी तापत नाही.!!

*

अंघोळीला पाणी तापत नाही

आहे तसेच मढ्यावर ओततात

लवकर उरकवून प्रस्तुत विधी

तुझ्या घराला रिक्त करतात.!!

*

तुझ्या घराला रिक्त करतात

कपडे ही जाळून टाकतात

पैसा अडका सोडून बाकी

तुझ्याच सवे, रवाना करतात.!!

*

तुझ्याच सवे रवाना करतात

दहा दिवसाचे सुतक पाळतात

डोक्यावरचे केस काढून

बंधनातून मुक्त ही होतात.!!

*

बंधनातून मुक्त ही होतात

सत्य घटना इथे मांडली

जीवनाचा प्रवास भयंकर

राज-शब्द, कविता प्रसवली.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

तितीक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित दशदिवशीय नवरात्र काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे नवरात्रातील प्रत्येक दिवसासाठी एक आणि दसऱ्यासाठी एक अशा एकूण दहा काव्यरचना स्पर्धेसाठी मागवलेल्या होत्या, आणि सगळ्या रचना विचारात घेऊन क्रमांक ठरवण्यात आले. उज्ज्वलाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 

– आजच्या अंकात वाचूया त्यातील त्यांची एक पुरस्कारप्राप्त कविता – “सीमोल्लंघन करू…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

?कवितेचा उत्सव  ?

सीमोल्लंघन करू… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‌ नवरात्रीचे दिवस, 

 आगमन दसऱ्याचे !

 रंग,रूप नव रीती,

 जगी या आचरण्याचे !..१

*

 सीमोल्लंघन करू या,

 दुष्ट अनिष्ट प्रथांचे !

 स्वागत आपण करू,

 नित्य नूतन जगाचे !….२

*

 देवी शारदे स्फूर्ती दे,

 साहित्य नवे लिहावे !

 उदासी मनाची जावी,

 कार्य नवे आचरावे !…३

*

  रामायण ते दाखवी ,

  अन्यायाचे निर्दालन!

  महाभारत शिकवी ,

  दुष्टांचे व्हावे दमन !…४

*

  इतिहासातून घ्यावा ,

  बोध मनी घटनांचा !

  दुष्ट शक्तींना मारून,

  विजय व्हावा सत्याचा !…५

*

 सीमोल्लंघन करूनी,

 वाट पुढील पहावी !

 आयुष्यात प्रत्येकाच्या,

 नवीन पहाट व्हावी !…६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निराळे कायदे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ निराळे कायदे…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(आनंदकंद)

भागीरथीत जाती पापे कितीक धुतली

होते मलीन ती जर आहे प्रथाच  इथली

 *

रानात सिंह राजा प्राणीच भक्ष्य त्याचे 

मांडून कायद्याला टाळी तुम्हीच पिटली

 *

वाटे कुणास नारी अन्याय सोसणारी

केले असूर मर्दन तेव्हा सुखात निवली

 *

विश्वास ठेवला पण त्यानेच घात केला

नात्यास शुद्ध म्हणतो जाणून लाज विकली

 *

मिळतो बरा तुम्हाला बाहेर न्याय सहजी

न्यायालयात माझी नाणी बरीच झिजली

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ.सतीश शिरसाठ

? क्षण सृजनाचे ?

थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर  मुक्त पध्दतीत एक कविता लिहीली आहे. 👇🏻

☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी टाॅवर  ब्रिज

ब्रिटिश राजसत्तेला

अभिवादन करताना

मध्यातून  मुडपणारा.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी लंडनब्रिज

मुखवटे घालून फिरणा-या

शेकडो  माणसांच्या

घामांत भिजलेला.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी एक भिकारी

कळकटलेल्या कपडयांवर

फेकलेली नाणी

गोळा करताना.

© प्रा. डाॅ. सतीश शिरसाठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नातवंड…  कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नातवंड…  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

नातवंड म्हणजे काय चीज असते

आजी-आजोबांमध्ये दडलेलं सॅण्डविच असते

 *

नातवंड म्हणजे काय चीज असते

आई रागावली की आजीकडील धाव असते

 *

नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा

पाळण्यातून अलगद काढून घ्यावा

 *

नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी

पुस्तकात जपलेली पानावरची जाळी

 *

नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद

सगळ्या चवींना बांधतो एकसंध

 *

नातवंड म्हणजे खव्याचा पेढा

अखंड आनंद घ्या हवा तेवढा

 *

नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम

तिसऱ्या पिढीचा असतो उगम

नातवंड म्हणजे आनंद तरंग

आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग

कवी : अज्ञात

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ धन्य तू गं बहिणाई… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ धन्य तू गं बहिणाई ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

निरक्षर तुज कसे म्हणावे

शब्द खजिना तुजपाशी

सरस्वतीचा हात शिरावर

चराचराशी संवाद साधशी ….. 

*

  चुलीवरचा तवा सांगतो

  तुजला जीवन तत्वज्ञान

  सुगरणीचा खोपा बोलतो

  तुला ग सामाजिक ते भान …… 

*

  कपाळ पडले उघडे पण

  सृजनतेने  शेतात  कष्टता

  सोने पिकवीत तू राबता

  सहजतेने सुचल्या कविता …… 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत नव्याने… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ स्वागत नव्याने सुश्री नीलांबरी शिर्के 

रोज रात्री झोपल्यावर

उद्या उठूच असे नसते

म्हणूनच रोज सकाळी

नव्या सुर्याचे दर्शन घडते

*

 म्हणून रोजचा दिवस नीत्

 संपतो म्हणूनच जगायच

 आपली चांगली आठवण

 मागे राहीलस वागायच

*

 जे वाईट साईट बोलतात

 त्यांचे विचार त्यांच्यापाशी

 वाईट वागण खोट बोलणं

 ज्याच कर्म त्याच्या पाशी

*

 उगाच आपण झुरत राहून

 फरक कधीच पडत नसतो

 बाकीच्यांचा विचार करत

 मनस्वास्थ हरवून बसतो

*

 म्हणून आपणआता यापुढे

 आजचाच दिवस जगायच

 उद्या दिवस असेल आपला

 नव्याने स्वागत करायच

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

पहाटें पहाटें मला जाग आली,

तुझी याद ओल्या, सुगंधात न्हाली ।।ध्रु।।

*

वरी लाल आरक्त प्राची नवेली,

कुणी मुग्ध ललना, जणू लाज ल्याली,

समिरातूनी रंग शिंपीत गेली ।।१।।

*

जरी मध्यरात्री, तुझी साद आली,

परी मंचकी, मुक्त एकांत भाळी,

असें भास ह्रदयांस, या नित्य जाळी ।।२।।

*

झुलावे फुलारुन, वाटें कळ्यांना,

परी मर्म याचे, तुला आकळेनां,

म्हणूनच रात्र ही, निःशब्द झाली ।।३।।

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीता जन्म दिन… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

गीता जन्म दिन ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(गीता जयंती विशेष -11 दिसंबर 2024)

जन्म झाला गीतेचा,

कुरुक्षेत्री युद्ध स्थळी !

कृष्ण अर्जुनाचे नाते,

उमगले ते त्यावेळी !

*

अर्जुन झाला हतबल,

कृष्णास ते पाहवेना!

उपदेश पार्थास देता,

मधुसूदनास राहवेना !

*

जन्म दोहोंचे जाहले,

विशिष्ट अशा हेतूने !

महाभारत ते घडले,

परब्रम्हाच्या साक्षीने!

*

बालपण तुझे कृष्णा,

गोकुळी खेळात रंगले!

गोकुळ सोडूनी जाता ,

कर्तव्यास तू वाहून घेतले!

*

 द्रौपदी होती मनस्विनी,

तशीच ती स्वाभिमानी!

नकळत तिच्या कृत्याने,

 झाली युध्दास कारणी !

*

कोणास जाणीव होती,

भविष्यात काय घडेल?

असहाय होता हे जाणून,

घडणारे कधी न चुकेल !

*

गीता धर्म सांगताना ,

अठरा अध्याय वदले!

ज्ञानामृत ते देताना ,

मागे काही न राखले !

*

गीता निरंतर मार्गदर्शक ,

पठण करू या गीतेचे !

सर्वांसाठी लाभदायक,

सार्थक होईल जन्माचे !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares