मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अत्यंत भावुक कविता “तिला खात्री आहे…!” द्वारा कोरोना पीड़ितों की सेवा में सेवारत निःस्वार्थ सेवाकर्मी का अंतर्द्वंदद्व।)
मैंने इस कविता का हिंदी भावानुवाद करने का प्रयास किया है। इस लिंक पर क्लिक कर आत्मसात करें>> हिन्दी कविता ☆ उसे विश्वास है ….! ☆ हेमन्त बावनकर
☆ कविता – तिला खात्री आहे…! ☆
आज आणखी चार
करोना ग्रस्त रुग्ण
हाँस्पिटल मध्ये
भरती करून घेत असतानाच
बायकोचा फोन आला..
गेल्या पंधरा दिवसांत
तिचा ठरलेला तोच प्रश्न तिन विचारला
आज तरी तुम्ही
घरी येणार अहात का…?
हे ऐकल्यावर….,
डोळ्यांच्या पापण्यांवर
जमा झालेल पाणी ओघळून
तोडांवर लावलेल्या मास्क च्या
आत कधी गेल कळलंच नाही
मनात आलं
आजचं सोड
ही करोना ची महामारी बघता
मी पुन्हा घरी येतोय की नाही
माहीत नाही….,
गेले पंधरा दिवस मी काहिच न बोलता
फोन ठेऊन देतोय…
पण ती मात्र रोज फोन करून
तिचा ठरलेला प्रश्न विचारल्या
शिवाय रहात नाही…
कदाचित…
तिला खात्री आहे
मी पुन्हा घरी येईन याची…!
….©सुजित कदम
मो. ७२७६२८२६२६