मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य #1 – राऊळ…. ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। श्री सुजित जी ने हमारे  इस स्तम्भ के आग्रह को स्वीकारा इसके लिए हम उनके आभारी हैं।  अब आप उनकी रचनाएँ  “साप्ताहिक स्तम्भ – सुजित साहित्य” के अंतर्गत  प्रत्येक गुरुवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता  राऊळ….”)

 

☆ सुजित साहित्य #1 ☆ 

 

☆ राऊळ…. ☆ 

 

जाऊ नको खचूनीया

टाक पुढेच चाहूल

येते आहे मागावर

सुख शोधीत पाऊल. . . . !

 

सुख सोबती घेताना

नको जाऊ हुरळून

माय तुझी रे पाहते

यश तुझे दारातून. . . . !

 

फुलापरी वाढवले

काळजाच्या तुकड्याला

खाच खळगे पाहून

थोडा जप जीवनाला. . . . !

 

दोन घडीचे जीवन

जन्म मृत्यूचा प्रवास.

नको विसरू मायेचा

एका भाकरीचा घास. . . . !

 

खण जीवनाचा पाया

नको वाकडे पाऊल

यशोमंदिराचे तुझ्या

माय बोलके राऊळ.. . . !

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #1 -शब्द माझे ☆  – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  इस साप्ताहिक स्तम्भ में अपनी काव्याभिव्यक्ति के लिए उन्होने मेरे आग्रह को स्वीकारा। इसके लिए श्री अशोक जी का आभार।  अब आप प्रत्येक मंगलवार उनकी कविता पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता “शब्द माझे” )

☆ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती ☆

☆ शब्द माझे ☆ 

 

शब्द माझे एवढे शालीन होते

सभ्यतेची आब ते राखून होते

 

वाह वा ऐकू न आली जाहलेली

आपल्या गाण्यात ते तल्लीन होते

 

देवळाच्या आत अन् बाहेर भिक्षुक

आत गुर्मी पायरीवर दीन होते

 

बोलतो भिंतीसवे कळते तिलाही

घर घराला एवढे लागून होते

 

बुरुज आता ढासळाया लागले का ?

प्रेम माझे हे कुठे प्राचीन होते

 

सांगतो ठोकून छाती या इथे मी

प्रेम का तू ठेवले झाकून होते ?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-1  उन्हाळ्याची सुट्टी ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना इस एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।   सुश्री रंजना  जी की कविताएं  जमीन से जुड़ी  हैं एवं समाज में एक सकारात्मक संदेश देती हैं।  उनके द्वारा रचित बाल साहित्य की विशेषता यह है कि वह बच्चों के साथ ही बड़ों को भी संदेश देती है।  निश्चित ही उनके साहित्य  कीअपनी ही एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज प्रस्तुत है  बाल गीत – उन्हाळ्याची सुट्टी )

? रंजना जी यांचे साहित्य #-1 ? 

 

☆ उन्हाळ्याची सुट्टी ☆

 

झाली सुट्टी उन्हाळीssss

हो झाली सुट्टी उन्हाळी , झटपट तिकीट कटवा।

मला करमेना इथे बाबा बिगीनं अजोळी  पाठवा।धृ।।।

 

या शाळेच्या नादात साल पुरा लोटला।

अभ्यास करून करून कंटाळा आई ग आला।

बसलो तयार होऊन….

बसलो तयार होऊन  , छंद वर्गाचा पत्ता कटवा ।।१।।

 

आली पाडाने बहरून मामाची आंबेराई ।

संत्री मोसंबी द्राक्षाची गणती कशाला बाई।

दोस्त कंपनी सारी…

दोस्त कंपनी सारी, झटपट सार्‍यांना भेटवा।।२।।

 

घुंगराच्या गाडीने डुलत डौलात जाईन।

डोंगर दरी खोऱ्यांची  घमाल रोजच पाहीन।

पोहू माशा परि…

पोहू माशा परि  आम्हा पहाटे बिगीन उठवा।।३।।

 

आजी आजोबाची हो, लाडाची चिमणी पोरं।

आणला मामा मामीनी झोक्याला घोटीव दोर।

उंच आभाळी झोका..

उंच आभाळी झोका अशी धमाल मनात साठवा।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ कस्तुरी ☆ –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(प्रस्तुत है वरिष्ठ साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर  भावप्रवण कविता ।  )

 

कस्तुरी

 

डोळ्यांत चांदण्यांचे आकाश पेलले मी

अपराध एक झाला सूर्यास टाळले मी

 

पाऊस ना तरीही डोळ्यांत पूर कुठला

गळक्याच पापण्यांचे हे दार लोटले मी

 

एकेक रात्र येथे वाटे युगायुगाची

स्वप्नात रोज माझ्या काटेच वेचले मी

 

ना कस्तुरी कुठेही श्वासात गंध तुझिया

क्षण तेवढे सुखाचे मोजून ठेवले मी

 

आजन्म सोसला मी येथे जरी उकाडा

छाया तुझी मिळाली ग्रीष्मात नाचले मी

 

त्यांच्या मनात होते जे डाव क्रूर काही

त्या सभ्य चेहऱ्यांच्या डोळ्यांत वाचले मी

 

हे रान केवड्याचे सांभाळले परंतू

नव्हता इलाज तेव्हा हे नाग ठेचले मी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ दान मागते धरणी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इस  कविता में  धरती माता, स्त्री और पर्यावरण के  संरक्षण  के लिए एक अद्भुत संदेश  है ।  अब धरती माँ ही हमसे दान मांग रही हैं। ऐसे विषय पर इस भावप्रवण रचना के लिए श्रीमती रंजना जी आपको एवं आपकी लेखनी को नमन।)

 

? दान मागते धरणी ?

 

वृक्षवल्ली या फुलल्या सुंदर स्वर्ग भासते  अवनी।

लाड पुरविण्या कुशीत घेई धरा नसे ही जननी।

 

अविरत शमवी क्षुधा तृषाही भरण पोषणा सजली।

अमृत रसमय फळे चाखण्या नित्य देतसे वदनी।

 

सोनेरी तव किरण भास्करा शेत शिवारी डुलती।

पहाट वारा मना भुलवितो शीतल छाया  सदनी।

 

आनंदाची करण्या उधळण  चंद्र चांदणे जमती।

नयन रंम्य त्या सोनकिड्यांनी नयन मनोहर रजनी ।

 

निसर्गास या नकोस लावू नजर मानवा जहरी।

जीव चक्र हे अखंड फिरते वसुंधरेच्या भवनी ।

 

भू जल वायू टाळ प्रदूषण दान मागते धरणी।

स्वच्छंदाने खुशाल घेई  उंच भरारी गगनी।

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ गोष्ट…..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

 

☆ गोष्ट…..! ☆

 

माझा बाप

माझ्या लेकरांना मांडीवर घेऊन

गावकडच्या शेतातल्या खूप गोष्टी सांगतो..

तेव्हा माझी लेकरं

माझ्या बापाकड हट्ट करतात

राजा राणीची नाहीतर परीची

गोष्ट सांगा म्हणून तेव्हा..

बाप माझ्याकडं आणि मी बापाकड

एकटक पहात राहतो

मला…

कळत नाही लेकरांना

कसं सांगाव

की राजा राणीची आणि परीची

गोष्ट सांगायला

माझ्या बापान कधी अशी स्वप्न

पाहिलीच नाहीत..,

त्यान..

स्वप्न पाहिली ती फक्त..

शेतातल्या मातीची आणि

पेरणीनंतरच्या पावसाची..,

त्याच्या लेखी

नांगर म्हणजेच राजा

अन् माती म्हणजेच राणी

अन् मातीत डोलणारी पिक म्हणजेच

त्यान जिवापाड जपलेली परी…,

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ शिंपल्यातला मोती ☆ –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(प्रस्तुत है वरिष्ठ साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर  भावप्रवण कविता ।  )

 

? शिंपल्यातला मोती ?

 

फेसाळत ना वरती आलो

शिंपल्यातला मोती झालो

अंधाराची सोबत होती

तरी उजळलो गोरा झालो

 

वस्त्रामधली उब मी व्हावे

जीवन सारे तुझे पहावे

लपटावे तू मला म्हणुनी

तागा झालो दोरा झालो

 

शब्दांमधले अर्थ कळाया

हवीत नाती घट्ट जुळाया

शब्द चुकीचा नको जायला

म्हणून कागद कोरा झालो

 

तिचे वागणे तापट आहे

केला माझा पोपट आहे

तापमान हे जरा कळावे

म्हणून मीही पारा झालो

 

कोमल भिंती हृदयाच्या ह्या

तुझ्या स्मृतीने फुटती लाह्या

जन्मठेप ही तुला मिळाली

तुझ्याचसाठी कारा झाले

 

पाठीवरचे केस मोकळे

शांत पहुडले जणू सापळे

जीव फुंकणे माझ्या हाती

त्यांच्या करिता वारा झालो

 

अक्षर आहे अक्षर राहो

फोडित नाही उगाच ठाहो

देशावरच्या प्रेमापोटी

भारतमाता नारा झालो

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ आकार …..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

 

☆ आकार …..! ☆ 

 

फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देताना

आयुष्याचा आकार नेहमीच चुकत गेला….

आख्खं आयुष्य गेलं

ह्या फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देण्यात

पण हे चाक कधी मला हवं तसं

फिरलंच नाही

आणि परिस्थितीला हवा तसा

आकार मला कधी देताच आला नाही

माझी लेकरं लहान असताना

त्यांची कित्येक स्वप्न मी

नाईलाजास्तव माझ्या

पायाखालच्या चिखलात तुडवत गेलो

आणि त्याच्याच स्वप्नांच्या चिखलाची

त्यांच्यासाठीच

मला हवी तशी स्वप्न दाखवत गेलो

पण आता इतकी वर्षे संभाळून ठेवलेल्या

परिस्थितीचा घडा आता

हळूहळू पाझरू लागलाय

पायाखालचा चिखलही

आता पहील्या पेक्षा कमी झालाय

कारण आता…

लेकरांनी

आपआपल्या स्वप्नांचा चिखल

आपआपल्या पायाखाली तुडवायला सुरवात केलीय

पुन्हा नव्याने परिस्थितीला

त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी….

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.

Please share your Post !

Shares

आध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता – पद्यानुवाद – तृतीय अध्याय (6) प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

तृतीय अध्याय

(ज्ञानयोग और कर्मयोग के अनुसार अनासक्त भाव से नियत कर्म करने की श्रेष्ठता का निरूपण)

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌।

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ।।6।।

कर्मेन्द्रिय निष्क्रिय मगर मन से है कोई व्यस्त

तो यह मिथ्याचार है, आडंबर मात्र समस्त।।6।।

 

भावार्थ :  जो मूढ़ बुद्धि मनुष्य समस्त इन्द्रियों को हठपूर्वक ऊपर से रोककर मन से उन इन्द्रियों के विषयों का चिन्तन करता रहता है, वह मिथ्याचारी अर्थात दम्भी कहा जाता है।।6।।

He who, restraining the organs of action, sits thinking of the sense-objects in mind, he, of deluded understanding, is called a hypocrite. ।।6।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर

[email protected]

मो ७०००३७५७९८

(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ पहिली नेत्र पल्लवी. . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा   रचित  एक भावप्रवण कविता )

 

☆ पहिली नेत्र पल्लवी. . . ! ☆

(लिनाक्षरी.)

 

नेत्र पल्लवी पहिली फुलारली

भावनेचा चैत्र तेथे विसावली.

 

भेटायचे दिले निमंत्रण खासे

नेत्रपल्लवी सावध टाकी फासे.

 

खेळ चालला युगायुगांचा छंद

दोन मनांचे , भावप्रीतीचे बंध.

 

आहे अवखळ ,नजरेची भाषा

जाते सांधत , प्रेम प्रीतीच्या रेषा .

 

एक असावी, उरात दैवी जागा.

नेत्र पल्लवी, हाच प्रीतीचा धागा.

 

क्षणी वेचले, नेत्र पल्लवी, लेणे

आठवणी या, तव ह्रदयाचे,  देणे.

 

© विजय यशवंत सातपुते

100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.

मोबाईल  9371319798.

 

Please share your Post !

Shares
image_print