मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #11 – उच्छ्वास मोगऱ्याचा ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  एवं सार्थक कविता  “उच्छ्वास मोगऱ्याचा”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 11 ☆

? उच्छ्वास मोगऱ्याचा ?

 

उच्छ्वास मोगऱ्याचा तू हा लुटून घ्यावा

प्रीतीत गंध माझ्या त्याचाच हा पुरावा

 

मेंदी, हळद, सुपारी जातील सोडुनी मज

हातात फक्त माझ्या चेहरा तुझा दिसावा

 

आकाश चांदण्यांचे मागीतले कुठे मी

तारा बनून माझ्या तू सोबती असावा

 

मज ओढ सागराची भिजवून टाकते ही

होडीत मासळीवर बरसून मेघ जावा

 

ही लाट उसळते का मेध उसळतो हा

कोण्या मिठीत कोणी लागेच ना सुगावा

 

डोळ्यांमधील वादळ बोलून सर्व जाते

ओठांत शब्द नाही हा वाजतोय पावा

 

मत्सर कशास माझा करतात चांदण्या या

बहुतेक सोबतीला त्यांचा सखा नसावा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ मैत्री तुझी माझी . . !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की एक मैत्री  दिवस  पर विशेष कविता  मैत्री तुझी माझी . . !

हम भले ही  मित्रता दिवस वर्ष में एक ही दिन मनाते और मित्रों का स्मरण करते हैं।  किन्तु, मित्रता सारे वर्ष निभाते हैं। अतः  मित्रता दिवस पर प्राप्त आलेखों एवं कविताओं का प्रकाशन सतत जारी है। कृपया पढ़ें, अपनी प्रतिक्रियाएँ दें तथा उन्हें आत्मसात करें।) )

 

☆ मैत्री तुझी माझी . . !☆

 

मैत्री फुलावी काळजातून

जीवनकाठी बहरावी

जशी पालवी शब्दातून.

मनामनातून लहरावी . . . . !

 

मैत्री अपुली अवीट गाणे

सदा रहावे ओठावरती

आठवणींचे हळवे कडवे

धून मैत्रीची रसरसती .. . !

 

तुझी नी भाझी भावस्पंदने

या मैत्रीने टिपून घ्यावी

संकटकाळी हाकेसरशी

अंतरातूनी  धावत यावी.. . !

 

संकटातल्या पाणवठ्यावर

शब्द घनांचे  अविरत देणे

हात मैत्रीचे गुंफत जाणे

मैत्री म्हणजे कोरीव लेणे . . . . !

 

स्नेहमैत्रीचा अमोल ठेवा

जपणारा तो ‘जयवंत ‘.

एक दिलासा  ‘यशवंत ‘

मित्र असावा गुणवंत.. . . !

 

काळजाचे काळजावर

अभिजात भाष्य

मैत्री  नसावे दास्य

मैत्री अवखळ हास्य .. . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 10 – सार्थक…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  साहित्य में नित नए प्रयोग हमें सदैव प्रेरित करते हैं। गद्य में प्रयोग आसानी से किए जा सकते हैं किन्तु, कविता में बंध-छंद के साथ बंधित होकर प्रयोग दुष्कर होते हैं, ऐसे में  यदि युवा कवि कुछ नवीन प्रयोग करते हैं उनका सदैव स्वागत है। प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  एक अतिसुन्दर रचना   “सार्थक…!”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #10 ☆ 

 

☆ सार्थक…! ☆ 

 

कटेवरी  हात           उभा  विटेवरी

दीनांचा   कैवारी        पांडुरंग  . . . . !

 

नाही राग लोभ         नाही मोजमाप

सुख वारेमाप            दर्शनात. . . . . !

 

रूप तुझे देवा          मना करी शांत

जाहलो निवांत         अंतर्यामी . . . . !

 

रमलो संसारी          नाही तुझे भान

गातो गुणगान           आता तरी. . . . . !

 

कीर्तनात दंग            भक्तीचाच रंग

रचिला अभंग            आवडीने. . . . !

 

भीमा नदीकाठ          सार्‍यांचे माहेर

कृपेचा  आहेर           अभंगात. . . !

 

सुख दुःखे सारी          भाग जगण्याचा

स्पर्श चरणांचा           झाल्यावर. . . . !

 

सुजा म्हणे आता        सार्थक जन्माचे

नाम विठ्ठलाचे             ओठी  आले.

 

© सुजित कदम

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #10 – हिरवी चादर ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  एवं सार्थक कविता  “हिरवी चादर”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 10 ☆

? हिरवी चादर?

 

स्वाती नक्षत्राचा थेंब

असे चातकाचा प्राण

एका थेंबात भिजतो

त्याचा आषाढ श्रावण

 

धरतीचं हे काळीज

फाटते हो ज्याच्यालाठी

भावविश्व गंधाळते

जेव्हा होती भेटीगाठी

 

तिच्या डोळ्यात पाऊस

त्याची वाट पाहणारा

त्याचा खांदा हा शिवार

तेथे बरसती धारा

 

माझ्या घामाच्या धारांना

तुझ्या धारांचा आधार

काळ्या ढेकळांची व्हावी

येथे हिरवी चादर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ मुका होता. . !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की एक भावप्रवण कविता  मुका होता. . !)

 

☆ मुका होता. . ! ☆

 

मुका रसिक म्हणूनी

कुणी हिणवले त्याला

भाषा शब्दांची बोलत

मुका होता,  कवी झाला. . . !

 

वाचा गेली अपघाती

बोलणारा मूक झाला

त्याच्या मुक्या वेदनेचा

कवितेत जन्म झाला. . . . !

 

मुकेपणा लेणे त्याचे

काव्यविश्व साकारते

एका एका शब्दातून

मायबोली  आकारते. . . . !

 

मुक्याचीच मायबोली

लेखणीत सामावली

त्याच्या काळजाची भाषा

आसवात पाणावली.. . . . !

 

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ माझे स्वप्न ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है  एक मुक्तकाव्य  विधा में भावप्रवण कविता माझे स्वप्न। 

 

☆ माझे स्वप्न ☆

 

मला वाटते एक सुंदर झाड मी व्हावे !

कुणीतरी मातीत मला रुजवावें !

त्यावर झारीने पाणी फवारावे !

मग मी मस्त तरारावें !

मी एक सुंदर झाड मी व्हावे !!१!!

 

फुटावित कोवळी पाने !

कसा हिरवागार जोमाने !

दिसामाजी मी वाढतच जावें !

मी एक सुंदर झाड व्हावें !!२!!

 

यावीत सुंदर सुगंधी फुले !

तोडाया येतील मुलीमुलें !

होतील आनंदी मुलें !

मुली आवडीने केसात माळतील फुले !

होई आनंदी माझे जगणें !!३!!

 

येतील मधुर देखणी फळे !

पक्षी होती गोळा सारे !

आनंदाने खातील फळे !

चिवचिवाट करतील सारे !!४!!

 

गाईगुरे येतील सावलीत !

बसतील रवंथ करीत !

झुळुझुळू वारे वाहतील !

चहूकडे आनंद बहरेल !!५!!

 

मला भेटण्या येतील वृक्षमित्र !

काढतील सुंदर छायाचित्र !

छापून देईल वर्तमानपत्र !

मग प्रसिद्धी पावेल सर्वत्र !

बहु कृतकृत्य मी व्हावे !

मी एक सुंदर झाड व्हावें !!६!!

 

माझ्या फळातील बीज सारे !

नेतील गावोगावी सारे !

वृक्ष लावा जगवा देतील नारे !

माझे बीज सर्वत्र अंकुरें !

माझ्या वंशाला फुटतील धुमारे !

रानी वनी आनंदाचे झरे

मी एक सुंदर वृक्ष झालो रे ! मी एक सुंदर वृक्ष झालो रे !!७!!

 

©® उर्मिला इंगळे

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 9 – सांगावा…. ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  साहित्य में नित नए प्रयोग हमें सदैव प्रेरित करते हैं। गद्य में प्रयोग आसानी से किए जा सकते हैं किन्तु, कविता में बंध-छंद के साथ बंधित होकर प्रयोग दुष्कर होते हैं, ऐसे में  यदि युवा कवि कुछ नवीन प्रयोग करते हैं उनका सदैव स्वागत है। प्रस्तुत है उनकी एक अतिसुन्दर रचना   “ सांगावा….”। )

 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #9 ☆ 

 

☆ सांगावा…. ☆ 

 

किती खोलवर             जीवनाचा  वार

संकटांचा भार              काळजात .. . . !

 

शब्दांनीच सुरू              शब्दांनी शेवट

चालू वटवट                  दिनरात.. . . . !

 

चार शब्द कधी              देतात आधार

वास्तवाचा वार              होऊनीया.. . . !

 

प्रेमामधे होई                 संवाद हा सुरू

अनुभव गुरू                 जीवनाचा.

 

नात्यांमधे शब्द              पावसाळी मेघ

नशिबाने रेघ                  मारलेली. . . . . !

 

एखादी कविता               मावेना शब्दात

सांगावा काव्यात             सांगवेना . . . !

 

 

© सुजित कदम

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #9 – सेल्फी संन्याशी  ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है ।  साप्ताहिक स्तम्भ  अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण  एवं सार्थक कविता  “सेल्फी संन्याशी ”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #  9 ☆

? सेल्फी संन्याशी ?

 

खरं सांगतो, मला सेल्फी काढायला

बिल्कूल आवडात नाही

कारण… तो टिपतो

माझ्या चेहर्‍यावर आणलेले

ते खोटे खोटे भाव

आणि मुखवट्यावर थापलेला

मेकअपचा थर

माझ्या आत वाहणारे रक्ताचे झरे

रक्तमांसाची हृदयात होणारी धडधड

त्याला कधी टिपताच आली नाही

कितीही क्लोजअप घेतला तरी

भावनांचे हिंदोळे, प्रतिभांचे कंगोरे

काही काहीच दिसत नाही त्याला

मग अशा सेल्फीचा काय फायदा

नद्या, दर्‍या, सागरात,

कड्यावर उभंं राहून

आपल्या धाडसाचंं

सेल्फिसाठी प्रदर्शन मांडणार्‍या तरुणांचाही

मला खूप राग येतो

चुकून पाय घसरून खाली पडल्यास

स्वतःच्या देहाचा

आणि आई-बापाच्या स्वप्नांचा

क्षणात चुराडा होईल

याची जाण सेल्फी काढना

तरुणांना असायला हवी

नाही तर त्यांनीही माझ्या सारखं

’सेल्फी संन्याशी’ व्हायला हरकत नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वसंत फुलला मनोमनी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  आज प्रस्तुत है उनकी वसंत ऋतु पर आधारित  भावप्रवण कविता  “वसंत फुलला मनोमनी।) 

 

☆ वसंत फुलला मनोमनी 

 

नवपल्लवीने नटली सजली सृष्टी !

सुगरण विणते पिलांसाठी घरटी !

कोकीळेचा पंचमस्वर गुंजतो रानी !

भारद्वाजचे फ्लाईंग दर्शन सुखावते मनी !

भ्रमर गुंजती मधु प्राशती फुलातुनी !

आला वसंत आला झाला आनंद मनोमनी !!१!!

 

शेतात मोहरी सोनफुले फुले पीतमोहर !

घाटात भेटे लाल चुटुक पळसकाटेसावर !

दारोदारी फुलला लाल गुलमोहर !

बकुळ फुलांच्या गंधचांदण्या बहरे लाल कण्हेर !

देवचाफा सोनचाफा कडुलिंब ही बहरावर !

आला वसंत आला आनंद झाला खरोखर !!२!!

 

कमलपुष्पे फुलली बहरली जास्वंद सूर्यफुलं!

रंगबिरंगी गुलाब फुलले फुलली बोगनवेल !

अननसाची लिली फुलली बहरे नीलमोहर !

झिनिया पिटोनिया गॅझेनियाला आला हो बहर !

डॅफोडिल्स अन् ट्यूलिप्सने केला हो कहर !

आला वसंत आला फुलला मनोहर !!३!!

 

कोकणात सुरंगी फुले मोहक मदधुंद !

त्यांचा सुंदर गजरा माळला केसात !

मोगऱ्याचा दरवळला मंदसा सुगंध !

मोहविते रातराणी धुंद आसमंत !

मोहरले मी अन् कळले मजला आला वसंत !!४!!

 

नसता पाऊस सृष्टीला फुटे नवी पालवी !

ही अद्भुत किमया फक्त ऋतु वसंताची !

जीवनाची युवावस्था म्हणजेच वसंत !

सौंदर्य स्नेह संगीत याची निर्मिती वसंत !

या आनंदाला ना कशाची बरोबरी !

आला वसंत आला फुलला खरोखरी !!५!!

 

ऋतू वसंत अतिसुंदर म्हणती वाल्मिकी मुनी !

ऋतूंमध्ये मी वसंत म्हणे श्रीकृष्ण कुंजवनी !

ईश्वरीस्पर्शाने येई वसंतचि जीवनी !

उत्साहस्फूर्ती बुद्धीचमक चेतना हृदयी !

या सर्वांची प्रचिती येते अगदी क्षणोक्षणी !

आला वसंत आला फुलला मनोमनी !!६!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वृक्षवल्लरी लावुचला ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  आज प्रस्तुत है उनकी पर्यावरण सुरक्षा एवं वृक्षारोपण का अतिसुन्दर संदेश देती हुई मधुर कविता “वृक्षवल्लरी लावुचला।) 

 

☆ वृक्षवल्लरी लावुचला 

 

चला चला रे चला चला

वृक्ष वल्लरी लावु चला !!धृ.!!

 

हरितगृहाच्या मखमालीची

खुलली दालने धनदौलतीची

प्रदूषणाला पळवून आपण

वाचवू ओझोन वायूला !!१!! चला चला रे ….

 

वटवृक्षाची आगळीच शान

हिरव्या हिरव्या पानांत बुंदके लाल छान

वटपौर्णिमेला ह्यालाच मान

आधारवड हा पांतस्थांचा पक्षीगणांचा

रक्ष त्यांचे करु चला !!२!!चला चला रे…

 

कल्पवृक्ष हा मूळ कोकणी

गोड खोबरे मधुरचि पाणी

अघटित ही देवाची करणी

तेल तूप अन् सुंदर शिल्पे

तयापासुनि बनवू चला !!३!! चला चला रे…

 

आम्रवृक्ष हा भव्य देखणा

आम्रमंजिरी मोहवी मना

घमघमाट हा दरवळे वना.

आम्ररसाच्या मधुर सेवना

आपण सारे आता पळू चला !!४!! चला चला रे…

 

मृदंग जैसा फणस देखणा

वरि काटे परि आत गोडवा

निसर्गातला अगम्य ठेवा

कोकणातला अमोल मेवा

फणसगरे आता खाऊ चला !!५!! चला चला रे..

 

साग शिशीर उंबर पिंपळ

चंदन चंपक. करंज जांभूळ

हिरडा बेहडा बकुळ बहावा

घाटामधुनि तया पहावा

दर्शन त्यांचे करु चला !!६!!चला चला रे…

 

पळस पांगारा काटेसावरी

शोभून दिसते उंच डोंगरी

पहा फुले ती लाल केशरी

 

या दिव्य सृष्टीदेवतेपुढे

नतमस्तक होऊ चला ७!!चला चला रे…

 

निसर्ग आपुला मित्र म्हणूनी

दोस्ती तयासी घट्ट करोनी

वर्धन रक्षण मित्रांचे या

आनंदाने आपण करु चला !!८!!चला चला रे…

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

 

Please share your Post !

Shares
image_print