सुश्री मीनाक्षी भालेराव
ओळख
(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की भारतीय परिवेश में स्त्री की पहचान उजागर करती हृदयस्पर्शी कविता।)
सुश्री मीनाक्षी भालेराव
ओळख
(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की भारतीय परिवेश में स्त्री की पहचान उजागर करती हृदयस्पर्शी कविता।)
तुझा हा रेशमी मुखडा, वाटतो चंद्रमा चमचम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
कधी ना माळला गजरा, लावली ना कधी लाली
तरी प्रेमात का वेडी, सूरमय शाम झालेली ?
गुलाबी पाकळ्या ओठी, लागला सूर हा पंचम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
अशी ही भरजरी वस्त्रे, अंगभर तू जरी ल्याली
नशा ही सांडते अवखळ, तप्त ओठात उरलेली
ऋतुंना ठाव लागेना, कोणता हा तुझा मोसम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
वयाला बंधने आली, जाणती आज तू झाली
तुझ्यावर रोखती नजरा, होय हा जीव वरखाली
मनाला शांतता कोठे?, अंतरी वाजती पडघम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
सुखाला अंत ना उरला, पाहिला स्वार घोड्यावर
सरसरे अंगभर काटा, स्तब्ध हा देहही पळभर
फुलवण्या बाग ही आता, हात हे आपुले सक्षम
तुझे हे पाय चंदेरी, हृदयभर छेडती सरगम
*कविताच माझी*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर वीणावादिनी देवी माँ सरस्वती को नमन करती हुई कवि-हृदय के उद्गारों से परिपूर्ण कविता “कविताच माझी “। )
वृत्त भुजंग प्रयात.
गणेशा प्रती रे सदा लीन राहू
मनी शारदेचे, चला गीत गाऊ.
पहा लेक माझी, तिचे गाव पाहू
गुणी ही कवीता, नवे विश्व साहू. . . . !
कवीता मनाची, तिचे विश्व मोठे
तिथे अक्षरांचे, किती भव्य साठे
पहा वास्तवाने, मना गांजलेले
तरी कल्पनेने, तया जिंकलेले. . . . !
अशी ही कवीता तिचे हे पवाडे
खुली आज झाली, मनाची कवाडे.
जिथे काव्ययात्री, सदा होत गोळा
तिथे सोहळा हा, पहा रंगलेला. . . . !
असे ज्ञानदाते, असे ज्ञानदान
कवीता प्रभावी, करे योगदान
मनाचीच बोली, जिथे जन्म घेते
तिथे ही कवीता, करी काम मोठे. . . . . !
कुणा जाणिवांची, कुणा नेणिवांची
इथे जोड लाभे, मतीला गतीची
विचारी मनाला, हवी साथ जेथे
तिथे काव्ययात्री, करी काम साचे. . . . !
मिळे मेजवानी, मनाची मनाला
अहो भाग्य माझे, असे स्वागताला
इथे ना कुणाला, अपेक्षा धनाची
मिळे मान मोठा, कृपा शारदेची . . . !
कधी वेदनेच्या, उरी स्वार व्हावे
कधी भावनेच्या, जगी यार व्हावे
मनाने मनाला, असे पारखावे
जसे सावलीने, उन्हा खेळवावे. . . . !
अशी काव्य बोली, कवीता ठरावी
तिथे शब्द शैली, कमी ना पडावी.
कवीताच माझी, तिचा दूर डंका
नमस्कार माझा, तुम्हा ज्ञानवंता . . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
सुश्री स्वप्ना अमृतकर
*माऊली*
(सुश्री स्वप्ना अमृतकर जी की National Single Parent Day – 21st March पर रचित विशेष रचना। इस रचना के लिए सुश्री स्वप्ना अमृतकर जी का विशेष आभार। )
सोबत असते कायम, आमची होऊनी सावली
हसतमुख भासते कायम, आमची मायेची माऊली ,
आपसूक पितृछाया हरपली, भावनांचे आभाळ दाटले
नियतीचा खेळ सारा, तीने आधारवड होणे पसंत केले ,
दु:खांच्या सरींचा पाऊस, लवला तीचा हळवा डोळा
दृढ निश्चयाचा प्रारंभ, नाही घेतला श्र्वास मोकळा ,
कधी मऊ तर कधी कठीण, प्रसंगापरी तीच्या स्वभावछटा
आईवडील दोन भूमिकांमध्ये, तरी ममतेचा शीगेलोट कोटा ,
जवाबदारींचा डोंगर कोसळला, नाही वाटत असे तिला
धैर्याने एकेक पाऊल पुढे टाकते, आनंदवनाची ओढ तीला,
निवांतक्षणी शब्दांची करी ओवी, आठवणींचे गीत कंठात
उपजत कलागुणांची खाण, सदा देते वाण हा आमच्या पदरांत,
आभाळमाया गीतेवरची, आयुष्याची सांज वीणा,
लाडके स्वप्न फुल, सारं काही अपूर्णच आई विना….
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
सुश्री स्वप्ना अमृतकर
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
श्री सुजित कदम
फोन नंबर…!
श्री सुजित कदम जी की कवितायेँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।
कविता “फोन नंबर ….!” एक अत्यन्त मार्मिक कविता है जिसने 12.03.2019 को महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे की काव्य गोष्ठी में सबके नेत्र नम कर दिये थे।
श्री सुजित कदम जी के शब्दों में – “सामाजिक बांधिलकी जोपासताना समाजाच हे वास्तव याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही.”
कट केला..!
© सुजित कदम, पुणे
(कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा चारोळी लेखन विधा में “कुटुंब ” शीर्षक से एक प्रयोग )
*कुटुंब*
(चारोळी लेखन)
चार माणसे, चार स्वभाव
चार कोनात जोडलेली.
कुटुंबातील नाती सारी
जीवापाड जपलेली.
* * * * * * * * * *
घर असते आकर्षण
कुटुंब असते संरक्षण
माणसांच्या घरकुलात
कुटुंबांचे आरक्षण. . . . !
* * * * * * * * * *
घर म्हणजे फुलबाग
माणसांनी भरलेली
कुटुंब म्हणजे फळबाग
नात्यांनी लगडलेली. . . . !
* * * * * * * * * *
दार, खिडक्या, भिंती मध्ये
घर जात खपून
एकेक नात जपताना
अंतर येत फुलून. . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
* परीक्षा मायेची *
(कडवे – ५ कडवे , २० ओळी)
किती वादळांचे
सावट आलें
किती काहूर
मनी माजलें ,
खळगी रीकामी
इवल्या जीवांची
निसर्ग कोप हा
परिक्षा मायेची ,
गहन विचारांच्या
भट्टी तापल्या
चिंतेच्या झळा
मायेनेच सोसल्या ,
काळजाचे ठोके
अचानक वाढले
मायने पडद्याआड
डोळे मिटले ,
नियतीने लेकरांना
अनाथ हो केले
जातांना विंचवीनेच
स्व:अन्नदेह अर्पिले ,
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
(मेरे विशेष अनुरोध पर (डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’ पूर्व प्रोफेसर (हिन्दी) क्वाङ्ग्तोंग वैदेशिक अध्ययन विश्वविद्यालय, चीन) द्वारा रचित मेरी प्रिय कविता “पहले क्या खोया जाए ” का मराठी भावानुवाद “काय राह्यलय हरवण्यासारखं ?” कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा किया गया।
यह कविता इतनी मार्मिक है कि मैं कविराज विजय सातपुते जी के शब्दों में – “ये कविता इतनी भावपूर्ण थी कि मै खुद को रोक न सका. रोते रोते ये अनुवाद संपन्न हुआ. मूल रचनाकार जी को शत शत नमन. आज जिन चुनिन्दा लोगों को ये कविता और अनुवाद दिखाया सभी ने एक ही प्रतिक्रिया भेजी . . . . . निःशब्द.”
और मैं स्वयम भी निःशब्द हूँ। )
हिन्दी की मूल कविता एवं मराठी भावानुवाद दोनों ही स्वरूप आपके अवलोकनार्थ प्रस्तुत हैं।
इस अतुलनीय साहित्यिक कार्य के लिए श्री विजय जी का विशेष आभार और मेरा मानना है कि ऐसे प्रयोग होते रहने चाहिए।
काय राह्यलय हरवण्यासारखं ?
सर्वात अगोदर
काय असत हरवायच ?
आता काय राह्यलय
हरवण्यासारख ?
मऊ,रेशमी मुलायम,
पश्मीना शालीच्या नादात
आधीच हरवून बसलोय
माझा मौल्यवान बाप.
आता हरवायला
आई तेवढी बाकी राह्यलीय.
काही केल्या हरवतच नाही.
आपल्याच नादात गुणगुणत रहाते
”अशी हरवल्यावर थोडीच कळते
आपल्या माणसांची किंमत.”
.”तुझा बाप समजुतदार ,
वेळीच हरवला आणि
दाखवून दिली आपली किंमत.
येईल. . . माझीही वेळ येईल.
कळेल तुला माझी ही किंमत”
मला एक कळत नाही
कधीतरी वेळ येणारच
कशाला लावतेय इतका वेळ
द्यायची दाखवून आपली किंमत
विनाकारण करावी लागते
निरर्थक धडपड
आईला विसरण्याची
करतो प्रयत्न ती
एखाद्या तीर्थक्षेत्री
हरवून जाण्यासाठी
किंवा एखाद्या जत्रेत
दिसेनाशी होण्यासाठी.
आईची किंमत जाणून घेण्यासाठी
आणि . .
हरवतो माझ्याच विचारात.
माणूस असताना
त्याचे मोल जाणले नाही
आता हरवल्यावर तरी
त्याचे मोल जाणून घेऊ.
हाच एक यशस्वी उपाय
जो तो करतो आहे.
पण अशा वागण्यात
हरवत चाललीय नाती
हरवताहेत माणस
आजी आजोबा, काका काकू
मामा, मामी माझा बाप
आता तर कोणी
देवदूत देखिल नाही
किंवा मार्क्स एखादा
माझ्या शिलकित . .
या गरीबा जवळ
एकुलती एक
आई फक्त उरलेय
किंवा एखादी फाटकी गोधडी.
या दोनच वस्तू
हरवायच्या बाकी राह्यल्यात.
या दोघात अधिक मौल्यवान कोण
जो मला मायेची ऊब देईल
आता मी देखिल
इतका लहान राहिलो नाही
की आईच्या कुशीत शिरून
ती ऊब मिळवू शकेन.
अशा परिस्थितीत
कुणीतरी सांगा
काय राह्यलय हरवण्यासारख
फाटकी गोधडी की
जीर्ण झालेली माझी माय. . . . !
(भावानुवाद – विजय सातपुते)
विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
—————————————
मूल कविता