मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

नववर्ष– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

येणार ते जाणार हे कळायलाच हवं

गेल्यावरच तर येणार ना दुसरं काही नवं?

 *

नवं नवं नवलाईचं गुणगान गावं

गाता गाता नवलाईने भारावून जावं

नव्यामध्ये जुन्याच्या आठवणीत रमावं

जुनं ते सोनं हे तेव्हा समजावं

 *

म्हणूनच जुन्याचे बोट सोडायचं नाही

नव्याचे बोट पकडले तरी त्यात वाहून जायचं नाही

जुन्याच्या कडीत नव्याची कडी सांधायची

अशी साखळी गाठवून नव्याची कास धरायची

 *

नव्या वर्षाचा प्रत्येक क्षण खास व्हावा

आपला देह हर्षोल्हासाचा आस व्हावा

नव्यावर्षात नवं आव्हानांचा करण्या सामना

आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभ कामना ||

 *

Happy new year 2025

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 159 – सकल विश्व में शांति हो…☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सकल विश्व में शांति हो…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 159 – सकल विश्व में शांति हो… ☆

नया वर्ष मंगल करे, दो हजार पच्चीस।

खुशियों की माला जपें,मिटे दिलों की टीस।।

 *

भारत-भू देती रही, अनुपम यह संदेश।

सकल विश्व में शांति हो, मंगलमय  परिवेश।।

 *

सुख वैभव की कामना, मानव-मन की चाह।

प्रगतिशील जब हम बनें, मिल ही जाती राह।।

 *

सत्य सनातन की विजय, दिखती फिर से आज।

दफन हुए जो निकल कर, उगल रहे हैं राज।।

 *

समृद्धि-मार्ग पर है बढ़ा, भारत अपना देश।

चलने वाला अब नहीं, छल प्रपंच परिवेश।।

 *

महाकुंभ का आगमन, कर गंगा इस्नान।

जात-पात से दूर रह, रख मानवता मान।।

 *

मंगलमय की कामना, हम सब करते आज।

सकल विश्व में हो खुशी, सुखद शांति सरताज।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #268 ☆ घडी मोडली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 267 ?

☆ घडी मोडली ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संसाराचा गाडा म्हणजे परवड असते

जबाबदारी खांद्यावरती जोखड असते

*

घडी मोडली तेव्हा नव्हता विचार केला

विस्कटलेली घडी घालणे अवघड असते

*

लाखाचा मी हिशेब करतो बसून येथे

दिवाणजी मी ती दुसऱ्याची रोकड असते

*

काही बाळे श्रावण झाली कलियुगात या

त्या बाळाच्या खांद्यावरती कावड असते

*

रांधा वाढा करते आहे आनंदाने

तिच्याच नशिबी तर उरलेली खरवड असते

*

असून पैसा साथ देइना शरीर माझे

या देहाची तेव्हा चालू तडफड असते

*

लंगोटाने सुरू जाहला प्रवास होता

अखेरीसही सफेद कोरे कापड असते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन शुन्य दोन पाच… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन शुन्य दोन पाच… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दोन शुन्य दोन पाच

सावधान, एकदाच

पहा जरा मागे ठसे

विसरुन गत् जाच.

*

हळू-हळू चाला बोला

सांभाळून मोद स्वाद

निरोप टाळून वाद

नवे पाऊल आल्हाद.

*

दोन शुन्य दोन चार

बंद साल बंद दार

दुःख नको कसचेही

नव वर्षाने उध्दार.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नूतनवर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नूतनवर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

दैनंदिनी

असे आत्मा

वर्षरुपी वसन

बदलून लागू कामा…

 

करु संकल्प

राहो साधनेतील सातत्य

नकोत विकल्पाचे

अधिपत्य…

 

एकचि सदगुरु

नकोत चोविस गुरु

आत्मोन्नतीचा ध्यास धरू

उन्मन हमखास..

 

तिळा तिळाने

जसा दिन होई मोठा

तसा चढू सोपान

श्रद्धेने धिराने…

 

सोप्प नाहीए

तरी मनात आहे विश्वास

या जन्मी सुरवात जरी

निश्चित होवू विलीन परमात्म्यासी…

 

आंग्ल नूतनवर्षाच्या अनंत शुभेच्छा.

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रमाण…” – कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये  ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “प्रमाण…”कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये  ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

अतीकोपता कार्य जाते लयाला

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १ ॥ 

*

अती लोभ आणी जना नित्य लाज

अती त्याग तो रोकडा मृत्य आज । 

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २ ॥ 

*

अती मोह हा दु:ख शोकास मूळ

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ३ ॥

*

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया

अती खेळणे हा भिकेचाच पाया । 

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ४ ॥ 

*

अती दान तेही प्रपंचात छिद्र

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र । 

बरे कोणते ते मनाला पुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ५ ॥

*

अती भोजने रोग येतो घराला

उपासे अती कष्ट होती नराला । 

फुका सांग देवावरी का स्र्सावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ६ ॥

*

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड । 

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ७ ॥

*

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प

अती झोप घे तोही त्याचाच भूप । 

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ८ ॥

*

अती द्रव्यही जोडते पापरास

अती घोर दारिद्य्र तो पंकवास । 

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ९ ॥

*

अती भाषणे वीटती बुद्धिवंत

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत । 

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १० ॥

*

अती वाद घेता दुरावेल सत्य

अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य । 

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ११ ॥ 

*

अती औषधे वाढवितात रोग

उपेक्षा अती आणते सर्व भोग । 

हिताच्या उपायास कां आळसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १२ ॥

*

अती दाट वस्तीत नाना उपाधी

अती शून्य रानात औदास्य बाधी । 

लघुग्राम पाहून तेथे वसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १३ ॥

*

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी । 

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १४ ॥ 

*

अती भूषणे मार्ग तो संकटाचा

अती थाट तो वेष होतो नटाचा । 

रहावे असे की न कोणी हसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १५ ॥ 

*

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती । 

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १६ ॥ 

*

अती भांडणे नाश तो यादवांचा

हठाने अती वंश ना कौरवांचा । 

कराया अती हे न कोणी वसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १७ ॥

*

अती गोड खाणे नसे रोज इष्ट

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ । 

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १८ ॥ 

*

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी । 

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १९ ॥ 

*

सदा पद्य घोकोनियां शीण येतो

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो । 

कधी ते कधी हेही वाचीत जावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २० 

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा!!!!! 💐

कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये 

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – जपावी वाचन संस्कृती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जपावी वाचन संस्कृती? श्री आशिष  बिवलकर ☆

पुस्तकांचा मेळा | पुण्य नगरीत |

वाचनाची रीत | जगवाया ||१||

*

वाचन संस्कृती | वाढवते ज्ञान |

घालवी अज्ञान | माणसाचे ||२||

*

ग्रंथ हेच गुरु | बिंबवले मनी |

वाचुनिया ज्ञानी | घडवाया ||३||

*

प्राचीन भारत | प्रसिद्ध नालंदा |

ग्रंथांची संपदा | अगणित ||४||

*

आधुनिक जग | झालं डिजीटल |

ग्रंथांकडे कल | उदासीन ||५||

*

प्रकाशन झाला | आतबट्टा धंदा |

व्यवहारी वांदा | परिस्थिती ||६||

*

सुज्ञ वाचकांनो | जपावी संस्कृती |

वृद्धिंगत मती | वाचनाने ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बनाव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ बनाव ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(जलौगवेगा)

भलेपणाचा प्रभाव आहे

तसाच येथे दबाव आहे

*

नवीन संधी लुटायची तर

तसाच केला सराव आहे

*

उगीच त्रागा करू नका ना

अशांत झाला जमाव आहे

*

विरोधकांच्या पराभवाचा

जमून केला ठराव आहे

*

दबून थोडे जपून वागा

बघून जेथे तणाव आहे

*

मिळेल ते तो नमून घेतो

मलूल ज्याचा स्वभाव आहे

*

सुखात नाही कुणीच येथे

सुधारणांचा अभाव आहे

*

फसाल तेव्हा कळेल सारे

कुणाकुणाचा बनाव आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “नव्या युगाचे गीत…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “नव्या युगाचे गीत…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

नव्या युगाचे आता गीत गायचे आहे

नवचैतन्याचे आता तेज प्यायचे आहे.

*

स्वागतास नव वर्षाच्या निशा निमंत्रण तुम्हा

तेज प्राशण्या तुम्हा उषा निमंत्रण आहे.

*

हे धुंदी मधले नृत्य स्वार तमावर व्हावे

ही तेज शलाका पकडा हा मंत्र युगाचा आहे.

*

तेजाची धुंदी जेंव्हा रोम रोम फुलवील

तो सूर्य झेलण्यासाठी सज्ज व्हायचे आहे.

*

लाजून ईश्वरा पुढती पाण्याचे मद्य जहाले

तो प्रेषित चैतन्याचा तुम्हा व्हायचे आहे.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

 मी हल्ली 

पुस्तकं नाही

माणसंच वाचतोय ! 

 

पुस्तकं महाग झालीयत

माणसं स्वस्त. 

 

शिवाय,

सहज सगळीकडे उपलब्ध असतात 

माणसं. 

 

बरीचशी चट्कन वाचून होतात

कधी कधी मात्र 

खूप वेळ लागतो 

समजायला. 

 

काही तर 

आयुष्यभर कळत नाहीत ! 

 

सगळ्या साईजची 

सगळ्या विषयांची.

 

छोटी माणसं, मोठी माणसं

चांगली माणसं, खोटी माणसं. 

 

आपली माणसं, दूरची माणसं

दूर गेलेली माणसं, जवळची माणसं. 

 

दु:खी माणसं, कष्टी माणसं 

कोरडी माणसं, उष्टी माणसं 

 

बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं

निमग्न, तिरसट, मूडी माणसं. 

 

पाठीवर थाप मारणारी

हातावर टाळ्या मागणारी

थरथरत्या हाताने

घट्ट धरून ठेवणारी. 

 

मोजकं बोलणारी कविता-माणसं

कादंबरीभर व्यथा माणसं. 

 

सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं

डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं. 

 

काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही

काहींच्या मजकुरात विषयच नाही

 

वर्षामागे वर्ष पानं जातात गळत

काहींची प्रस्तावनाच संपत नाही ! 

 

पुस्तकांचं एक बरं असतं

कितीही काळ गेला तरी

मजकूर कधी बदलत नाही

 

माणसांचं काय सांगू

वेष्टन, आकार

विषय, मजकूर 

सारंच बदलत बदलत 

शेवटी वाचायला 

माणूसच उरत नाही.

 

तरीही शब्द शब्द 

वाचतोे मी माणसं,

पानापानातून

वेचतोे मी माणसं………!!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares