☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
श्रीमद्भगवद्गीता : शेवटचा अध्याय : १८ : मोक्षसंन्यासयोग
श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी श्लोकात पद्यरुपात भावानुवाद करून तुमच्यापुढे सादर करायचा वसा अंगिकारला. इ. स. २०२२ च्या उत्तरार्धात या अभियानाला प्रारंभ केला. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही या नम्र निष्ठेने हे कार्य करीत आलो. भगवंतांची कृपा आणि त्यांचे पाठबळ याखेरीज हे शक्यच नव्हते. किंबहुने हे कार्य त्यांचेच आहे; मी तो केवळ त्यांच्या हातातील लेखणी! हे सद्भाग्य मला दिल्याबद्दल भगवंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आता अठराव्या अध्यायातील अखेरच्या श्लोकांचा भावानुवाद आजपासून सादर करून या अभियानाचा समारोप करीत आहे. शुभं भवतु।
अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १ ॥
कथित अर्जुन
महाबाहो ऋषिकेषा केशिनिसूदना मनमोहना
सन्यास त्याग तत्व पृथक जाणण्याची मज कामना ॥१॥
श्रीभगवानुवाच
काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २ ॥
* काम्य कर्माचा त्याग सांगती काही पंडित संन्यास
सर्वकर्मफलत्यागा इतर विचक्षण म्हणती संन्यास ॥२॥
* त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३ ॥
* विद्वान काही म्हणती कर्मा दोषी
त्याग करावा कर्माचा सांगती मनीषी
ना त्यागावी कधी यज्ञ दान तप कर्म
दुजे ज्ञानी सांगती हेचि सत्य धर्माचे वर्म ॥३॥
* निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४ ॥
* प्रथम कथितो तुजसी विवेचन त्यागाचे
सात्विक राजस तामस प्रकार त्यागाचे
नरपुंगवा तुज माझे कथन दृढ निश्चयाचे
भरतवंशश्रेष्ठा घेई जाणुनी हे गुह्य त्यागाचे ॥४॥
* यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५ ॥
* यज्ञदानतप नये त्यागू कर्तव्ये निगडित जीवनाशी
यज्ञदानतप तिन्ही कर्मे पावन करिती मतिमानाशी ॥५॥
* एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६ ॥
* कर्मांसह या अन्यही कर्मे करत राहणे कर्तव्य
फल आसक्ती त्यागोनीया पार्था आचरी कर्तव्य ॥६॥
* नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७ ॥
* नियतीदत्त कर्माचा संन्यास नाही योग्य
मोहाने त्याग तयांचा हाचि तामस त्याग ॥७॥
* दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८ ॥
* समस्त कर्मे दुःखदायक पूर्वग्रहासी धरिले
होतिल तनुला क्लेश मानुनी कर्माला त्यागिले
असेल जरी राजस त्याग अनुचित ही धारणा
फल त्या त्यागाचे कधिही प्राप्त तया होईना ॥८॥
* कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९ ॥