मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जायचेच जर न येण्यासाठी … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ जायचेच जर न येण्यासाठी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पुन्हा परत ना इथे यायचे

ठरवूनच ती निघून गेली

ती येण्याची वाट परंतू

इथे वाट पहात थांबली

*

 त्या वाटेवर तिच्याचसाठी

 मऊ रेशमी हिरवाई आली

 अन् वाटेच्या अगदी मध्ये

 झाड उभे विश्रांतीसाठी

*

 येणार जर नव्हती तु तर

 वाट कशाला आखीव मागे

 पाहणारा गुंततो  आपसूक

 आठवणींचे उलगडून धागे

*

  जायचेच जर न येण्यासाठी

  काहीही  ठेवावे  ना  पाठी

  खाणाखुणा नष्ट कराव्या

  हवे ते जपती काळीजकाठी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रकाश वाट… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रकाश वाट… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

चालत होतो मी एकाकी आयुष्याची वाट

पसरत होता अवतीभवती अंधकार घनदाट

पूर्वाचल कधी निघेल उजळून नव्हते ठाऊक मजला

ठेचाळत धडपडत चाललो रेटीत काळोखाला ||१ ||

*

कर्म भोग हा असा न जाई भोगून झाल्याविना

गिळेल मज अंधार परंतु राहतील पाऊल खुणा

जे होईल ते खुशाल होवो मधे थांबणे नाही

असेल संचित त्याचप्रमाणे न्यायनिवाडा होई ||२ ||

*

निश्चय ऐसा होता उठली नवीन एक उभारी

शीळ सुगंधित वाऱ्याची मज देई सोबत न्यारी

बेट बांबूचे वन केतकीचे पल्याड मिणमिणता दीप

दूर दूर तो प्रकाश तरीही मज भासला समीप हे||३ ||

*

हे देवाने जीवन आम्हा दिधले जगण्यासाठी

उषःकाल तो नक्कीच आहे अंधाराच्या पाठी

मनात आली उसळून तेव्हा उत्साहाची लाट

त्या मिणमिणल्या दीपाने मज दाविली प्रकाश वाट ||४||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कारण…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कारण…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

निद्रस्थ स्तब्ध राहण्या अनेक कारणे

पेटून उठण्या एकच कारण पुरते ….

न करण्याची अनेक कारणे

करण्यासाठी फक्त एकच कारण असते..

 

दुःखाची अनेक कारणे

भर उन्हात एक झुळूक पुरते

अनेक संकटे मोठी असताना

सुखासाठी एकतरी कारण नक्की असते….

 

दोष देण्या अनेक कारणे

नाते सहज तोडू पाहते

जोडून राहण्या एकच कारण

प्रेमाने जग जिंकता येते….

 

अश्रूंसाठी अनेक कारणे

एकच कारण ओठावर हसू फुलवते

हार मानण्या अनेक कारणे

जिंकण्यासाठी एकच कारण असते….

 

जग हे मोठे,जगणे छोटे

पुरून येथे उरता येते

एक कारण जगण्याचे

मरणालाही परतून लावते…..

 

जीवन मरण इथे आपण शरण

तरीही जगण्याची एक आशा पुरते

दोन श्वासातील अंतर जीवन

त्या श्वासाची सोबतही अमूल्य इथे ठरते….

 

स्वप्न आणि ध्येयासाठी पळताना

सुख, शांती आणि समाधानच जिंकते

शोध त्या एक कारणाचा लागता

आयुष्य सहज सुंदर सोपे होते….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 228 ☆ निघाली पालखी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 228 – विजय साहित्य ?

🌼 निघाली पालखी 🌼 कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

☆ संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ☆

(सहाक्षरी रचना)

इनाम दाराचा

सोडूनी या वाडा

निघाली पालखी

सवे गावगाडा ..! १

*

आकुर्डी गावच्या

विठू मंदीरात

तुकोबा पालखी

थांबे गजरात ..! २

*

पुण्य नगरीत

दिव्य मानपान

जागोजागी चाले

अन्न वस्त्र दान ..! ३

*

पालखी विठोबा

पुण्यनगरीत

निवडुंग्या विठू

रमे पालखीत..! ४

*

लोणी काळभोर

वेष्णवांचा मेळा

सोलापूर मार्गी

हरीनाम वेळा..! ५

*

तुकोबा पालखी

यवत मुक्काम

दिंड्या पताकांत

निनादते धाम ..! ६

*

वरवंड गावी

पालखी निवास

आषाढी वारीचा

सुखद प्रवास ..! ७

*

आनंदाचा कंद

गवळ्याचे नाव

रंगले वारीत

उंटवडी गाव…! ८

*

मंगल पवित्र

क्षेत्र बारामती

कैवल्याची वारी

सुखाच्या संगती …! ९

*

सणसर गावी

विठ्ठल जपात

रंगली पालखी

हरी कीर्तनात…! १०

*

आंधुर्णे गावात

घेताच विसावा

माय माऊलीत

विठ्ठल दिसावा…! ११

*

गोल रिंगणाचा

बेळवंडी थाट

निमगावी क्षेत्री

केतकीची वाट..!

*

इंदापुर येता

रिंगणाचे वेध

गण गवळण

अभंगात मन…! १२

*

सुमनांची वृष्टी

सराटी गावात

अमृताची गोडी

विठ्ठल नामात..! १३

*

गोल रिंगणाचे

अकलूज गांव

मनामधे जागा

विठू भक्तीभाव…! १४

*

येता बोरगाव

दिंडी नाचतसे

काया वाचा मनी

विठू राहतसे…! १५

*

पिराची कुरोली

शिगेला गजर

पंढरपुरात

पोचली नजर..! १६

*

वाखरी गावात

मिलनाची वेळा

रमला वारीत

वैष्णवांचा मेळा..! १७

*

कळस दर्शंनी

पाऊले अधीर

धावतसे मन

सोडूनीया धीर..! १८

*

ज्ञानोबा तुकोबा

वाखरीत मेळ

विठू दर्शनाची

यथोचित वेळ…! १९

*

वैष्णवांची वारी

हरीनाम घोष

वारीचा सोहळा

परम संतोष…! २०

*

पोचली पालख्या

पंढर पुरात

आनंदला विठू

भक्तीच्या सुरात..! २१

*

युगानु युगाची

कैवल्य भरारी

अखंड प्रवाही

आषाढीची वारी…! २२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाई पण भारी देवा… ☆ सुश्री कावेरी रोहिदास सुतार ☆

सुश्री कावेरी रोहिदास सुतार

? कवितेचा उत्सव ?

💯 बाई पण भारी देवा 💯 सुश्री कावेरी रोहिदास सुतार ☆

“पुरुष ना तू मग हे चालायचंच

पावित्र्याचा पारड्यात स्त्री ला तू तोलयचंच,

वाट्टेल तेव्हा तू तिच्याशी अबोला धारायचास

मनाला येईल तेव्हा अपमान ही करयचास ,

स्वतःचा मर्जी प्रमाणे तू हवं तस वागायचं

तिचा वागण्याचं मात्र तू स्पष्टीकरण मागायच,

ओझ तुझ्या अपेक्षांचं आयुष्य भर लादायच

तू चुकलास तरी चालेल पण तिने नाही चुकायच ,

बनून तुझी सहचारणी संसार करते सुखाचा

केलास कधी विचार तिचा मनाचा ,

अर्धांगिनी तुझी ती समजून घे तिला थोड

सुटता सुटता सुटेल ह्या संसाराच कोड,

मग कळेल तुला दिसतं तस नसतं

जगून बघ एकदा बाई पण काय असत..💯

© सुश्री कावेरी रोहिदास सुतार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्‌ । 

झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥

*

पावनकर्त्यात पवन  श्रीराम मी शस्त्रधाऱी

नक्र मी जलचरातील सरितेत गंगा सुरसरी ॥३१॥

*

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । 

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्‌ ॥ ३२ ॥

*

विद्येमधील ब्रह्मविद्या मी तत्ववादही मी

सृष्टीचा समस्त आदी मध्य अंतही मी ॥३२॥

*

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । 

अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥

*

अक्षरगणातील अकार समासातील द्वंद्व समास मी

अक्षयकाल तथा विराटपुरुष धारणपोषणकर्ता मी ॥३३॥

*

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्‌ । 

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥

*

कारण सर्वोत्पत्तीचे सर्वविनाशक मृत्यूचे पार्था मी

नारी कीर्ति लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती क्षमा मी ॥३४॥

*

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्‌ । 

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥

*

गेय वदांतील बृहत्साम छंदातील गायत्री मी

मासातील मी मार्गशीर्ष ऋतुश्रेष्ठ वसंत मी  ॥३५॥

*

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्‌ । 

जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्‌ ॥ ३६ ॥

*

कुटिलांमधील मी द्यूत प्रभावी पुरुषांचा प्रभाव

जेत्याचा विजय मी सात्त्विकांचा सात्विक भाव ॥३६॥

*

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि *पाण्डवानां धनञ्जयः । 

मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥

*

वृष्णींमधील वासुदेव मी पांडवांतील धनंजय

मुनींमधील वेदव्यास मी कवींमधील शुक्राचार्य ॥३७॥

*

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्‌ । 

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्‌ ॥ ३८ ॥

*

शास्त्याचा मी दंड विजीगीषूची नीती मी

गुह्याचा मी मौन ज्ञानीयांचे तत्वज्ञान मी ॥३८॥

*

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । 

न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्‌ ॥ ३९ ॥

*

सजीवोत्पत्ती कारण मजला जाणून घे अर्जुना

चराचरात कोणी ही  वसूनी नसते माझ्याविना ॥३९॥

*

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । 

एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥

*

मम विभुतींना वा मम तेजाला नाही अंत परंतपा

तुझ्यास्तवे मी सांगितला चरुनीया संक्षिप्त रूपा ॥४०॥

*

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । 

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम्‌ ॥ ४१ ॥

*

कांती शक्ती ऐश्वर्यपूर्ण जे वसते विश्वात

मम तेजाचा अंश तेथ झालासे अभिव्यक्त ॥४१॥

*

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । 

विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्‌ ॥ ४२ ॥

*

केवळ अंशाने माझ्या धारियले  विश्व समस्त

जाण इतुके चिकित्सका पार्था हेचि ज्ञान समस्त ॥४२॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विभूतियोग नामे निशिकान्त भावानुवादित दशमोऽध्याय संपूर्ण॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूपाळी स्वामींची… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ भूपाळी स्वामींची… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

झाली पहाट झाली स्वामी

जागे व्हा आता

स्वामी जागे व्हा आता

भक्त गण अतुरला

तुमच्या दर्शनी राऊळा  

गंगेचे उदक आणले

मुख प्रक्षाळा स्वामी

मुख प्रक्षाळा

किलबिलाट झाला

पक्षी झाले हो गोळा ।। 1 ।।

*

घातला धूप तो भक्ती भावाचा

भक्ती भावाचा

पंचप्राणाची पंचारती

 ह्या देही ओवळीता ।। 2 ।।

*

स्नानासाठी आणले, काशी उदक,

स्वामी काशी उदक

दवणा मरवा सुगंधी,

 हिना अत्तर

 कस्तुरीची उटी लावली भाळा,

 लावलीया भाळा

उठा उठा स्वामी दर्शन द्या सकळा ।। 3 ।।

*

सुगंधी फुले, पंचामृत, केशरी

पेढे, स्वामी दूध अन पेढे

नैवेद्यपात्री  गोड धोड फळे

*

उठा उठा स्वामी आता

 दर्शन द्यावे मुख कमळा

झाला अरुणोदय सरली

निद्रेची वेळा । । 4 ।।

तत्सद स्वामी अर्पणास्तू

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

गीत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

मंदिर उभे दिमाखी,

गोपूराची सुंदर नक्षी.

कळसावरील पक्षी,

गीत कुणास्तव गातो.

मंदिर उभे सुनसान,

आता कुणाच्या साक्षी.

उडून जाता पक्षी,

गाणेच घेउन जातो.

कंठात रुतले शब्द,

वणवाच होउन वक्षी.

गहिवरुन पुन्हा सापेक्षी,

कविताच होउन जातो.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू, मी, आणि पाऊस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – तू, मी, आणि पाऊस ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

बरसू दे

अंगावरूनी थेंबांना

गालावरूनी निथळू दे

पापण्यांवरून ओघळू दे..

झोंबू दे वारा

मनात पसरू दे गारवा

तुझ्यासवे गंध मातीचा

झिरपू दे मनात..

घेता तुझा हात हाती

मोहक तुझ्या त्या स्पर्शाने

अंगी चमकेल वीज

गारवा पळून जाईल दूर..

स्पर्श तुझ्या नजरेचा

करतो बेधुंद माझ्या मना

बेभान होऊनी 

ओंजळीत घे या

अनमोल प्रीतीच्या क्षणांना..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 237 ☆ सागर आणि लाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 237 ?

☆ सागर आणि लाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

लोक किल्ले बांधती वाळूत, बांधो बापडे

सागरामध्ये स्वतःच्या मस्त तरले आजवर

प्रभा 🌊

? ☆ सागर आणि लाटा ☆ ?

☆  

अथांग निळ्याशार समुद्राचं आकर्षण –

मनात खोलवर  ….

मग घरच उचलून आणलं सागरतिरी ….

सागरिकांबरोबर झुलणं हा एकच छंद!

त्या बेमुरव्वत लाटांची गाज

आणि बेधडक उसळण थेट घरापर्यंत!

मन सवयीचे गुलाम…

झेलत राहिले अविरत,

लाटांचे प्रहार !

रौद्र लाटांचे तांडव-

घराच्या छतापर्यंत ….

नाकातोंडात पाणी जाताच…

घराने दाखविला…

संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग,

आणि सापडली जिवंत रहाण्याची दिशा!

घरही  आता खंबीर,

लाटांपासून दूर नेणारं,

सुरक्षित कवच बनून!

भल्या बु-याची जाण देणारं—तरीही निसटलेल्या क्षणांचा हिशोब मागणारं….

परखड…काहीसं कठोर,

पण अश्वासक!

प्रौढ अनुभवांनी मिळवलाय विजय–

मनातल्या चवचाल लाटांवर!

समोर सावध काठ  आणि किनारे,

लाटांकडे पाठ ,तरीही —

पाठराखण करतोच  आहे….

हा अथांग  अर्णव–समुद्र….सागर  !!!

☆  

© प्रभा सोनवणे

२५ जानेवारी २००७

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares