मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानशृंगार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानशृंगार ☆ श्रीशैल चौगुले ☆

या देखण्या शब्दलौकिकाशी

संवाद साधूनी मी बोलावे

अलंकार वृत्तांचा हा भार

सहज मी भावप्रेरित पेलावे

हा मनाचा ज्ञानशृंगार असेल का ?

दिशा अक्षरांनी नक्षत्रांचेच ऋतू

शब्द-शब्द ओठातील लेखणी सेतू

हि तनू काव्यअप्सरा संस्कार किंतू

गर्द चिंतनाचे मौन व्यक्त परंतू

कल्पनेच्या लोचना रचा सोसेल का ?

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवनचक्र … ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– जीवनचक्र  – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

बुडापासून अस्तित्व केले नष्ट,

पुन्हा उगवण्याची जिद्द आहे |

येणाऱ्या प्रत्येक आव्हानांशी 

लढायला पुन्हा एकदा सिद्ध आहे |

*

कित्येकदा छाटले कापले,

तरी जगण्याची आशा आहे |

शून्यातून उभे राहण्याची,

देहबोलीत भाषा आहे |

*

उन वारा पाऊस थंडी 

झेलायाची हिम्मत आहे |

जमिनीत घट्ट रोवणाऱ्या 

मुळांची किंमत आहे |

*

ज्यांनी काटले छाटले,

भविष्यात त्यांनाही छाया आहे |

निसर्गत: परोपकार अंगी,

प्रत्येक प्राणीमात्रासाठी माया आहे |

*

सोसलेल्या घावांच्या वेदना,

फक्त अंतरालाच ठाऊक आहे |

पुन्हा नव्याने अंकुरताना,

मन थोडेसे भावुक आहे |

*

मातीत उगवायचे, मातीत मिळायचे 

जीवनाच्या चक्राची रीत आहे |

प्रत्येक क्षण चैतन्याने जगायाचा,

हेच जीवनाचे गीत आहे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 174 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 174 ? 

अभंग☆ महंत कवी राज शास्त्री ☆

माणूस पणाचा, प्रचार करावा

सत्संग साधावा, माणसाने.!!

*

मदिरा प्राशन, अभक्ष भक्षण

वाईट व्यसन, त्याज्य करा.!!

*

परम प्रीतीचा, धागा धरूनिया

प्रेम करुनिया, जिंका सर्वा.!!

*

कृष्ण प्रीत भक्ती, जडवा अंतरी

प्रवेश भितरी, करा तिच्या.!!

*

कवी राज म्हणे, संतांचे विचार

आणिक आचार, लक्ष करा.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆लेकीची पाठवणी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆

 ☆ कवितेचा उत्सव ☆

☆ लेकीची पाठवणी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆ 

माय बापाची लाडाची

कन्या निघाली सासरी

लग्न समारंभ झाला

दिली सासूच्या पदरी

*

लाड कोड पुरविले

संस्कारांनी घडविले

आहे त्या परिस्थितीत

छान तिला वाढविले

*

रोप तुळशीचे सान

दुजा अंगणी लावावे

गुण दोष समजूनी

तुम्ही तिला सांभाळावे

*

एका नयनी आसवे

तर दुजात आनंद

मिळे पती सुयोग्यसा

चाल तिची मंद मंद

*

सुखे राहावे सासरी

दोन घरांना जोडाया

प्रेम धागे गुंफावेत

लेक चालली नांदाया

© सौ. सुरेखा कुलकर्णी

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पाखरू… —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाखरू…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

माझ्या मनातल्या मनात …

दडलंय एक पाखरू इवलंसं .. भांबावलेलं ..

माझ्याबरोबरच जन्मलेल्या माझ्या स्वप्नांचं

माझ्याबरोबरच चालायला शिकलेल्या ..

माझ्या आशा – आकांक्षांचं …

केव्हाचं अधीर झालंय ते ..

आपले पंख फुलारून

विस्तीर्ण अवकाशात झेपावायला !!

पण …..

पण फसतोच आहे त्याचा प्रत्येक प्रयत्न.. 

पंख होरपळताहेत कधी ….

वास्तवाच्या प्रखर आचेनी

तर कधी झोडपले जाताहेत …

व्यवहाराच्या थंड, निर्मम फटकाऱ्यांनी ….

आणि मग …..

मग आणखी आणखीच सांदी-कोपऱ्यात 

लपू पहातंय हे बिचारं इवलंसं पाखरू !

 

आताशा पण थंडावलीय जरा

त्याची स्वैर उडण्यासाठीची धडपड

मधूनच कधी ऐकू येते फक्त

त्याच्या पंखांची अस्वस्थ फडफड ……

कारण …..

कारण आता ते शहाणं झालंय ..

त्याला समजू लागलंय की …

की बाहेरच्यापेक्षा इथेच …

या मनातल्या मनातच ..

आपण जास्त सुरक्षित आहोत म्हणून !!!!!

समजलंय त्याला …….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विसावा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विसावा…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

असा विसावा मनास मिळावा,

भान न रहावे काळाचे !

शांत मनाने उजळत रहावे,

दिवे अंतरी आठवांचे!….१

*

सुरम्य संध्या साथ असावी,

नभी तोरणे किरणांची!

तांबुस पिवळ्या रंगाची,

उधळण व्हावी गंध फुलांची! ….२

*

 नजरेमध्ये जरा फुलावा,

 रंग पिवळा बहाव्याचा!

 जांभुळ केशरी गुलमोहर ही,

 दाखवी रंग बहारीचा!….३

*

 निसर्ग करतो किमया सारी,

 न्याहाळीतो मी असा खुळा!

क्षण विसाव्या चा मनी खेळतो,

  फुलवित माझा स्वप्न झुला!….४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अप्रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अप्रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

प्राचीवरी सूर्य 

उदयास येई

सुवर्णमय प्रभा

गगनास देई

*

निळेशार अंबर

कनकाची झिलई

अवर्णनीय शोभा

नभी व्यक्त होई

*

 पाहून ऐसे  हे

 सृष्टीचे स्वरूप

 जगन्नियंत्याचे

 वाटे मना अप्रूप

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अश्व… शब्दांचे ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆

सुश्री निलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव ?

☆ अश्व… शब्दांचे ☆ सुश्री निलांबरी शिर्के

मनात चळवळ करणारे

सारखी पाय आपटून

 मुक्ततेसाठी धडपडणारे

 शब्दांचे  अश्व मोकळे सोडले तर

सारीकडे टापांचा आवाज

आणि धुरळाच धुरळा उडेल

याची खात्री आहे  मनाला

 सारेच घोडे अबलख

 एकदा मुक्त सोडले की

 पायाखाली काय येईल

  काय तुडवल जाईल

 किती उडवल जाईल

 अंदाजच करता येत नाही

 म्हणूनच मी त्यांना सोडू

 की नको या संभ्रमातच

  आहे

नकोच वाटत सोडायला

त्या पेक्षा आतल्या आत

त्यांच्या  नाल लावलेल्या

पायांचे तडाखे सहन करत

 राहीलेल आयुष्य काढलेल बर

© सुश्री निलांबरी शिर्के

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “सल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

लाटा आल्या परतून गेल्या

वादळ आले उलटून गेले

झाडाच्या मुळांनी माती घट्ट धरून

प्रत्येक संकटाला तोंड दिले…..

 

करून काळजी चिंता

समस्या कोणती संपते का

कोणीही असो करता करविता

जगणे झिडकारता येते का?

 

जे आहे जसे आहे

सारे काही निमित्त आहे

संपण्याच्या भीतीनेच तर

जगण्याची खरी ओढ आहे……

 

सुख आहे दुःख आहे

प्रेम माया जिव्हाळा आहे

राग आणि लोभासोबत द्वेष ही इथे

म्हणूनच प्रत्येकाचे वेगवेगळे जगणे…

 

तो तसा मी असा

जगणे प्रत्येकाचा वसा

त्याचे त्याला माझे मला

मग दोष का द्यावा कोणी कोणाला??

 

करणाराच भरणार आहे

देणाराच घेणार आहे

कर्म आहे ज्याचे त्याचे

भोग कुणाला आहेत का चुकायचे.. ?

 

उगाच लागते सल मना

दोष दूषणे बोल जना

काय देईल कोणी कोणा

प्रत्येकजण तर इथे उणा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन यात्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

जीवन यात्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

सुखदुःखाचे बांधून तोरण

माणसा तुझे हे कसले जीवन ।। ध्रु ।।

*

अस्थी मांसानी शरीर सजले

निज अवयवानी सुंदर नटले

रसरक्तानी तुला पोशीले

श्वेत कृष्ण कातडीचे पांघरुण

*

मांडलास तू जीवन व्यापार

गण गोताचा माया बाजार

पाप पुण्य कर्माचा शेजार

निर्मिलेस जरी तू नन्दनवन

*

मोह मायेचा पिंजरा सजला

संसारी जीव एथेच रमला

झाली घालमेल घात जाहला

आले यमाजी चे अवताण

*

चारचौघे घेती खांदयावरी

निघाली यात्रा यमाच्या दारी

प्रत्येक जण असतो त्या  वाटेवरी

गुंडाळले तुला पांढरे कफ़न

*

उठ ऊठ प्रेता तिरडी सजली

गण गोत  आप्त सर्वही जमली

कमी ज्यास्त सगळी  रडली

धग धगते पेटले चिता सरण

*

माणसा तुझे हे कसले जीवन

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares