मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महाराष्ट्र देशा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– महाराष्ट्र देशा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्या देशा,

राकट देशा,

कणखर देशा,

महाराष्ट्र देशा |

*

धैर्याच्या देशा,

शौर्याच्या देशा,

विरांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

कीर्तीच्या देशा,

स्फूर्तीच्या देशा,

त्यागमूर्तींच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

साधूंच्या देशा,

संतांच्या देशा,

महंताच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

साहित्याच्या देशा,

कलेच्या देशा,

खेळाच्या देशा 

महाराष्ट्र देशा |

*

उद्योगाच्या देशा,

सामर्थ्याच्या  देशा,

प्रगतीच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

सह्याद्रीच्या देशा,

सागराच्या देशा,

दऱ्याखोऱ्यांचा देशा,

महाराष्ट्र देशा |

*

पांडुरंगाच्या देशा,

खंडोबाच्या देशा,

नरसोबाच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

ज्ञानियाच्या देशा,

तुकोबांच्या देशा,

समर्थांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

भक्तीच्या देशा,

शक्तीच्या देशा,

युक्तीचा देशा,

महाराष्ट्र देशा |

*

विचारवंतांच्या देशा,

सुधारकांच्या देशा,

क्रांतीकारकांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

वैभवाच्या देशा,

सुबत्तेच्या देशा,

भारताची भाग्य रेषा,

महाराष्ट्र देशा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणुसकीचा ठाव नसे ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

माणुसकीचा ठाव नसे ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृतीस ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले शुष्क मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय आपुली  बहिण  गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे  कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग कोणा नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखणा पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आतच जळूनी ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राजकारणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ राजकारणी☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

राजकारणी होण्यासाठी कसून केला सराव आहे

धडे गिरवले कपटनितीचे म्हणून धरला टिकाव आहे

*

फितूर झाले बंड कराया तेच तेवढे धरले हाती

विरोधकाना संपवण्याचा केला जबरी उठाव आहे

*

लोकहिताचा घातकराया रचला आहे गनिमी कावा

जनतेला तर फसवायाचा असली केला बनाव आहे

*

सत्ता आहे हाती तोवर घाबरण्याचे कारण नाही

आदेशाने देत जायचा वरून खाली दबाव आहे

*

फिरवत टोप्या साधत संधी मानमरातब मिळवायाचा

हीच चिकाटी ठेवत कायम धरावयाचा निभाव आहे

*

हटायचेपण नाही मागे खोटी वचने देत जायची

सूड घ्यायला सतत जागता ठेवायाचा स्वभाव आहे

*

रोज द्यायच्या नव्या घोषणा नव्या दमाने म्हणावयाचे

जमेल तितकी करतो सेवा पण वेळेचा अभाव आहे

*

समाजातल्या गुणदोषांची करावयाची कशास चिंता

परंपरागत गुलामीतला आपल्या मागे जमाव आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 172 ☆ द्यावा घासातील घास… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 172 ? 

☆ द्यावा घासातील घास… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

द्यावा घासातील घास…

खरी मानवता हीच सांगते

ओळख मनुष्याची अशीच होते.. १

*

द्यावा घासातील घास…

प्राण अन्नमय असतो

अन्नदान उपाय, श्रेष्ठ ठरतो… २

*

द्यावा घासातील घास…

आत्मा तृप्त होईल

सत्कार्य सहज साधेल… ३

*

द्यावा घासातील घास…

परंपरा अवलोकन करा

ग्वाही देईल पूर्ण ही धरा… ४

*

द्यावा घासातील घास…

तोष सहज मनास होई

फुलते पानोपानी  जाई-जुई… ५

*

द्यावा घासातील घास…

व्यर्थ द्रव्य, कुणासही न द्यावे

प्रभू चिंतन, सतत निर्भेळ करावे… ६

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सु डो कू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🕺 सु डो कू ! 🙏 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

सु टले वाटता वाटता

कधी येई अंगाशी घाई,

चुकता आकडा चौकोनी

बिघडून गणित जाई !

*

डो के शिणते सोडवतां

करी पार मेंदूचा भुगा,

सवय होता हळू हळू

सुटतो एक एक धागा !

*

कु शाग्र बुद्धीचे हे खाद्य

चव चविष्ट याची भारी,

रोज रोज चाखल्या विना

शांती लाभे ना मज उरी !

शांती लाभे ना मज उरी !

© प्रमोद वामन वर्तक

१६-०४-२०२४

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोधन…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “गोधन– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

घेऊन  सूर्य  शिंगांमध्ये

नदीकाठावर उभी गाय

भुकेलेल्या वासराला

पान्हा सोडीतसे माय

*

 बंधनरूपी गळ्यात अडणा 

 स्त्रीत्व म्हणूनी का या खुणा?

 ताबा मिळणे सोपे जावया

 अडण्याचा हा असे बहाणा !

*

 कुठेही जावो चरावयाशी

 सांजवेळी परतते  घराशी

 दूध दुभत्याची रेलचेलही

 गोधन असता नित हाताशी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ पाऊस… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

पाऊस… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

पावसाचे थेंब जेव्हा कोसळाया लागले

आसवांचे थेंब तेव्हा गुणगुणाया लागले

*

रान माझे कोरडे भेगाळली होती धरा

सोसलेले जीव सारे तग धराया लागले

*

सोडली होतीच आशा माजला काहूर तो

पाहता पाऊस तो डोळे रडाया लागले

*

पावसाने जीव माझा शांत झाला केवढा

पेरलेले शेत माझे अंकुराया लागले

*

सावकारी पाश माझ्या भोवती होता असा

काय सांगू पावसा कोडे सुटाया लागले

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 220 ☆ महाराष्ट्र गौरव… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निशा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

निशा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

शुभ्र शुक्र चांदणी

 उजळे नभांगणी

चंद्रासह रोहिणी

एकांतात मोहिनी

*

रात चैत्र पुनवेची

रात राणी बहरली

गंध मंद मादकता

मुग्ध कळी उमलली

*

स्पर्शातील कोमलता

लाज गाली हासली

 हात हाती मुलायम

 नाजूकता बहरली

*

शुभ्र दाट चांदणे

केतकीचें हसणे

मोराचे पद लालित्य

सुखात त्या भिजणे

*

सर्व काही तेच तेच

सृष्टीचे खरे स्वरूप

अनादी आंनत युगे

मानवीय ते रूप

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

।। अथाष्टमोऽध्याय: ।।

अर्जुन उवाच :

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।

अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ।।१।।

कथित अर्जुन

केशवा कथिले मज ब्रह्म अध्यात्म कर्म आहे काय

अधिदैव कशाला म्हणताती अधिभूत आहे काय ॥१॥

*

अधियज्ञ: कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।

प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभि: ।।२।।

*

अधियज्ञ कोण केशवा वास्तव्य देही कसे तयाचे

अंतःकाळी युक्तचित्त पुरुषा ज्ञान होते कसे तुमचे ॥२॥

*

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।

भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ।।३।।

*

परब्रह्म अविनाशी स्वरूपस्थिती अध्यात्म नाव

जीवभावा निर्मितो विसर्ग त्याग कर्म तयाचे नाव ॥३॥

*

अधिभूतं क्षरो भाव: पुरुषश्चाधिदैवतम् ।

अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ।।४।।

*

उत्पत्ती-नाश बंध जयासी जीव ते अधिभूत

देहात जीव अधिदैव तर मी अधियज्ञ कायेत ॥४॥

*

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।

य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।५।।

*

देहत्याग समयी जो करी माझे स्मरण

निःसंशये तो होत मम स्वरूपी विलीन ॥५॥

*

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।६।।

*

अंतकाळी जागृत ज्या भावना मनी

त्यांचीच प्राप्ती  तया देहास त्यागुनी

जीवनभर जयांचे सदैव करितो चिंतन 

अखेरच्या क्षणी त्यासी तयांचे स्मरण ॥६॥

*

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।

मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।७।।

*

जाणूनी वर्म मतीस पार्था करी माझे स्मरण

करशील प्राप्त मम करोनी मनप्रज्ञा मम अर्पण ॥७॥

*

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।

परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।८।।

*

भगवद्ध्यान अभ्यासपूर्ण योग अर्जुन 

एकाग्र चित्त मम ठायी माझेची चिंतन 

दिव्य पुरुषाप्रती होता एकरूप ध्यान

मजसी प्राप्त तो खचित हेचि विश्वज्ञान ॥८॥

*

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।

सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तात् ।।९।।

*

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।

भ्रूवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।१०।।

*

सर्वज्ञ अनादि सकल नियंता अचिंत्यस्वरूप

अविद्यातीत तमारी आदित्यवर्ण प्रकाशरूप 

सूक्ष्मात सूक्ष्म असुनी धारक-पोषक सर्वांचा

सदैव करितो स्मरण जो अशा शुद्ध परमात्म्याचा

आज्ञाचक्रे सुस्थापित अंतकाले योगे प्राणाला

निरुद्धचित्ते करित तो प्राप्त दिव्य परमात्म्याला ॥९,१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares