श्री सुहास रघुनाथ पंडित
१ फेब्रुवारी – संपादकीय
मोतीराम गजानन रांगणेकर (मो. ग. रांगणेकर)
हे मो.ग.रांगणेकर या नावाने प्रसिध्द असलेले मराठी नाटककार.ते केवळ नाटककार नव्हते तर चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकारही होते.तसेच त्यांनी गीत लेखनही केले आहे.त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्द्ल त्यांना 1982 चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता.
त्यांची साहित्यसंपदा : –
नाटके— आले देवाजीच्या मना,संगीत एक होता म्हातारा,कन्यादान, कोणे एके काळी,घर माहेर,हिमालयाची बायको,संगीत अमृत,संगीत कुलवधु,सं .कोणे एके काळी,संगीत वहिनी इ.
दिग्दर्शन केलेली नाटके :- अपूर्व बंगाल,तो मी नव्हेच,देवाघरची माणसं,पठ्ठे बापूराव,भूमीकन्या सीता,मीरा मधुरा,लेकरे उदंड जाहली इ. कुबेर चित्रपट
गाजलेली गीते.:- नदी किनारी,नदी किनारी ग, पाखरा जा त्यजुनिया, बोला अमृत बोला, मनरमणा मधुसूदना, क्षण आला भाग्याचा इ.
रांगणेकरांचा आज स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈