श्रीमती उज्ज्वला केळकर
१० फेब्रुवारी – संपादकीय
नरहर अंबादास कुरूंदकर
नरहर अंबादास कुरूंदकर यांचा जन्म १५5 जुलै १९३२ रोजी झाला. ते लेखक होते. समीक्षक होते. समजाचिंतक होते आणि प्रभावी वक्तेदेखील होते. पीपल्स कॉलेज नांदेड इथे त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले.
नरहर अंबादास कुरूंदकर यांचे प्रकाशित साहित्य –
अभयारण्य, थेंब अत्तराचे, धार आणि काठ, निवडक कुरूंदकर भाग १ आणि २, परिचय, पायवाट, आकलन ( व्यक्तिचित्रे ) जागर (लेखसंग्रह) मनुस्मृती (इंग्रजी) , रूपवेध, रंगशाला. इ. अनेक पुस्तकांपैकी ही काही.
कुरूंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत.
कुरूंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली पुस्तके
चक्रपाणी ( रा.चिं ढेरे), श्रीमान योगी (रणजीत देसाई – ७० पानी प्रस्तावना ), हिमालयाची सावली ( वसंत कानिटकर), संस्कृती (इरावती कर्वे ) ,
निवडक कुरूंदकर भाग१ मध्ये या प्रस्तावना समाविष्ट आहेत.
वरील पुस्तकांपैकी धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले होते पण त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला.
१० फेब्रुवारी १९८२ मध्ये या विद्वान व्यक्तीचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर मधु जामकर यांनी स्व. नरहर कुरूंदकर समज आणि गैरसमज हे पुस्तक लिहिले.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानची स्थापना झाली. नांदेड एज्यु. सोसायटी व त्यांचे विद्यार्थी यांच्या मदतीने स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात, नरहर कुरूंदकर प्रगत अध्यापन व संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणार्यांरना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
अभ्यास केंद्राच्या वतीने व्याख्यानमाला ही आयोजित केली जाते. आत्तापर्यंत अशोक बाजपेयी, गंगाधर गाडगीळ, जयंत नारळीकर, दुर्गा भागवत, भालचंद्र फडके, म.द. हातकणंगलेकर यांची व्याख्याने झाली.
आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांच्या विद्वत्तेला भावपूर्ण, विनम्र श्रद्धांजली ?
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈