श्रीमती उज्ज्वला केळकर
१३ डिसेंबर – संपादकीय
२००३मध्ये कर्हाडमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नंतर वळवयी येथे झालेल्या अखिल गोमंतकीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ मध्ये बोरी यथे झाला. केपे हे त्यांचे मूळ गाव. तिथून ते शिकण्यासाठी आधी सांगलीला मग पुण्याला गेले. त्यांनी अर्थशासत्रात डॉक्टरेट मिळवली. नंतर मुंबईतील कीर्ती कॉलेज इथे अध्यापन केले. गोवा मुक्तीसंग्रहानंतर साहित्यिक म्हणून ते प्रकाशात आले.
सुभाष भेंडे यांची आगतिक, अदेशी, अंधारवाटा , आमचं गोय आमका जय, उध्वस्थ, ऐसी कळवळ्याची जाती, कागदी बाण, खुसखुशीत, गंभीर आणि गमतीदार , द्राक्ष आणि रुद्राक्ष इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते अतिशय वाचकप्रिय लेखक होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण या ग्रंथाचा शिल्पकार चरित्र कोश या दुसर्या खंडाचे त्यांनी संपादन केले. गोमंतकाच्या ७० – ८० वर्षात झालेल्या राजकीय, सामाजिक परिवर्तनाचा वेध घेणारी कादंबरी ‘होमकुंड’ या नावाने प्रसिद्ध आहे.
भेंडे यांनी काही अनुवादही इंग्रजीतून मराठीत केले. अल्लाउद्दीन आणि अलीबाबा, इसापाच्या गोष्टी कुमाऊंचे नरभक्षक इ. त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.
आपल्या अमेरिकेतील अनुभवावर ‘गाड्या आपुला गाव बरा हा लेख त्यांनी लिहिला. तो १२वीच्या पाठ्यपुस्तकात आहे.
सुभाष भेंडे यांचा आज स्मृतीदिन . त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भेंडे कुटुंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी नवोदित लेखकांसाठी पुरस्कार ठेवला आहे.
आत्तापर्यंत हा पुरस्कार, बाबन मिंडे, किरण गौरव, गणेश मतकरी, शिल्पा कांबळे, बालिका ज्ञानदेव, रश्मी कशाळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
☆☆☆☆☆
सखाराम कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ला बेळगाव येथे झाला. घराची गरीबी असल्यामुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण मोठ्या कष्टाने, स्वत: अर्थार्जन करून घ्यावे लागले. वी.स. खांडेकर यांच्या प्रयत्नाने त्यांना देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी लागली. साहित्याची आवड असल्याने ते या नोकरीत रमले. शेवटी या कोलजमधील ग्रंथपाल पदावरूनच ते निवृत्त झाले. थोडेच पण कलात्मक लेखन त्यांनी केले. ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा १९५९ साली सत्यकथेत आली. या कथेला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांचे बहुतेक लेखन सत्यकथेत प्रकाशित झाले आहे. सांज, ढग, हे त्यांचे कथासंग्रह आहेत, तर ‘पार्टी’ हा ललित लेख संग्रह आहे.
सुभाष भेंडे, सखा कलाल या लेखक द्वयीला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈