श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
गो.मा.पवार
गोपाळराव मारूती पवार उर्फ गो.मा.पवार हे मराठीतील नामवंत समीक्षक. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी तेहतीस वर्षे मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर सोलापूर येथे वास्तव्य करून विपुल प्रमाणात साहित्य लेखन केले.
मराठवाडा साहित्य परिषद, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळ या संस्थांमध्ये त्यांनी कलेले कार्य संस्मरणीय आहे. सोळा ग्रंथ व साठ शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पी.एच् डी. प्राप्त केली आहे.
त्यांची काही साहित्य संपदा:
निवडक मराठी समीक्षा
मराठी विनोद: विविध आविष्कारणे.
महर्षि वि.रा म.शिंदे.. जीवन व कार्य
साहित्य मूल्य आणि अभिरुची सुहृद् आणि संस्मरणे ..इ.
पुरस्कार:
साहित्य अकादमी 2007
डाॅ.व.दि.कुलकर्णी स्मृती पुरस्कार
भैरू रतन दामाणी पुरस्कार, सोलापूर
शिवगिरिजा प्रतिष्ठान, कुर्डूवाडी
महाराष्ट्रफाउंडेशनचा मराठी साहित्य पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार
यशवंतराव चव्हाण पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार..सोलापूर विद्यापीठ 2016
आज त्यांची पुण्यतिथी आहे.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈