श्रीमती उज्ज्वला केळकर
१६ फेब्रुवारी – संपादकीय
म श्री .दीक्षित यांचा जन्म १६ मे १९३४चा. ते मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते होते. ते इतिहासाचे लेखक होते. संपादक होते. त्यांना पुण्याचा चलता- बोलता इतिहास म्हणत.
श्री. म. माटे यांच्याकडे त्यांनी लेखनिक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी परिषदेच्या कामात सहभाग घेतला. म.सा.प. चा १०५ वर्षांचा इतिहास लिहून त्यांनी प्रसिद्ध केला.
म श्री .दीक्षित यांनी ६० वर्षे वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून विविध प्रकारचे प्रासंगिक, ऐतिहासिक व चरित्रात्मक लेखन केले. अनेक स्मरणिकांचे संपादन केले. शंभरावर पुस्तकांचे परीक्षण केले. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले.
अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई पेशवे, बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांची आई जिजाई , वीररमणी झाशीची राणी, तात्या टोपे, नेपोलियन, विठ्ठल रामजी शिंदे. अनेक चरित्र त्यांनी लिहिली. कौरव पांडव ( कथा) , मुळा-मुठेच्या तीरावरून (व्यक्तिचित्रे) इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. ( १६ फेब्रुवारी २०१४) .त्यांच्या या विपुल साहित्य संपदेला विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈