१८ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर
सरस्वती सन्मान –
भारतातील प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांमध्ये सरस्वती सन्मान या पुरस्काराचा समावश होतो. विद्यादेवी सरस्वतीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. भारतीय संविधांनातील आठव्या सूची मध्ये निर्देशित केलेल्या २२ भाषांसाठी हा पुरस्कार, भारतातील प्रख्यात के. के. बिर्ला फाउंडेशन द्वारा प्रदान केला जातो. इ. स. १९९१पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार देण्यासाठी साहित्य क्षेत्रातील विद्वान आणि सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची एक समिती, सन्माननीय साहित्यिकाची निवड करते. पुरस्कार देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या साहित्यिकाच्या मागील दहा वर्षांच्या लेखनातील प्रकाशित साहित्यकृतीला दिला जातो. प्रथम वर्षी हा सन्मान श्री हरिवंश राय बच्चन यांच्या चार खंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या हिन्दी भाषेतील आत्मचरित्रासाठी दिला गेला.
*मराठी मध्ये हा सन्मान विजय तेंडुलकर यांना १९९३ साली मिळाला. त्यांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, कन्यादान ही नाटके द. लास्ट डेस ऑफ सरदार पटेल (चित्रपट कथा ) प्रसिद्ध आहेत.
*महेश एलकुंचवार यांना हा सन्मान २००२ साली मिळाला.
त्यांची विनाशवेळा, ( हेनरी मिलरच्या पुस्तकाचा अनुवाद), यातनाघर, (नाटक) पश्चिम प्रभा, सप्तक (वैचारिक, आत्मपर) , त्रिबंध, (ललितबंध) वाडा चिरेबंदी (नाटक) , सप्तक ( वैचारिक) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(संपादक मंडळासाठी)
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈