श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्रिया तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर या सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. पण ही त्यांची खरी ओळख नव्हे. कारण त्यांनी स्वतःचे विचार, अभिनय आणि लेखन यातून नाट्य, चित्र व साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.
अंकुर, देवता, माहेरची माणसं, राणीनं डाव जिंकला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार इत्यादी चित्रपटातून त्यांनी कामे केली. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट.
त्या भारतातील पहिल्या टी.व्ही. स्टार म्हणून ओळखल्या जातात. ‘रजनी’ ही त्यांनी काम केलेली दूरदर्शन मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या व्यतिरिक्त प्रिया तेंडूलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बिबी के, हम पाॅच या मालिकात त्यांनी काम केले होते. ‘दामिनी’ ही त्यांची मराठी मालिकाही खूप गाजली होती.
एक हट्टी मुलगी, गिधाडे, ती फुलराणी या मराठी नाटकातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
फर्स्ट पर्सन हे त्यांचे आत्मचरित्र. असंही, पंचतारांकित या नावाची ललित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शिवाय जन्मलेल्या प्रत्येकाला, जावे तिच्या वंशा, ज्याचा त्याचा प्रश्न हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कर्तृत्वास सलाम.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈