श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
चेतन दातार
चेतन दातार हे अभिनेते व रंगकर्मी तर होतेच पण अत्यंत वेगळ्या विषयांवर लेखन करणारे नाटककारही होते.देवदासी प्रथा, समलैंगिकता हे त्यांच्या नाटकांचे विषय होते.श्री.विठ्ठल बंडू तुपे यांच्या कादंबरीवर आधारित त्यांनी लिहीलेले ‘झुलवा’ हे नाटक देवदासी प्रथा या विषयावर होते.ते खूप गाजले.तसेच ‘एक माधवबाग’हे नाटक समलैंगिकता या विषयाशी संबंधीत आहे.या नाटकातील समलिंगी तरूणाने, आपल्या लैगिंकतेबद्दल सांगणारे आईला लिहीलेल्या पत्राचे वाचन अनेक संबंधित संस्थांमध्ये करण्याचा उपक्रमही करण्यात आला होता.
त्यांनी इंग्रजी, हिंदी व जर्मन नाटकांवर आधारित नाट्यलेखन केले आहे.
चेतन दातार यांची नाट्यसंपदा:
एक माधवबाग, झुलवा, राधा वजा रानडे, सावल्या, आरण्य किरणं (मूळ हिंदी), काॅटन56 व पाॅलिएस्टर 84 (मूळ इंग्रजी), मै भी सुपरमॅन (मूळ जर्मन) ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे ते आधारस्तंभ होते.
दातार यांची नाट्यनिर्मिती:
गिरिबाला(रवींद्रनाथ टागोर-नृत्यनाट्य)
हरवलेले प्रतिबिंब(महेश एलकुंचवार)
दोन ऑगस्ट 2008 ला चेतन दातार यांचे निधन झाले.आज त्यांच्या स्मृतीदिनी या वेगळ्या वाटेवरील नाटककाराला अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈