सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २५ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

अरुण मार्तंडराव साधू (१७ जून १९४१- २५ सप्टेंबर१७ )

अरुण साधू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथे झाला. गणित व भौतिकशास्त्राचे ते पदवीधर होते पण त्यांनी कार्यक्षेत्र निवडले, ते मात्र पत्रकारिता आणि साहित्य लेखन. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले.

केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया इ. वर्तमानपत्रांसाठी त्यांनी वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. फ्री-प्रेस जर्नलचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. १९८९नंतर ते स्तंभलेखनाकडे वळले. त्यांचे स्तंभलेखनही गाजले.

त्यांनी विपुल साहित्य लेखन केले. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती सांगायच्या झाल्या, तर फिडेल चे आणि क्रांती, ड्रॅगन जागा झाला, तिसरी क्रांती- लेनिन, स्टॅलीन ते गोर्बाचेव्ह, झिपर्याइ, मुंबई दिनांक, सिंहासन इ. पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल.

डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ या ग्रंथाचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. आंबेडकर’ या चित्रपटासाठी त्यांनी संहिता लेखन केले.

‘सिंहासन’ हा अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ या कादंबरीवरील चित्रपट अतिशया लोकप्रिय ठरला. त्यांनी लिहीलेल्या, कथा, कादंबर्याि, नाटके, एकांकिका आणि स्तंभलेखन समकालीन इतिहासाचा मागोवा घेणारे आहे.

पुरस्कार – अरुण साधू यांना अकादमी, न.चिं. केळकर, भैरूरमण दामाणी, फाय फाउंडेशन इ. महत्वाचे पुरस्कार लाभले आहेत.

८० व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

☆ ☆ ☆ ☆ ☆

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना  (२१ नोहेंबर १९२७- २५ सप्टेंबर २०१३)

शं. ना. नवरे कथाकार, नाटककार, पटकथाकार, म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांनी स्तंभलेखनही केले. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव आणि भावविश्व त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटले. शहाणी सकाळ, मेणाचे पुतळे, कोवळी वर्षे इ. त्यांचे २७ कथासंग्रह आहेत.

जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरून त्यांनी ‘गुंतता हृदय हे’, हे नाटक लिहिले. ते अतिशय गाजले. याशिवाय गहिरे रंग, खेळीमेळी, धुक्यात हरवली वाट, देवदास, दोघांमधले नाते, नवरा म्हणू नये आपला, पसंत आहे मुलगी, मन पाखरू पाखरू हीही त्यांची उत्तम नाटके आहेत. जनावर आणि दोन यमांचा फार्स या त्यांच्या एकांकिका प्रसिद्ध आहेत. 

त्यांच्या पटकथा असलेले सारेच चित्रपट अतिशय गाजले. कळत नकळत, कैवारी, घरकुल, तू तिथे मी, निवडुंग, सवत माझी लाडकी, बाजीरावचा बेटा या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या.

आनंदाचे झाड, दिवसेंदिवस, दिनमान या त्यांच्या कादंबर्या  तर, झोपाळे आणि शन्नाडे ही त्यांच्या स्तंभलेखनावरची पुस्तके

नोहेंबर २००८मध्ये त्यांना ग.दी. माडगूळकर प्रतिष्ठानचा ग.दी.मा. पुरस्कार मिळाला, तर नोहेंबर २००९ मधे त्यांना डोंबिवली भूषण हा पुरस्कार मिळाला. शं. ना. नवरे यांच्यावर ‘गोष्टीवेल्हाळ शन्ना’ हा लघुपट निघाला आहे. काही जुन्या नाटकांचे दुर्मिळ चलत् चित्रण व जुन्या सहकाऱ्यांनी (डॉ. जब्बार पटेल, विक्रम गोखले, बाळ कुडतरकर, प्रदीप वेलणकर इ.) सांगितलेल्या शन्नांच्या रमणीय आठवणी या लघुपटात अनुभवायला मिळतात.

डोंबिवलीमधे २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे त अध्यक्ष होते. त्यांना मिळणार्या् पैशाचा मोठा हिस्सा ते पडद्यामागील कलाकारांसाठी खर्च करत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

अरुण बाळकृष्ण कोलटकर (१नोहेंबर १९३२- २५ सप्टेंबर २००४ ) 

अरुण बाळकृष्ण कोलटकर हे सुप्रसिद्ध कवी होते. कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.

अरुण कोलटकर यांचे प्रकाशित काव्यसंग्रह

अरुण कोलटकरच्या कविता (१९७७), चिरीमिरी (२००४), द्रोण (२००४), भिजकी वही (२००४), अरुण कोलट्करच्या चार कविता

मराठीप्रमाणेच त्यांनी हिन्दी व इंग्रजीमधूनही कविता लिहिल्या.

अरुण कोलटकर यांना लाभलेले पुरस्कार

१.  २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार

२.  कुसुमाग्रज पुरस्कार

३.  २००५ चा बहिणाबाई पुरस्कार

४. १९७६ चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार

इ. पुरस्कार त्यांना मिळाले.

अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कमलाकर सारंग (जून २९, इ.स. १९३४ – सप्टेंबर २५ इ.स. १९९८)

कमलाकर सारंग हे मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक होते. सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील यांचा अभिनय विशेष नावाजला गेला. त्यांनी दिग्दर्शिलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर ही नाटकेही गाजली.

मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत.

प्रकाशित साहित्य

कमलाकर सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर “बाइंडरचे दिवस” नावाचे पुस्तक लिहिले.

कमलाकर सारंग यांच्यावर नाट्यप्रेमी कमलाकर सारंग हे पुस्तक अनुराधा औरंगाबादकर यांनी लिहिले आहे.

आज साहित्यिक अरुण साधू, शं. ना. नवरे, अरुण कोलटकर आणि नाटककार कमलाकर सारंग यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.?  

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी , गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments