श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्रीपाद वामन काळे
श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१०चा. ते निबंधकार आणि अर्थतज्ज्ञ होते. अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे ते संपदक होते. ’पुढे पाऊल, तुमचे स्थान कोणते?, कौटुंबिक हितगुज, दाणे आणि खडे , नवे जीवन, नव्या जीवनाची छानदार घडी’ अशी त्यांची अनेक पुस्तके आहेत. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापक विचारसरणी, ओघवती भाषा, नाजुक, मार्मिक विनोदाची पखरण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.
मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास त्यांनी लिहिला आहे.
आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈