श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
रामचंद्र वामन पटवर्धन
रामचंद्र वामन उर्फ राम पटवर्धन यांचे शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे झाले.मराठी व संस्कृत या भाषा घेऊन त्यांनी एम्.ए.केलं.त्यानंतर त्यांनी मुंबईत सिडनेहॅम,रूईया,पोद्दार,सिद्धार्थ व एम.डी.महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले.शिक्षण घेत असताना त्यांना श्री.पु.भागवत,न.र.फाटक यांच्यासारखे गुरू लाभले.पुढे श्री.पु.भागवतांच्या सूचनेनुसार त्यांनी मौज या साप्ताहिकाचे संपादक पद स्विकारले.तिथे 1960 पर्यंत त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले.नंतर 1960पासून सत्यकथा चे संपादक पद हे मासिक बंद पडेपर्यंत सांभाळले होते.
त्यांनी काही पुस्तकांचे संपादनही केले होते.मारूती चित्तमपल्ली यांच्या ‘चकवा चांदण’,मीना प्रभू यांचे ‘माझे लंडन’,अचला जोशी यांचे ‘आश्रम नावाचे घर’,आणि शांता शेळके यांचा ‘अनोळख’ हा काव्यसंग्रह ही ती पुस्तके होत.
संपादनाशिवाय त्यांनी काही पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.मार्जोरी राॅलिंग्ज यांच्या द इयरलिंग चे ‘पाडस’ या नावाने पुस्तक अनुवादित केले आहे.योगाचार्य बी.के.अय्यंगार यांच्या योगविद्या विषयीचे पुस्तक ‘योगदिपिका’ हे नावाने अनुवादित केले आहे.
संपादन काळात त्यांनी अनेक नव लेखकांना प्रोत्साहन दिले .त्यातील आशा बगे, दीपा गोवारीकर,सानिया,नामदेव ढसाळ यासारखी नावे सर्वश्रुत आहेत.
अनुवाद आणि मुख्यतः संपादन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणा-य् राम पटवर्धन यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 2014 ला निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन आहे.
मौज,सत्यकथा सारख्या मराठीतील नामवंत नियतकालिकांचे संपादक कै.राम पटवर्धन यांना आदरपूर्वक प्रणाम !
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈