श्रीमती उज्ज्वला केळकर
४ डिसेंबर – संपादकीय
अरुण हळबे यांचा जन्म २८ मे १९३४ ला झाला. ते इतिहास संशोधक होते. लेखक होते आणि शिक्षकही होते. यवतमाळ येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमधून ते शिक्षक म्हणून निवृत्त झाले.’शतकातील यवतमाळ’ हा त्यांचा गाजलेला संशोधन ग्रंथ.यातील लेखन सादर स्वरूप ‘लोकमत’ मध्ये येत होते. या शिवाय त्यांची पुस्तके म्हणजे १.डरकाळी (शिकार कथा), २.गानहिरा ( हिराबाई बडोदेकर यांच्यावरील चरित्र ग्रंथ), ३. लोकनायक ( बापूजी आणे –चरित्र ग्रंथ )याशिवाय वर्तमानपत्रातून त्यांचे अनेक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत.
भारत सरकारने राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव केला होता.
अरुण हळबे यांना त्यांच्या आज स्मृतिदिनी सादर वंदन
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈