श्रीमती उज्ज्वला केळकर

? ६ मार्च –  संपादकीय  ? 

रणजीत देसाई

मराठी वाचकांच्या मनावर ज्या साहित्यिकाच्या लेखनाची विलक्षणमोहिनी आहे, ते साहित्यिक म्हणजे रणजीत देसाई. त्यांनी ऐतिहासिक, ग्रामीण, राजे-राजवाडे, सरदार – दारकदार यांच्या वाड्यातून होंणारा नृत्य, सगीत, चित्रकला विलास या पार्श्व्भूमीवरील कादंबर्या-, कथा लिहिल्या. त्यांचं सर्वच लेखन वाचकांनी पसंत केलं, तरीही त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्याव विशेष गाजल्या. त्यातही शिवाजी महाराजांवरची श्रीमान योगी व थोरले माधवरव पेशवे यांच्यावरील ‘स्वामी’ या कादंबर्यांवनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला.  अतिशय रसाळ वाणी, गतिमानता, डोळ्यापुढे हुबेहुब दृश्य साकार करायची किमया अशी त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.

रणजीत देसाई यांनी वरील कादंबर्याीव्यतिरिक्त, समीधा , लक्षवेध, या ऐतिहासिक कादंबर्याु , शेकरू, बारी, माझा गाव या ग्रामीण कादंबर्याी, राधेय, रूपमहाल, आभोगी, राजा रविवर्मा या आणखी कादंबर्याल लिहिल्या.

संकेत, मेखमोगरी, मोरपंखी सावल्या, मधुमती, बाबूल मोरा, जाण, कणव, गंधाली, कातळ, कामोदींनी इ. त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 

रणजीत देसाई यांची नाटकेही लोकप्रीय आहेत. हे बंध रेशमाचे, हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक. याशिवाय, स्वामी, संगीत सम्राट तानसेन, सावली उन्हाची, लोकनायक, रामशास्त्री, पांगुळगाडा, गरुडझेप ही त्यांची अन्य नाटके आहेत.

रणजीत देसाई यांना मिळालेले पुरस्कार

स्वामी कादंबरीला १९६३ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. याच कादंबरेला याच वर्षी हा. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तर या कादंबरीला १९६४साली साहित्य अॅवकॅडमीचा पुरस्कार मिळाला.

१९७३ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.

१९९० मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला.

 ☆ ☆ ☆ ☆ ☆

वसंत नरहर फेणे

वसंत नरहर फेणे – दिवाळी अंकांचे बिनीचे लेखक म्हणून ज्यांच्याविषयी दिवाळी अंकांच्या संपादकांना विश्वास होता, आणि वाचकांना ज्यांच्या कथा आवडत, ते लेखक म्हणजे, वसंत नरहर फेणे –वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि वयाच्या ९०व्या वर्षापर्यंत ते लिहीत होते. ‘कारवारची माती’ ही कादंबरी त्यांनी ९०व्या वर्षी लिहून पूर्ण केली आणि ग्रंथालीने ती प्रकाशित केली. ३५ ते ९० या कालावधीत त्यांची ३० पुस्तके प्रकाशित झाली.

कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद असं विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलं. या लेखनात कथा आणि कादंबर्याा त्यांनी प्राधान्याने लिहिल्या. काळ आणि मानवी समाज यांच्या नात्याचे बंध त्यातून उलगडलेले दिसतात. सर्वसामान्य माणसाचं अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रगट होतं. त्यांच्या लेखनात त्यांनी व्यक्तिपेक्षा समाजाला केंद्रस्थानी ठेवलेले दिसते.

वसंत नरहर फेणे- महत्वाची पुस्तके –

सेंट्रल बस स्टेशन, सहस्त्रचंद्र दर्शन, विश्वंभरे बोलविले, या कादंबर्याम, देशांतर कथा, हे झाड जगावेगळे, ध्वज, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृदगंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावाल्यांची वसाहत, काना आणि मात्रा, काही प्यादी काही फर्जी. पिता-पुत्र, मुळे आणि पाने  इ. त्यांचे कथासंग्रह आहेत.

वसंत नरहर फेणे- पुरस्कार

१.    काना आणि मात्रा ला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार

२.    विश्वंभरे बोलविले’ला ना.सी.फडके पुरस्कार. (२००४)

३.    . शब्द – द बुक गॅलरीच्या वतीने देण्यात येणारा भाऊ पाध्ये साहित्य गौरव पुरस्कार

 वसंत नरहर फेणे यांचा जन्म २८ एप्रील १९२६ तर स्मृतीदिन ६ मार्च २०१८ 

☆ ☆ ☆ ☆ ☆

रणजीत देसाई, वसंत नरहर फेणे, या दोघा प्रतिभासंपन्न लेखकांना शतश: प्रणाम. ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments