श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ७ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
लोककवी मनमोहन:
गोपाळ नरहर नातू हे लोककवी मनमोहन या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी गद्य व पद्य लेखन विपुल प्रमाणात केले आहे. त्यांची कविता ही कल्पनाविश्वात रमणार्या रोमॅन्टीक बंडखोर कवीची कविता आहे. वैयक्तिक प्रेम, समाज, राष्ट्रभक्ती, इतिहास हे त्यांच्या काव्याचे विषय आहेत. कादंबरी, लघुकथा याबरोबरच त्यांनी सुमारे पाच हजार मंगलाष्टके लिहीली आहेत.
त्यांच्या गाजलेल्या कविता/गीते :
ती पहा, ती पहा बापूजींची प्राणज्योती
मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यामधला कैदी
मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला
शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता.
सांग पोरी, सांग सारे.
याशिवाय त्यांनी अनेक दीर्घ कविताही लिहील्या आहेत.
काव्यसंग्रह: अफूच्या गोळ्या, उद्धार, युगायुगांचे सहप्रवासी, शिवशिल्पांजली, सुनीत गंगा, काॅलेजियन
कादंबरी लेखन : छत्रपती संभाजी, छ. राजाराम, छ. शाहू, तोरणा, प्रतापगड, सूर्य असा मावळला, संभवामि युगे युगे(संभाजीराजे).
चतुरस्त्र कवी, लेखकास आज स्मृतीदिनी अभिवादन !
☆☆☆☆☆
दुर्गा भागवत :
जे नाव ऐकल्यानंतर आपोआपच नतमस्तक व्हायला होते ते नाव म्हणजे ख्यातनाम लेखिका दुर्गा भागवत !
लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, कादंबरी, रूपांतरीत, संशोधन,
समीक्षा, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांची लेखणी तळपून गेली.
मराठी, संस्कृत, पाली, इंग्रजी या भाषांत त्यांनी लेखन केले आहे.
याशिवाय त्यांना फ्रेंच, जर्मन या भाषा ही अवगत होत्या.
सुस्पष्ट विचार, नादमय शब्द, छोटी छोटी वाक्ये, संशोधन आणि विद्वत्ता यांचा सुरेख संगम ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.
पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच मुंबईच्या एशियाटीक सोसायटीच्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. निमंत्रित लेखिका या नात्याने त्यांनी रशियाला भेट दिली होती.
त्याच्या प्रचंड ग्रंथसंपदेतील काही याप्रमाणे:
ललित: ऋतूचक्र, पैस, निसर्गोत्सव, दिव्यावदान, डूब, गोधडी, व्यासपर्व
कादंबरी: भावमुद्रा, रसमयी इ.
समीक्षा: केतकरी कादंबरी इ.
वैचारिक: आस्वाद आणि आक्षेप
बालसाहित्य: आठवले तसे इ.
त्यांच्या साहित्याला सहा वेळेला राज्य पुरस्कार मिळाले आहेत. पैस या ललित लेख संग्रहास 1971 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
विचारस्वातंत्र्याच्या क्रियाशील पुरस्कर्त्या दुर्गाबाई भागवत 2002 साली वयाच्या 92 वर्षी निधन पावल्या.
त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈