श्रीमती उज्ज्वला केळकर
८ फेब्रुवारी – संपादकीय
यशवंत नरसिंह केळकर
यशवंत नरसिंह केळकर हे न. चिं केळकर यांचे धाकटे चिरंजीव. त्यांनी इतिहास विषयक लेखन विपुल केले. अर्थात इतरही लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांचा जन्म १९ जुलै १९०२चा. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी टिळक विद्यापीठाची वाङ्मय विशारद ही पदवी मिळवली.
१९४७ मधे इतिहास विषयाला वाहिलेले ‘पराग’ मासिक सुरू केले. इतिहास विषयक निबंध, स्थल, कथा, इतिहास क्षेत्रातील बातम्या अशा स्वरूपाचे लेखन यात प्रसिद्ध होई.
य. न. केळकर यांचे साहित्य –
१. इतिहासातील सहली, २.ऐतिहासिक शब्दकोश २ भाग, ३.होळकरांची कैफियत, ४. चित्रमय शिवाजी भाग १, अशी अनेक ऐतिहासिक पुस्तके त्यांनी लिहिली.
इतर – तंत कवी तथा शाहीर , जुन्या अप्रसिद्ध लावण्या, अंधारातील लावण्या, गीत गुंफा, विनोद लहरी, न. चिं केळकर यांचा खाजगी पत्रव्यवहार अशी इतरही पुस्तके त्यांनी लिहिली. ८ फेब्रुवारी १९९४ ला ते निधन पावले.
या थोर इतिहासकाराल आज विनम्र श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈