श्री सुहास रघुनाथ पंडित

? ९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

श्री.विठ्ठल हरी कुलकर्णी :

मराठीतील लेखक,समीक्षक,चरित्रकार विठ्ठल हरी कुलकर्णी यांचा आज स्मृतीदिन.(1982)शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील महाविद्यालयात प्राध्यापक पदी नोकरी केली. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास अशा विविध टोपणनावानी लेखन केले.सदर लेखन त्यांनी ज्योत्स्ना,तुतारी,प्रतिभा,विविधवृत्त या विविध नियतकालिकांमधून केले.व्यक्तिचित्रे या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य लेखक,व्यक्ती यांच्यावर चरित्रपर लेखन केले आहे.त्यांनी निबंध स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेखन ह त्यांनी केले आहे.अखेरच्या काळात त्यांनी जाॅर्ज बर्नार्ड शाॅ आणि अच्युत बळवंत कोल्हटकर व्यक्ती आणि वाड्मय हे दोन मोठे अभ्यासंपूर्ण चरित्रग्रंथ लिहिले. व्यक्तीरेखा आणि वि.ह.कुलकर्णी निवडक लेख हे त्यांचे दोन ग्रंथ 1986 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

धर्मपाल कांबळे.:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव आपणा सर्वांचेच परिचयाचे आहे.पण त्यांचे सर्व साहित्य संपादित करून तीन खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचे महत्वपूर्ण कार्य ज्यांनी  केले ती संशोधक व्यक्ती म्हणजे धर्मपाल कांबळे.ते पुण्यातील पोस्टामध्ये पोस्टमनची नोकरी करत होते.त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती.वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी तीन खंडांत साठे यांचे साहित्य प्रसिद्ध केले.पहिल्या खंडात पोवाडे,लावण्या व गाणी आहेत.दुसरा खंड लोकनाट्याविषयीचा आहे.तिस-या खंडात त्यांच्या कथा आहेत.त्यांचे स्वतःचे लेखन विपुल प्रमाणात आहे.त्यापैकी काही:

अण्णा भाऊ साठे – आंबेडकर चळवळीचे वारसदार, प्रबोधनकार ठाकरे – व्यक्तित्व, कार्य, साहित्य मृत्यूकडून जीवनाकडे, भारतरत्न राजीव गांधी इ.

प्राप्त पुरस्कार व सन्मान :

चंद्रशेखर आगाशे पुरस्कार, नाट्य चित्र कला अकादमीचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पुणे पोस्टस् टेलिग्रामवर सोसायटीचा गुणवंत कामगार पुरस्कार.

आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन!.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया, इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments