श्रीमती उज्ज्वला केळकर
९ नोव्हेंबर – संपादकीय
मॅन बुकर पुरस्कार
या पुरस्काराची सुरुवात इ.स. १९६९ पासून इंग्लंडच्या मेकॉनल या कंपनीने केली. इंग्रजी भाषेत लिहीलेल्या व युनायटेड किंगडममध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत ७ भारतीय लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे. सन
१ १९७१ मध्ये व्ही. एस. नायपॉल यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांनाच पुढे २००१ मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला. १. द इंडियन ट्रॉयॉलॉजी, २. अमंग द बिलिव्हर्स ,३. अॅन एरिया ऑफ डार्कनेस ४. ए वे इन द वर्ल्ड अशी त्यांची पुस्तके आहेत.
२. अनीता देसाई – सन १९८० मध्ये अनीता देसाई यांची प्रथम बुकर पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांनातर एकूण ३ वेळा त्यांची बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘फायर ऑन द माऊंटन’ या कादंबरीला १९७८साली साहित्य अॅकॅडमीचाही पुरस्कार मिळाला होता. वयाच्या ९व्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. १क्लिअर लाईट ऑफ द डे, २. क्रय, द पिकॉक, ३. बाय बाय ब्लॅक बर्ड ही त्यांची पुस्तके.
३ सलमान रश्दी – सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे जागतिक प्रसिद्धी असलेले लेखक. १९८१मध्ये त्यांना बुकर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना ‘मिडनाईट चिल्ड्रन’ या पुस्तकासाठी मिळाला. २. द गोल्डन हाऊस, ३ द जग्वार स्माईल ४. सॅटॅनिक व्हर्सेस इ. त्यांची पुस्तके. त्यांनी गीते, लेख, कथाही लिहिल्या. सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाबद्दल वाद-विवादाचा बराच धुराळा उडाला. त्यात इस्लामबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर आहे, असे काहींचे म्हणणे. त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले.
४. अरुंधती रॉय – अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझान अरुंधती रॉय . त्या लेखिका आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत. १९९७ साली त्यांच्या द गोड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला. १. द गोड ऑफ स्मॉल थिंग्ज, २. वॉर ऑफ टॉक ३. कम सप्टेंबर इ. त्यांची पुस्तके आहेत. त्यांच्या २ पटकथा व अनेक लेखसंग्रहही आहेत.
५ किरण देसाई – या भारतीय लेखिका आहेत. २००६ साली किरण देसाई यांना ‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या पुस्तकासाठी मॅन बुकर पुरस्कार मिळाला. जगतीकरणाच्या प्रक्रियेमुळे माणसाच्या जीवनात येणारे ताण-तणाव येत असले तरी ग्रामीण भागातअजूनही टिकून असलेला आनंदीपणा, याचा वेध घेणारी ही कादंबरी. २. हल्लाबल्लू इन द ग्वावा आर्केड ३. जनरेशन १.५ इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
६. अमिताभ घोष – यांना २००८ चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. १. द सर्कल ऑफ द रिझन २. द शॅडो लाईन्स ३. द हंग्री टाईड ही त्यांची आणखी काही पुस्तके. . ‘द शॅडो लाईन्स’ला १९८९चा साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला.पुढे त्यांना डिसेंबर २०१८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. इंग्रजी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले अमिताभ घोष हे पहिलेच साहित्यिक. २००७ साली त्यांना पद्मश्री मिळाली होती.
७. अरविंद अडीगा अमिताभ घोष यांच्याप्रमाणेच अरविंद अडीगा यांनाही २००८ मधेच बुकर पुरस्कार मिळाला आहे. द व्हाईट टायगर या त्यांच्या पाहिल्याच पुस्तकासाठी त्यांना मानाचा बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात फायनान्शियल टाईम्स , मनी अॅंड वॉलस्ट्रीट जर्नल इ. वृत्तपत्रातून व्यापार, उद्योग, आर्थिक प्रश्न इ. विषयांनी झाली. टाईम वृत्तपत्राचे ते तीन वर्ष वार्ताहर होते. नंतरही त्यांनी मुक्त पत्रकारिकता केली.
२. सिलेक्शन डे, ३. लास्ट मॅन इन टॉवर ही त्यांची पुस्तके लोकप्रिय झाली आहेत.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈