सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ मराठी विलोमपदे – palindromes ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
लहानपणी Palindrome हा प्रकार आवडायचा.
Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना, जी शेवटाकडून सुरुवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
इंग्रजीत Palindrome ची रेलचेल शेकड्याने आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच….
लहानपणी तर दोन तीनच माहित होते….
१) चिमा काय कामाची
२) ती होडी जाडी होती.
३) रामाला भाला मारा.
आता अजून वेगळी विलोमपदे –
१) टेप आणा आपटे.
२) तो कवी ईशाला शाई विकतो.
३) भाऊ तळ्यात ऊभा.
४) शिवाजी लढेल जीवाशी.
५) सर जाताना प्या ना ताजा रस.
६) हाच तो चहा
वा वा ! हे ताजे मराठी पॉलिनड्रोम्स, आय मीन, विलोमपदे. वाचून मजा आली. आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॉलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?
Very Interesting
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ||१||
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतं ||२||
या श्लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची स्तुती आहे आणि दुसऱ्या चरणात श्रीकृष्णाची .
या श्लोकाचे वैशिष्ट्य असे की, यातले दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे . वाचून बघा ……
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२