डाॅ. शुभा गोखले
इंद्रधनुष्य
☆ १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
आपल्या पूर्वजांनी आमच्यासाठी गुहा, मंदिरे, चर्च, स्मारके, किल्ले अशा अनेक गोष्टी ठेवल्या. त्यांच्या बद्दल आस्था निर्माण करण्यासाठी आणि पुरातनगोष्टी जतन व्हाव्यात यासाठी १८ एप्रिल हा ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) त्यांच्याकडून १९७२ मध्ये केलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी निश्चित केली जाते. सध्या जगातील १ हजार ३१ स्थळे या वारसा यादीत आहेत.
जागतिक वारसास्थळांची सर्वाधिक संख्या इटली देशात आहे.ज्यात ५१ वारसा स्थळे आहेत. चीनमध्ये ४८, स्पेनमध्ये ४४ तर फ्रान्समध्ये ४१ आहेत. भारत ३२ वारसास्थळांसह सातव्या क्रमांकावर आहे. मेक्सिको ३३ व जर्मनी ४० स्थळांसह अनुक्रमे सहाव्या व पाचव्या स्थानांवर आहेत. आशियात चीन मध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत. सिंगापूरकडे फक्त सात स्थळे असूनही ते आपल्यापेक्षा जास्त पर्यटक आकर्षित करतात. १९८३ मध्ये भारतातील दोनस्थळे सर्व प्रथम या यादीत समाविष्ट केली गेली. ती म्हणजे आग्र्याचा किल्ला व अजंठ्याच्या गुंफा. आता ३२ भारतीय स्थळे त्या यादीत आहेत. त्यापैकी २५ सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत तर, ७ निसर्ग स्थळे आहेत. याशिवाय आणखी ५१ स्थळांचा प्रस्ताव भारताने युनेस्कोकडे पाठवला आहे.
अमूल्य ठेवा वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या जागांचे संरक्षण व संवर्धन करणे व पुढच्या पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हे उद्दिष्ट आहे. त्यातून पर्यटन वाढीला चालना मिळते. त्यातून रोजगार वाढतो. देशाला बहुमूल्य परकीय चलन प्राप्ती होते. या स्थळांना जागतिक पर्यटन नकाशावर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागतिक वारसा दिना निमित्ताने पुढील पिढी पर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवायचा असेल तर प्राचीन शिलालेख, मंदिरे, मूर्ती आणि शिल्पे यांना सरंक्षण मिळणे गरजेचे आहे.
लेखक : श्री संजीव वेलणकर
पुणे, मो. ९४२२३०१७३३, संदर्भ : इंटरनेट
संकलन : श्री मिलिंद पंडित
कल्याण
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈