इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-7… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
जैसा आपुल्याच बुबुळा
न पाही आपुला डोळा॥३१॥
ज्ञानरूप परमात्मा तैसा
आत्मज्ञाने जाणसी कैसा॥३२॥
मौनचि जेथे बोलणे
नसणेचि जेथे असणे
अज्ञानबाधा नसता जेणे
ज्ञानरूप परमेश लाभणे॥३३॥
जैसे लाटात जळाचे आस्तित्व
ज्ञाता ज्ञेय ज्ञानात असे एकत्व
ज्ञाता ज्ञेयाची सोयरीक होता
ज्ञान येई आपसूक हाता॥३४॥
आत्मज्ञान का दृग्गोचर होई
एकलेपणाने सर्वत्र राही॥३५॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈