☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे.
एको ब्रह्म द्वितीयो नास्ति
◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन आहेत.
◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत.
सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण.
◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद।
◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत.
अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान.
◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत.
मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय.
◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत.
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ.
◆ 8:00 वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत.
अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व.
◆ 9:00 वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत.
पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व.
◆ 10:00 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध
◆ 11:00 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र 11 आहेत.
कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव.
◆ 12:00 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत.
अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु.
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈