इंद्रधनुष्य
☆ खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
फ्लॅटचे ७२ लाख कर्ज असताना बक्षीस मिळालेले २५ लाख दान करणारे अवलिया वैज्ञानिक. चांद्रयान-३ पूर्वतयारी सुरू असल्याने चार वर्षात एकही रजा घेतली नाही.
इस्रोचे वैज्ञानिक, चांद्रयान- ३ मोहिमेचे संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मिळालेले २५ लाख रुपये विविध शिक्षण संस्थांना दान केले त्यांचे वडील रेल्वेत तंत्रज्ञ होते. गरिबीत जीवन जगले व वडिलांचे संस्कार म्हणून बक्षिसाची रक्कम दान केली. एक लाख पगारातून कर्जाचे हप्ते फेडत सामान्य नोकरदाराप्रमाणे हे ISRO चे वैज्ञानिक संसार चालवत आहेत.
२३ ऑगस्ट २०२३ रोजी लॅडिंग झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे ISRO चे प्रकल्प संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांच्यासह ८ वैज्ञानिकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी २५/२५ लाख रुपये बक्षीस दिले होते.
डॉ.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मला मिळाले असले तरी यावर अनेकांचा हक्क आहे, म्हणून स्वतः ला मिळालेले २५ लाख रुपये सगळेच्या सगळे, ज्या शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक घडवले त्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला.
डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ७२ लाख रुपये कर्ज घेऊन फ्लॅट घेतला आहे. दरमहा १ लाख रुपये पगारातून हप्ता जातो. स्वत:वर कर्ज असूनही बक्षीसाची २५ लाख रक्कम एलुमलाई पॉलिटेक्निक कॉलेज वेस्ट तांबरम, चेन्नई माजी विद्यार्थी संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), तिरुचिरापल्ली श्रीसाईराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास यांना दान केली.
ISRO ही संस्था देशाची शान आहे. राष्ट्रीय विकासात योगदानासाठी समृद्ध वातावरण इस्त्रो संस्था देत आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. २०१९ ते २०२३ या कालावधीत चांद्रयान-३ मोहिमेचे काम सुरू असल्याने एकही रजा डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी घेतली नाही.
देशाचे खरेखुरे Idol, खरेखुरे हिरो आपल्या देशातील वैज्ञानिक आहेत.
डॉक्टर पी.वीरमुथुवेल यांच्या दातृत्वास व निष्काम सेवेसाठी साष्टांग नमस्कार. इस्रोच्या सर्वच वैज्ञानिकांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना.
लेखक : श्री संपत गायकवाड (माजी सहायक शिक्षण संचालक)
संग्राहक : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈