डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-2 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
नमुना
मी, …… जर कोणत्याही आजारामुळे अथवा अपघातामुळे माझ्या उपचारासंबंधी निर्णय घेण्यास असमर्थ झालो, तर निम्निलिखित सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
सूचना –
ज्यामुळे पुन्हा अर्थपूर्ण वा सर्वसामान्य ((Normal) जीवन अशक्य होईल, किंवा उपचार करूनही सहा महिन्यांच्या आत मृत्यू संभवेल, अथवा कायमची बेशुद्धावस्था (unconsciousness and/or brain death) अशी माझी स्थिती झाल्यास.
‘मला रुग्णालयात ठेवू नये, तसेच भरपाई होऊ शकणाऱ्या आरोग्यविमा रकमेपेक्षा जास्त खर्च करू नये.
‘मेंदू मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केल्यास माझे जीवन लांबविणारा कोणताही उपचार करू नये. उदा. शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वसन (ventilator , life support), तसेच डायलिसिस, औषधे, रक्त/रक्तजन्य पदार्थ तसेच कृत्रिमरित्या अन्नपाणी देऊ नये.
‘मला वेदना होत असल्यास वेदनाशामके द्यावीत. तसेच मी आक्रमक/हिंसक झाल्यास शांत करण्यासाठी आवश्यक ते उपचार जरूर करावेत.
माझी काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती तसेच संबंधित डॉक्टर यांच्यावर अवघड निर्णय घेण्यासाठी जबाबदारी देऊ नये व त्यांची अप्रतिष्ठा होऊ नये या हेतूने हे इच्छापत्र मी उत्तम मानसिक स्थिती असताना व परिणामांचा काळजीपूर्वक विचार करून लिहीत आहे.
या इच्छापत्रासंबंधी निर्णय घेण्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मी खालील व्यक्तींना देत आहे.
१)………………….
२)……………..
स्वाक्षरी
……………..
हा वैद्यकीय इच्छापत्राचा फक्त नमुना आहे. त्यातील कोणतेही मुद्दे तुम्ही कमी जास्त करू शकता. मृत्युपश्चात अवयवदानापासून ते अंत्यविधीसाठीच्या खर्चापर्यंत अनेक मुद्दय़ांचा यात समावेश करता येतो.
इच्छापत्र करताना
- आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचे हे इच्छापत्र आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते.
- त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे, असे लिहून त्यावर डॉक्टर सही करतात.
- या वेळी पती अथवा पत्नी तसेच मुले व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्य़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावे लागते.
- त्यानंतर त्याच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या.
हा लेखी दस्तऐवज असल्याने कायद्याच्या दृष्टिकोनातूनही तो ग्राह्य़ धरला जातो.
आपल्या परिचयात किंवा आजूबाजूला वृद्धांसाठी विशेष, वेगळं कार्य करणाऱ्या विशेषत: मुंबई, पुणे परिसराबाहेरच्या संस्था असल्यास आपण आम्हाला कळवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, प्लॉट नं. ई.एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई ४०० ७१०.
ईमेल – [email protected] किंवा [email protected]
वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन
मो – ९०२८६६४३३३
प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈